ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » समलैंगिक संबंध गुन्हा नाही

समलैंगिक संबंध गुन्हा नाही

सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

समाजातील एका विशिष्ट घटकांपर्यंत मर्यादित असणार्‍या, मात्र इतर घटकांसाठी औत्सुक्याचा तर काही घटकांसाठी नाराजीचा विषय असलेल्या समलैंगिक संबंधाबाबतच्या प्रकरणी आज महत्त्वाचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नसल्याचे म्हटले आहे. प्रत्येकाला स्वत:ची आपली एक स्वतंत्र ओळख आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांनाही मूलभूत हक्क मिळवण्याचा अधिकार आहे. आता जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या आपल्या निकालात म्हटले आहे.
दोन सज्ञान व्यक्तींमधील समलैंगिक संबंध अपराध ठरू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी केल्यानंतर दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या निर्णयामुळे समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम ३७७ रद्द समजले जाणार आहे. हे कलम म्हणजे मनमानीपणा असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करताना म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करत स्वत:चा डिसेंबर २०१३ मध्ये दिलेला निकाल बदलला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. आर. एफ. नरीमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने १० जुलैपासून या विषयावर सुनावणी सुरू केली होती. ही सुनावणी १७ जुलैला संपली होती. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज गुरुवारी अखेर न्यायालयाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांनी आनंद व्यक्त केला.
अखेर न्याय मिळाला
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आजपासून आमच्यावरील गुन्हेगारीचा कलंक पुसला जाईल, अशी भावना समलैंगिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. भारतात समलैंगिकता अपराध नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशभरात समलैंगिक नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्रासह देशभरात एकमेकांना शुभेच्छा देऊन ते आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. आम्हाला शेवटी न्याय मिळाला. आम्ही स्वतंत्र भारतात स्वतंत्र आहोत, अशा शब्दात समलैंगिक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते अशोक राव कवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते हमसफर या समलैंगिक चळवळ चालवण्यार्‍या संस्थेचे संस्थापक आहेत.
नाझ फाऊंडेशनची याचिका
कलम ३७७ च्या विरोधात सर्वप्रथम नाझ फाऊंडेशन या संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली. २००१ मध्ये संस्थेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर २ जुलै २००९ मध्ये उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. दोन प्रौढ व्यक्तींमधील खाजगी लैंगिक संबंध जर संमतीने असतील तर तो गुन्हा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्याला पुढे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर आक्षेप घेत समलैंगिक संबंधास भादंविच्या कलम ३७७ अन्वये अवैध ठरवले. २०१३ मध्ये सुरेशकुमार कौशल विरुद्ध नाझ फाउंडेशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय बदलला होता. त्याविरोधात ही याचिका करण्यात आली होती. पण, त्यावर अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आपला निर्णय बदलला आहे.
कलम ३७७ म्हणजे नेमके काय?
भारतीय दंड विधान कलम ३७७ अन्वये दोन व्यक्ती एकमेकांच्या सहमतीने किंवा असहमतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करतील तर समलैंगिकता हा गुन्हा ठरविण्यात येतो. या कलमानुसार गुन्ह्यातील आरोपींना दहा वर्षांपासून ते जन्मठेपपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
भारतात १८६२ रोजी ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी थॉमस बॅबिग्टंन मॅकोले याने भारतीय संहितेत कलम ३७७ टाकण्याचे ठरवले. एखाद्याने निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन कोणतीही लैंगिक कृती केल्यास त्याला जन्मठेप किंवा दहा वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. त्यानंतर १९६७ साली ब्रिटनमध्ये यात गुन्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यात आले होते. थॉमस बॅबिग्टंन मॅकोले हे इतिहासकार होते. त्यांची १८३० मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सदस्य म्हणून निवडण्यात आले होते.

Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (371 of 1770 articles)

Sushma Swaraj1
स्वराज यांचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ डिसेंबर - सीमेपलीकडील दहशतवादाला पाकिस्तानचेच समर्थन असल्याचे खडे बोल परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा ...

×