ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सीबीआयमध्ये नव्या नियुक्त्या होणार

सीबीआयमध्ये नव्या नियुक्त्या होणार

►पंतप्रधान घेणार पुढाकार
►अधिकार्‍यांमधील वाद विकोपाला,
नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर –

Cbi 1

Cbi 1

सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई संपुष्टात आणण्यासाठी आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. या सार्‍या प्रकारावर मोदी यांनी नाराजी व्यक्त केली असून पंतप्रधान आता या पदावर नव्याच व्यक्तीची नियुक्ती करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सीबीआयने आपल्याच मुख्यालयामध्ये छापा मारून मांस विक्रेता मोईन कुरेशी भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच या खटल्याला कमकुवत केल्याच्या आरोपाखाली तपास अधिकारी आणि राकेश अस्थाना यांच्या पथकामधील महत्त्वाचे सदस्य डीएसपी देवेंद्र कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींवर केंद्र सरकारची करडी नजर असून त्याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पाचारण केले जाऊ शकते.
देशाची सर्वोच्च तपास संस्थेमध्येच अशा प्रकारे घडामोडी घडत असल्याने रविवारी मध्यरात्रीपासूनच पंतप्रधान कार्यालयामध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. वर्चस्वाची लढाई लढत असलेले दोन वरिष्ठ अधिकारी आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोघांनाही बोलावून पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्यातील वाद लवकरात लवकर मिटविण्याचे प्रयत्न केले. दोन्ही अधिकार्‍यांनी सीबीआयपासून वेगळे व्हावे, असेही मोदी यांना सूचविले असल्याचे कळते.
आलोक वर्मा यांचा कार्यकाळ पुढील तीन महिन्यांपर्यंत आहे. राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी असून ते मोदी यांचेच विश्‍वासू असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बैठकीच्या एक तासानंतर डीएसपी देवेंद्र कुमार यांना अटक झाली. यानंतर अन्य अधिकार्‍यांच्या घरांवर सीबीआयने छापे टाकल्याने हा वाद वाढू लागला आहे. हा वाद आता न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे. छाप्यांमध्ये बरेच कागद आणि डायर्‍या जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, सीबीआयने याबाबत काहीच माहिती दिली नाही.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अस्थाना आरोपी क्रमांक एक आहेत. त्यांच्यासह अन्य दोन अधिकार्‍यांवर कुरेशीकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. याबाबतचा गुन्हा १५ ऑक्टोबरलाच नोंदविण्यात आला होता. मात्र, देवेंद्र कुमार यांची अटक ही वेगळ्या कारणातून करण्यात आली आहे. संचालक आलोक वर्मा यांच्या विरोधातील केस मजबूत करण्यासाठी बनावट पुरावे तयार केल्याचा कुमार यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. देवेंद्र यांनी लाच प्रकरणातील आरोपी सतीश सना याची २६ सप्टेंबर २०१८ ला जबानी नोंदवल्याचे सांगितले आहे. मात्र, सना हा त्या दिवशी हैदराबादमध्ये होता.
सना याच्या बनावट जबानीच्या आधारावर अस्थाना यांनी पीएमओ आणि सीव्हीसीकडे आलोक वर्मा यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. यामुळे अस्थाना यांच्यावरही कारवाई होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे नव्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अस्थाना यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणाचीही परवानगीची आवश्यकता नसल्याची माहिती आहे.
दोन्ही अधिकार्‍यांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे तो मिटण्याची शक्यता कमीच वाटत असल्यामुळे सरकार आता कायदेशीर मार्गाने दोन्ही अधिकार्‍यांना रोखण्याचा मार्ग पत्करू शकते. सीबीआयमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारच्या अधिकार्‍याने सांगितले.
अस्थाना न्यायालयात शरण
डीएसपी देवेंद्र कुमार यांना यांना आज पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने कुमार यांची १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली, तर कुमार यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, सीबीआयचे क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांनीही न्यायालयात शरणागती पत्करली असून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्याविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासह कोणतीही मोठी कारवाई न करण्याची मागणी केली आहे. अस्थाना यांनी कुरेशी प्रकरणात चौकशी करीत असलेल्या आरोपीकडून दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने स्वत:च्याच मुख्यालयात छापे टाकले होते. यावेळी देवेंद्र कुमारकडून आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. देवेंद्र यांच्या घरावरही रविवारी छापा टाकण्यात आला होता.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (119 of 1770 articles)

Railway1
नोव्हेंबरपासून देशभरात योजना लागू, नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर - रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी स्थानकांवर लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याच्या कटकटीपासून लवकरच मुक्तता ...

×