ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » सेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ

सेशेल्समध्ये भारत उभारणार नाविक तळ

►हिंद महासागरात ताकद वाढणार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २५ जून –
हिंदी महासागरावर सध्या वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू असतानाच, सेशल्समध्ये भारताचे नाविक तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत आणि सेशेल्समध्ये आज सोमवारी याबाबतचा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.
दोन्ही देशांचे हित जोपासून, भारताने आपले नाविक तळ उभारावे, यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले. या नाविक तळामुळे हिंदी महासागरात भारताचे बळ वाढणार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सेशेल्सने आपल्या असम्शन बेटांवर भारताचा नाविक तळ उभारणीबाबतचा करार रद्द करण्याची घोषणा केली होती. या कराराबाबत सेशेल्सच्या मनातील सर्व शंकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निरसन केले आणि भारताच्या नाविक तळाला सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फाऊरे यांनी मान्यता दिली.
सुरक्षेसह विविध मुद्यांवर मोदी आणि डॅनी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर याबाबतच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. आम्ही परस्परांचे हित जोपासण्याचा निर्णय घेतला असून, हाच आमच्या कराराचा मुख्य भाग आहे, अशी घोषणा मोदी यांनी या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत केली.
१० कोटी डॉलर्सचे कर्ज
याच पत्रपरिषदेत मोदी यांनी सेशेल्सला १० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याचीही घोषणा केली. आमच्या देशाच्या लष्करी पायाभूत सुविधा या मदतीमुळे आणखी मजबूत होणार आहेत. यासाठी मी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारचे आभार मानतो, असे डॅनी फाऊरे यांनी सांगितले.
आम्ही एकमेकांचे अधिकार आणि हित मान्य करून असम्शन बेटांवरील नाविक प्रकल्पाबाबत एकत्रित काम करणार आहोत, असे मोदी यांनी सांगितले. तर, परस्तरांच्या हितांचा विचार करून या प्रकल्पावर एकत्र काम करू, असे डॅनी फाऊरे यांनी सांगितले.
एकूण सहा करारांवर स्वाक्षर्‍या
दोन्ही देशांमध्ये आज एकूण सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यात सेशेल्समधील पायाभूत सुविधांचा विकास करणे, सायबर सुरक्षा आणि व्हाईट शिपींग व्यवस्थेचा समावेश आहे.

Posted by : | on : Jun 26 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (464 of 2072 articles)


जेटली यांचा खोचक सवाल, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २५ जून - आपल्याच नागरिकांवर अत्याचार करणारा हिटलर आणि देशात आणिबाणी लागू करून ...

×