ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर

सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आला समोर

►टीकाकारांना सडेतोड उत्तर,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २८ जून –

Surgical Strike Videos

Surgical Strike Videos

जम्मू-काश्मीरच्या उरी येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय जवानांनी गुलाम काश्मिरात घुसून केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ समोर आल असून, भारतीय जवानांनी गुलाम काश्मिरातील दहशतवादी शिबिरे उद्ध्वस्त करीत अतिरेकी आणि पाकिस्तानी सैनिकांची कशी दाणादाण उडवली होती, हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि जवानांच्या शौर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार्‍या विरोधकांना यामुळे सडेतोड उत्तर मिळाले आहे.
सुमारे २१ महिन्यानंतर या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ समोर आला. या आठ मिनिटांच्या व्हिडीओत जवानांचे अद्वितीय शौर्य दाखविण्यात आले आहे. भारतीय लष्करातील पॅरा कमांडोंच्या आठ पथकांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. या दरम्यान जवानांनी रॉकेट लॉन्चर, लहान क्षेपणास्त्र आणि अत्याधुनिक शस्त्रांसह हल्ला केला होता. सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करून सर्व कमांडो सुरक्षितपणे मायभूमीत परतले होते. ड्रोनच्या मदतीने सर्जिकल स्ट्राईकचा हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता.
सर्जिकल स्ट्राईकची संपूर्ण मोहीम सहा तास सुरू होती. मध्यरात्री पहिला हल्ला करण्यात आला, तर शेवटचे ठिकाण सकाळी सहा ते सव्वासहाच्या काळात उद्ध्वस्त करण्यात आले होते.
पाकी अतिरेक्यांनी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये १८ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय जवानांच्या कॅम्पवर हल्ला केला होता. यात १९ जवान शहीद झाले होते. पाकला अद्दल घडविण्यासाठी भारत सरकारने सर्जिकल स्ट्राईकची योजना आखली आणि उरी हल्ल्याच्या ११ दिवसांनंतर गुलाम काश्मिरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सच्या सात तुकड्यांनी ही कामगिरी केली होती. या तुकड्यांमध्ये १५० जवान होते. सर्जिकल स्ट्राइकच्या काळात शत्रूंच्या रडार यंत्रणेला चकमा देण्यासाठी ३० जवानांचे पथक तैनात होते. यात पाकच्या भूमीतील अतिरेक्यांची शिबिरे उद्ध्वस्त करतानाच, सुमारे ४० अतिरेकी काही पाकी सैनिकांनाही ठार मारण्यात आले होते.
काँग्रेसने नेहमीच लष्कराचे मनोधैर्य खचवले
सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ जारी करण्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसने नेहमीच लष्कराचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते रविशंकरप्रसाद यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख औरंगजेब असा करून काँग्रेसने राजकारणाची खालची पातळी गाठल्याचा आरोपही रविशंकरप्रसाद यांनी केला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत रविशंकर प्रसाद म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख राहुल गांधी यांनी रक्ताची दलाली अशा अतिशय घृणास्पद शब्दात केला होता. सोनिया गांधी यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. सततच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यामुळे काँग्रेसने आतापर्यंत लष्कराचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न केला. आता मात्र काँग्रेस औपचारिकपणे जवानांची स्तुती करीत आहे.
काँग्रस नेत्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. ज्याप्रमाणे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना लष्कर-ए-तोयबाकडून प्रमाणपत्र मिळाले, तसेच प्रमाणपत्र आता काँग्रेसलाही विविध अतिरेकी संघटनांकडून मिळणार आहे. आपल्या देशविघातक वक्तव्यातून काँग्रेस नेते अतिरेकी संघटनांचे मनोधैर्य वाढवत आहे, असा आरोप त्यांनी केला.
शस्त्रास्त्रांच्या खरेदीत काँग्रेसने प्रत्येक वेळी दलाली घेतली. दलाली घेतल्याशिवाय काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्रांची कोणतीच खरेदीच झाली नाही. मोदी सरकारच्या राजवटीत मात्र दलाली पूर्णपणे बंद झाली, दलाल आणि मध्यस्थांसाठीचे दरवाजे बंद झाले. जे काम होण्यासारखे आहे, ते होईलच, पण जे होण्यासारखे नाही, ते काहीही केले तरी होणार नाही, अशी मोदी सरकारची कार्यपद्धती आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
सर्जिकल स्ट्राईकचा तो व्हिडीओ काँग्रेसला खरा वाटतो की खोटा, सर्जिकल स्ट्राईक करणे चूक होते की बरोबर, याचे उत्तर काँग्रेस पक्षाने दिले पाहिजे, अशी मागणी करत प्रसाद म्हणाले की, गुलाम काश्मिरात घुसून लष्कराच्या बहादूर जवानांनी अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले, याबद्दल काँग्रेस पक्षाला काय वाटते, तसे त्यांनी सांगितले पाहिजे.
सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायद्यासाठी आम्हाला वापर करायचा नाही, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचलप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेखही केला नाही. लष्कराला कमजोर करून आम्हाला आमचे राजकारण करायचे नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीत या व्हिडीओचा वापर केला नाही. मात्र कधी देशहितांसाठी साहस दाखवावे लागते. धाडसी निर्णय घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे.
मोदी यांची तुलना काँग्रेसने कू्रर अशा औरंगजेबाशी केली, भारताचे राजकारण किती खालच्या पातळीवर आले याचे हे निदर्शक आहे, यातून काँग्रेसची विकृत मानसिकता दिसून येते, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
भाजपाने केला राजकीय फायद्यासाठी वापर
सर्जिकल स्ट्राईकचा उपयोग भाजपा राजकीय स्वार्थासाठी करीत आहे, याआधीही अनेक वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले, पण त्याचा प्रचार करण्यात आला नाही, या शब्दात काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी आज भाजपावर हल्ला चढवला.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सुर्जेवाला म्हणाले की, जय जवान जय किसानचा नारा देत मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचा मते मिळवण्यासाठी उपयोग करत आहे. या आधी देशात असे कधीच झाले नाही. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्जिकल स्ट्राईकचा उपयोग आपल्या राजकीय फायद्यासाठी केला होता, प्रचारासाठी ठिकठिकाणी बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले होते. हे बरोबर नाही. सर्जिकल स्ट्राईकचे सगळे श्रेय लष्कराच्या साहसाला द्यायला पाहिजे, कोणत्याच पक्षाने त्याचा राजकीय उपयोग करायला नको. अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या याच्या कार्यकाळातही लष्कराने असेच साहस अनेक वेळा दाखवले होते, पण या दोघांनी त्याचे श्रेय लाटण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. २००० नंतर तीनवेळा यशस्वीपणे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले, पण त्याचा गवगवाही कधीच करण्यात आला नाही. लष्कराच्या पराक्रमावर स्वत:च्या राजकीय फायद्याच्या पोळ्या लाटण्याचा प्रयत्न भाजपाने करू नये, असा इशारा सुर्जेवाला यांनी दिला.

Posted by : | on : 29 Jun 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (1043 of 1865 articles)


हल्लाबोल, संत कबीरनगर, २८ जून - काही राजकीय पक्षांना शांतता आणि विकास मान्यच नाही. ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या मनात ...

×