ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना फसवणुकीचा धोका जास्त

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना फसवणुकीचा धोका जास्त

रिझर्व्ह बँकेच्या अहवालातील आकडेवारी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २९ ऑगस्ट –

Rbi2

Rbi2

खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना फसवणुकीचा धोका जास्त आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या २०१७-१८ च्या वार्षिक अहवालातील आकडेवारीतून हा धोका स्पष्ट झाला आहे. २०१७-१८ या कालावधीत सार्वजनिक बँकांना गंडा घालण्याचे प्रमाण तब्बल ९२.९ टक्के, तर खाजगी बँकांचे प्रमाण केवळ सहा टक्के असल्याचे या अहवालातून समोर आलेे. ३१ मार्च २०१८ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रांतील घोटाळा करण्यात आलेल्या खात्यांतील एकूण रकमेचे प्रमाण हे ८५ टक्के, तर खाजगी बँकांमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांच्या वर होते.
बँकिंग घोटाळे आता सर्वसामान्य बाब झाली आहे. दहा वर्षांपूर्वी बँक घोटाळ्यात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांची आकडेवारी ही ४५०० च्या जवळपास होती. ही आकडेवारी आता वाढली असून, २०१७-१८ मध्ये ५८३५ बँकिंग घोटाळ्याचे खटले दाखल करण्यात आले. याच कालावधीत घोटाळ्याच्या रकमेतही मोठी वाढ होऊन ४१० अब्ज रुपयांचा घोटाळा झाला आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी २०१७-१८ मध्ये केलेल्या बँक घोटाळ्यामुळे ही रक्कम प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कर्ज घेऊन केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ७५ टक्के घोटाळे हे एक लाखापेक्षा जास्त रकमांचे आहे. बँकेतील ठेवींच्या आधारे फसवणूक करण्याचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये घेतलेल्या कर्जावर फसवणुकीचे प्रमाण ८७ टक्के, तर खाजगी क्षेत्रामध्ये हे प्रमाण ११ टक्के आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँंकांमधील ताळेबंदाव्यतिरिक्त पतपत्र (एलसी), वचनपत्र (एलओयू) आणि सहमतीपत्राच्या आधारे ९६ टक्के घोटाळे करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये झालेले २० टक्के घोटाळे रोख, धनादेश, समशोधन आणि विदेशातील व्यवहारांवर झाले आहेत. खाजगी आणि विदेशातील बँकांची ३६ टक्के फसवणूक सायबर घोटाळ्याच्या माध्यमातून झाली आहे. हे घोटाळे डेबिट, क्रेडिट, एटीएम कार्ड आणि इतर माध्यमांतून करण्यात आल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. संपत्तीच्या वर्गीकरणातील तफावत दूर करणे आणि बँकेच्या कर्ज विभागात योग्य तरतुदी करून या बँकिंग घोटाळ्यांना पायबंद घालणे शक्य आहे, असे वाय. एच. मालेगाम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालामध्ये संपत्तीच्या वर्गीकरणातील उच्च श्रेणीचे विचलन आणि रिझर्व्ह बँकेच्या पर्यवेक्षी मूल्यांकनात आणखी काही सुधारणा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच या घोटाळ्यांना पायबंद घालून सुरक्षात्मक उपाय करणे गरजेचे असल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले. या व्यतिरिक्त भारतीय बँकांची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी २०१७-१८ मध्ये एक योजना तयार करण्यात आली. याबाबत धोरण आणि हस्तक्षेप करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची तपासणीही केली जाणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Posted by : | on : 30 Aug 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (742 of 1851 articles)

City Naxal Varavara Rao, Vernon Gonsalves, Sudha Bharadwaj
हत्येचा कटप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई ►मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त ►भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण, वृत्तसंस्था पुणे, २८ ऑगस्ट - पुण्याजवळील ...

×