ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके

सीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट

Indian Gallantry Police Award

Indian Gallantry Police Award

काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती देणार्‍या दोन केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना सर्वोच्च राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने आज विविध राज्यांतील ९४२ पोलिसांना आणि निमलष्करी दलाच्या जवानांना पोलिस पदक जाहीर केले.
काश्मीरमधील कॉन्स्टेबल शरीफ-उद-दीन गनी आणि हेड कॉन्स्टेबल मोहंमद ताफील यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलिस पदक घोषित करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि नक्षलविरोधी अभियानादरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या केंद्रीय राखीव पोलिस दलातील ८९ जवानांना पोलिस पदक जाहीर करण्यात आली.
केंद्रीय राखीव पोलिस दलाला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक पोलिस पदके आहेत, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
सीआरपीएफनंतर सर्वाधिक पोलिस पदके जम्मू-काश्मीर पोलिस दलाला मिळाली आहेत. जम्मू-काश्मीरमधील ३७ कर्मचार्‍यांना शौर्य पदके प्राप्त झालीत. त्यानंतर ओडिशा पोलिसांना ११, सीमा संरक्षण दलास (बीएसएफ) १०, महाराष्ट्र पोलिसांना आठ, छत्तीसगड पोलिसांना सहा राष्ट्रपती पोलिस पदके प्राप्त झाली आहेत. यंदा १७७ राष्ट्रपती पोलिस पदके देण्यात आली आहेत, असे सरकारने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. काश्मीर खोर्‍यामध्ये दहशतवाद विरोधी कारवायांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वाधिक शौर्य पदके या भागातील पोलिस दलांना प्राप्त झाली. या मोहिमा सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिस, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सैन्याद्वारे संयुक्तरीत्या राबविल्या जातात, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. यंदा एकूण ६७५ विशेष सेवा पदक आणि ८८ सेवा पदक पोलिसांना देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
१० बांगलादेशींना अंदमानमध्ये अटक
पोर्ट ब्लेअर : उत्तर अंदमान बेटावर बनावट कागदपत्रे तयार करून भारतात अवैधरीत्या राहात असलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना दिग्लीपूर भागातून सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. प. बंगालचे नागरिक असल्याचा दावा या लोकांनी केला आहे. तथापि, त्यांनी सादर केलेले रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Posted by : | on : 15 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (991 of 2042 articles)

Police Padak Madels
शौर्य, तीन राष्ट्रपती पदकांचा समावेश, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १४ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज मंगळवारी पोलिस पदके जाहीर ...

×