ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सोनिया, राहुल यांना ‘हाय’ झटका

सोनिया, राहुल यांना ‘हाय’ झटका

उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० सप्टेंबर –

Delhi High Court

Delhi High Court

२०११-१२ या आर्थिक वर्षातील करआढावा प्रकरण पुन्हा सुरू करण्याच्या आयकर विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी काँगे्रसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज सोमवारी फेटाळून लावली. त्यांना बसलेला हा मोठा धक्काच मानला जात आहे.
आयकर खात्याच्या या निर्णयाला काँगे्रसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांनीही आव्हान दिले होते, पण न्या. एस. रवींद्र भट आणि न्या. ए. के. चावला यांच्या खंडपीठाने त्यांची याचिकाही फेटाळली.
राहुल गांधी यांनी २०११-१२ या वर्षाच्या आयकर विवरणात त्यांना मिळणार्‍या उत्पन्नाबाबतची सत्यता लपवली होती, त्यामुळे या वर्षीचे प्रकरण आम्ही पुन्हा तपास करणार असल्याची भूमिका आयकर खात्याने १६ ऑगस्ट रोजी मांडली होती. यानंतर न्यायालयाने गांधींच्या याचिकेवरील निर्णय सुरक्षित ठेवला होता. आमचा अंतिम निर्णय होईपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल यांच्याविरोधात कुठलीच कारवाई केली जाऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने त्यावेळी दिले होते.
भाजपा नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीतून त्यांचे २०११-१२ मधील आयकर विवरणाचे प्रकरण समोर आले होते. राहुल आणि सोनिया यांनी केवळ ५० लाख रुपये भरून, यंग इंडियाला काँगे्रसच्या मालकीच्या असोसिएटेड जर्नल लि.कडून ९०.२५ कोटी रुपयांच्या वसुलीचे अधिकार प्राप्त केले होते. नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची मालकीही असोसिएटेड जर्नल लि.कडेच होती. केवळ ५० लाखांच्या भांडवलावर नोव्हेंबर २०१० मध्ये स्थापन झालेल्या यंग इंडिया असोसिएटेड जर्नलचे संपूर्ण अधिकार मिळाले होते.
काँगे्रसचा पर्दाफाश : भाजपा
दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया आणि राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावल्याने काँगे्रस पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे देखील यात गुंतले आहेत. काँगे्रस पक्षाने स्वत:चा विवेक विकला आहे, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.
धमक्यांना घाबरत नाही : काँगे्रस
आमच्या भारतबंदला मिळालेल्या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत आणि म्हणूनच त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले. केंद्र सरकारने कितीही दडपशाही केली तरी आम्ही घाबरणार नाही. नॅशनल हेरॉल्डमधून सरकारच्या विरोधात लिखान सुरूच राहील, असे काँगे्रसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (672 of 1862 articles)


नवी दिल्ली, १० सप्टेंबर - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून नीरव मोदीची बहीण- पूर्वीच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर ...

×