ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सर्व उमेदवारांनी गुन्हेगारी पृष्ठभूमी जाहीर करावी

सर्व उमेदवारांनी गुन्हेगारी पृष्ठभूमी जाहीर करावी

►सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
►कलंकितांवरील बंदीसाठी कायदा करावा,
नवी दिल्ली, २५ सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही अस्वस्थ करणारी बाब आहे, अशी गंभीर खंत व्यक्त करताना, सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक लढण्यापूर्वी त्यांच्या गुन्हेगारी पृष्ठभूमीची माहिती निवडणूक आयोगाकडे जाहीर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी दिले.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखणे न्यायालयाच्या अखत्यारीत नाही. यासाठी संसदेनेच कायदा तयार करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट करताना, आपण ज्याला मतदान करीत आहोत, त्या उमेदवाराची पृष्ठभूमी काय आहे, हे जाणून घेण्याचा मतदारांना पूर्ण अधिकार आहे, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले आहे.
गंभीर फौजदार गुन्ह्यात अडकलेल्या व्यक्तीला संसद किंवा विधिमंडळात प्रवेश करण्यापासून आणि कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण यामुळे भारतीय लोकशाहीच्या मूळांवर मोठा आघात होत आहे. गुन्हेगारांच्या राजकारणातील प्रवेशावर कायमचे निर्बंध घालण्यासाठी संसदेने शक्य तितक्या लवकर कायदा तयार करण्याची गरज आहे, असेही घटनापीठाने स्पष्ट केले.
निवडणूक लढणार्‍या राजकीय बहुतांश राजकीय उमेदवारांची पृष्ठभूमी मतदारांना माहीत नसते. कारण, ते स्वत:विषयीची माहिती लपवत असतात. त्यामुळे निवडणूक आयोगानेच अशा लोकांची संपूर्ण माहिती विशेषत: त्यांच्यावर असलेल्या गंभीर गुन्हेगारी आरोपांची माहिती निवडणुकीपूर्वीच जाहीर करायला हवी, जेणेकरून मतदार सावध होतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
उमेदवारांनी देखील आपल्या राजकीय पक्षांना स्वत:च्या गुन्हेगारी पृष्ठभूमीची सविस्तर माहिती द्यायला हवी आणि अशा उमेदवारांची माहिती प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून ठळकपणे प्रसिद्ध करायला हवी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
लक्ष्मणरेषा ओलांडणार नाही
यावेळी महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी, न्यायपालिका आणि विधिपालिका यांचे स्वतंत्र अधिकार असल्याने न्यायालयांनी आपली लक्ष्मणरेषा पार करायला नको, अशी भूमिका विशद केली. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही देखील विधिपालिकेच्या अधिकारक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी इच्छुक नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण व्हायला नको, असे आम्हालाही वाटते, पण यासाठी संसद आणि विधिमंडळांनीच कायदा करायला हवा.
त्या उमेदवारांना रोखू शकत नाही
गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून रोखण्याचा कायदा संसदेनेच तयार करायला हवा. ही बाब देखील आमच्या अधिकारक्षेत्रात नाही. त्यामुळे आम्ही त्यांना निवडणूक लढण्यापासून अपात्र ठरवू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
३४ टक्के खासदार कलंकित
२०१४ च्या निवडणूक शपथपत्रानुसार, ३४ टक्के खासदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यामुळे कायदा तोडणारेच कायदा तयार करू शकतात का, असा सवाल अश्‍वनी उपाध्याय यांनी याचिकेतून केला होता.

Posted by : | on : 26 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (942 of 2226 articles)


न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा, नवी दिल्ली, २५ सप्टेंबर - लोकप्रतिनिधी अर्थात् खासदार किंवा आमदार म्हणून निवडून येणार्‍या वकिलांना न्यायालयांमध्ये वकिली करण्यापासून ...

×