ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सुनावणीचे करता येणार थेट प्रक्षेपण

सुनावणीचे करता येणार थेट प्रक्षेपण

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय,
नवी दिल्ली, २६ सप्टेंबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

सर्वोच्च न्यायालयाने आज काही ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे काही महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या कामकाजाचे म्हणजेच खटल्याच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. मात्र, अयोध्या आणि आरक्षणासंदर्भातील संवेदनशील प्रकरणे सोडून इतर खटल्यांचे थेट प्रक्षेपण करता येईल, असेही न्यायालयाने या निर्णय जाहीर करताना म्हटले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयातूनच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता देशहिताच्या प्रकरणांची सुनावणी तुम्हाला थेट पाहता येणार आहे. थेट प्रक्षेपणामुळे थेट युक्तिवादही पाहता येणे शक्य होणार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारात पारदर्शकता येईल.
या प्रकरणावर २४ ऑगस्ट रोजी निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
गेल्या सुनावणीच्या वेळी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले होते की, न्यायालयात होणारी सुनावणी थेट पाहायला मिळाली पाहिजे. वकिलांची शिस्त कायम ठेवणेही गरजेचे आहे. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनीही, वकिलांची शिस्त कायम ठेवण्यासाठी एक नियमावलीही बनवली गेली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्याने दाखल केली होती याचिका
जोधपूर येथे विधिविषयक शिक्षण घेत असलेल्या स्वप्निल त्रिपाठी नावाच्या एका विद्यार्थ्याने या न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण व्हावे म्हणून एक याचिका दाखल केली होती. आज न्यायालयाने या याचिकेवर अंतिम सुनावणी करताना ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. स्वप्निलप्रमाणेच ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनीही या प्रकरणी एक याचिका दाखल केली होती.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (255 of 1774 articles)

Cow Goseva
कंपन्यांनी केला करार, कोलकाता, २६ सप्टेंबर - काही विदेशी कंपन्या देशातील गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत आहेत. ...

×