काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

►मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७…

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

►दिग्विजयसिंह, द्विवेदी, कमलनाथ, शिंदे बाहेर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७…

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

►केंद्र सरकारचे राज्यांना आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ जुलै…

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

►याचिकेवरील सुनावणी तहकूब, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ जुलै – भ्रष्टाचाराच्या…

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १६ जुलै – भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या…

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

►राजनाथसिंह यांनी घेतली शेख हसीनांची भेट, वृत्तसंस्था ढाका, १४…

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

►चार वेळा कामकाज तहकूब, तभा वृत्तसेवा नागपूर, १७ जुलै…

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

►विधानसभेत सभात्याग ►विधानपरिषदेत कामतहकुबी, तभा वृत्तसेवा नागपूर, १६ जुलै…

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

►स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल, तभा वृत्तसेवा मालेगाव,…

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी हटाव मोहीमेवर…

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

॥ विशेष : कृष्णा चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते | आधुनिक…

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

॥ रोखठोक : हितेश शंकर | आपल्या देशात एका…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:02 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सोनिया, राहुल यांनी माफी मागावी : भाजपा

सोनिया, राहुल यांनी माफी मागावी : भाजपा

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १६ एप्रिल –
काँग्रेसच्या नेत्यांनी भगवा आतंकवाद शब्दाचा वापर करून देशातील हिंदूंचा अपमान केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी आणि विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज केली.
२००७ मधील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणातील स्वामी असीमानंद यांच्यासह पाचही आरोपींची न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली, त्यानंतर काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना संबित पात्रा म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदम्बरम् सारख्या काँग्रेस नेत्यांनी भगवा आतंकवाद या शब्दाचा वापर करत देशातील हिंदूंचा अपमान केला होता. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करीत तेथील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. एनआयएने न्यायालयात या प्रकरणी योग्यप्रकारे बाजू मांडली नाही, या काँग्रेसने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा समाचार घेताना पात्रा म्हणाले की, काँग्रेसची ही प्रतिक्रिया लाजीरवाणी आहे, २-जी घोटाळ्याप्रकरणी जेव्हा न्यायालयाचा निर्णय आला तेव्हा काँग्रेसने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मक्का मशिद पाईपबॉम्ब प्रकरणात काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप पात्रा यांनी केला. २०१० मध्ये पी. चिदम्बरम् यांनी सर्वप्रथम भगवा आतंकवाद या शब्दाचा वापर केला होता, असा आरोप करीत संबित पात्रा म्हणाले की, २०१३ च्या काँग्रेस अधिवेशनात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद शब्दाचा वापर दुसर्‍यांदा केला होता. तुष्टीकरण आणि गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने हिंदूंना बदनाम केले.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापासून शिकत चिदम्बरम् आणि सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद या शब्दाचा वापर केला, त्यामुळे या दोघांनी देशवासीयांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत तेथील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संबित पात्रा यांनी दिला.
न्यायाधीशांचा राजीनामा
स्वामी असीमानंद यांच्यासह अन्य पाच जणांना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिल्यानंतर विशेष न्यायाधीश के. रवींद्र रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा महानगर सत्र न्यायाधीशांच्या सुपूर्द केला. आपण व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा देत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच मी यावर विचार करीत असून, निकालाचा माझ्या राजीनाम्याशी काहीच संबंध नाही, असे त्यांनी यात नमूद केले आहे.

Posted by : | on : Apr 17 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (415 of 1721 articles)


►भारतीय वेधशाळेचा अंदाज, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ एप्रिल - स्कायमॅटच्या पाठोपाठच आता भारतीय वेधशाळेनेही देशात यावर्षी मान्सूनचा पाऊस समाधानकारक राहणार ...

×