ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » साखर उद्योगासाठी ५५०० कोटींचे नवे पॅकेज

साखर उद्योगासाठी ५५०० कोटींचे नवे पॅकेज

नव्या दूरसंचार धोरणाला मान्यता
►केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय,
नवी दिल्ली, २६ सप्टेंबर –

Modi Sarkar

Modi Sarkar

अडचणीत असलेल्या देशातील साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने ५५०० कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची आज घोषणा केली. दूरसंचारबाबतच्या नवीन धोरणालाही आज मान्यता देण्यात आली. पाटणा विमानतळावर आंतरदेशीय विमानस्थानक बनवण्याचा निर्णयही आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नंतर पत्रपरिषदेत या निर्णयांची माहिती दिली.
देशात साखरेच्या वाढत्या उत्पादनामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व्यापक धोरण तयार करण्यात आले आहे, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, गेल्या वर्षी तसेच याही वर्षी देशात ऊसाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे, त्यादृष्टीनेही सरकारचे नवीन धोरण उपयुक्त ठरणार आहे. साखर कारखान्यांना वाहतूक, हाताळणी तसेच निर्यातीसाठी विशेष अनुदान देण्यात येणार असल्याचे जेटली यांनी सांगितले. साखर कारखान्यांसाठी देण्यात येणार्‍या विशेष पॅकेजचा लाभ प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. ५० लाख टनापयर्र्ंतच्या साखरेच्या निर्यातीसाठी वाहतुकीची सबसिडीही साखर कारखान्यांना मिळणार आहे.
नवीन दूरसंचार धोरण
दूरसंचारबाबतच्या नवीन धोरणालाही आज मान्यता देण्यात आली, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, दूरसंचार क्षेत्रात २०२२ पर्यंत १० हजार कोटी डॉलर्सची गुंतवणूक होईल, तसेच यातून ४० लाख नवे रोजगार उत्पन्न होतील, असा आमचा विश्‍वास आहे. राष्ट्रीय डिजिटल संचार धोरणाला मंजुरी देतांना टेलिकॉम कम्युनिकेशन यापुढे डिजिटल कम्युनिकेशन कमिशन म्हणून ओळखले जाईल, असे जेटली म्हणाले.
राष्ट्रीय डिजिटल संचार धोरणानुसार जलदगतीच्या ब्रॉडबॅण्ड सेवेचा विस्तार करण्याचा, फाईव्ह जी तसेच ऑप्टिकल फायबरसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य दरात जनतेला लाभ दिला जाणार आहे. यापुढे सर्वांना ५० मेगाबिट प्रतिसेकंदच्या गतीने ब्रॉडबॅण्ड सेवा मिळेल, अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.
जीएसटी नेटवर्क सरकारी बनवणार
जीएसटी नेटवर्क ही कंपनी १०० टक्के सरकारी बनवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, जीएसटी नेटवर्क कंपनी बनवण्याचा निर्णय संपुआच्या काळात घेण्यात आला होता. त्यावेळी कंपनीत ४९ टक्के सरकारचे, तर ५१ टक्के वित्त संस्थांचे भांडवल राहणार होते, तसेच या कंपनीचे स्वरूपही खाजगीच राहणार होते. विशेष म्हणजे सरकारी भांडवलात राज्य तसेच केंद्र सरकारचाही हिस्सा राहणार होता. त्यामुळे त्यात बदल करून ही कंपनी आता १०० टक्के सरकारी करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
पाटणा विमानतळ
पाटणा विमानतळावर आंतरदेशीय विमानस्थानक बनवण्यालाही आज मान्यता देण्यात आली, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, यासाठी १२१७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाटण्याचे पाटलीपुत्र अशोक हॉटेल तसेच गुलमर्गचे निर्माणाधीन हॉटेलचे काम अजून पूर्ण होऊ शकले नाही, ते राज्य सरकारांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जेटली यांनी सांगितले.
छत्तीसगडमध्ये कथगौरा ते दोनगडपयर्र्त नवा रेल्वेमार्ग उभारण्यालाही आज मंजुरी देण्यात आली, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, २९४ किमी लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी ५९५० कोटी रुपये खर्च येणार आहे, जो केंद्र आणि राज्य सरकार वाटून घेणार आहे.
मेडिकल कौन्सिल कायद्यात सुधारणा करण्याबाबतच्या एका अध्यादेशालाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, तसेच त्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तबही केले, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, विशेषज्ञांची एक समिती मेडिल कौन्सिलचे नियंत्रण करणार आहे.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (252 of 1774 articles)


वंचितांचे सशक्तीकरण ►सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, २६ सप्टेंबर - केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण आधार योजना घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा निर्णय आज ...

×