सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » सॅनिटरी नॅपकिन करमुक्त

सॅनिटरी नॅपकिन करमुक्त

►जीएसटी परिषदेत झाला निर्णय
►बांबूनिर्मिती वस्तूंवरही कर कमी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ जुलै –

Gst Council Meeting Arun Jaitley

Gst Council Meeting Arun Jaitley

महाराष्ट्राने केलेल्या मागणीप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे देशाच्या ग्रामीण भागातील महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहेत. शिवाय कें द्र सरकारच्या स्वच्छता अभियानाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. बैठकीसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सॅनिटरी नॅपकिनवर याआधी १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. त्यामुळे देशभरातील महिलांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी हटवण्यात यावा, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. राज्य सरकारनेही जीएसटी परिषदेकडे सातत्याने ही मागणी लावून धरली होती. या निर्णयाचे स्वागत करताना सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले. सॅनिटरी नॅपकिनवरील कर शून्यावर आणल्याने आता स्वच्छता अभियानामध्ये सर्व महिला स्वतात मिळणार्‍या सॅनिटरी नॅपकिनचा वापर करू शकतात, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
याबरोबरच बांबूपासून तयार करण्यात येत असलेल्या वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत हा कर १८ इतका होता. त्यात कपात करत तो १२ टक्क्यांवर आणला गेला आहे. या निर्णयामुळे बांबूंपासून तयार होणार्‍या वस्तूंच्या निर्मितीला चालना मिळणार आहे.
या बैठकीमध्ये २८ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून अनेक वस्तूंना वगळण्यासह इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
याआधी दोन मोठे बदल
याआधी नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत २१३ वस्तू २८ टक्के जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढून १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्यात आला, तर पाच टक्के जीएसटी आकारल्या जाणार्‍या सहा वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्यात आला. पंचतारांकित हॉटेलमधील रेस्टॉरेंटवगळता इतर हॉटेलवरील १८ टक्के जीएसटी घटवून तो पाच टक्के करण्यात आला होता. जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत ५४ सेवा आणि २९ वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. २०१७-१८ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून ७.४१ लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या कालावधीत दरमहा ८९,८८५ कोटी रुपये सरकारला प्राप्त झाले. यंदाच्या आर्थिक वर्षात १.०३ लाख कोटी रुपयांची विक्रमी करप्राप्ती झाली. मात्र, मे व जून महिन्यात यात घसरण होऊन अनुक्रमे ९४,०१६ कोटी आणि ९५,६१० कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात बांबू संशोधन केंद्र : मुनगंटीवार
बांबूपासून तयार होणार्‍या फर्नीचर तसेच बांबूपासून केलल्या फ्लोरिंगवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशात बांबूच्या क्षेत्रात महाराष्ट्र उत्तम काम करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारले जात असल्याचे महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
राखी करमुक्त; इतरही अनेक वस्तू स्वस्त
रक्षाबंधनात बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, ही राखी करमुक्त करण्यात आली आहे. याशिवाय, पादत्राणे, लहान टेलिव्हीजन, वॉटर हीटर, इलेक्ट्रिक आयरन मशीन, फ्रिज, लिथियम इयॉन बॅटरीज, हेअर ड्रायर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स, खाद्यान्नांची उपकरणे, इथेनॉलच्या स्वस्त झालेल्या वस्तूंचा आज स्वस्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये समावेश आहे.

Posted by : | on : Jul 22 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (106 of 1851 articles)


►अमित शाह यांचा काँग्रेसला चिमटा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ जुलै - मोदी सरकारविरोधातील अविश्‍वास ठरावात विरोधकांचा जो पराभूत चेहरा पाहायला ...

×