ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट –

Somnath Chaterjee

Somnath Chaterjee

लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांचे आज सोमवारी सकाळी येथील एका खाजगी रुग्णालयात वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व दोन मुली आहेत.
सोमनाथ चॅटर्जी यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती खालावत होती. त्यातच रविवारी सायंकाळी त्यांना आणखी एक सौम्य झटका बसला होता. अखेर आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास सोमनाथ चॅटर्जी यांनी जगाचा निरोप घेतला, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या वैद्यकीय पथकातील वरिष्ठ डॉक्टरने दिली.
गेल्या महिन्यात त्यांना मस्तिष्काघातही झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ४० दिवस उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले होते.
दहा वेळा खासदार
माकप नेते सोमनाथ चॅटर्जी, प्रसिद्ध वकील निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र होते. निर्मल चंद्र हिंदू महासभेचे अध्यक्ष होते तसेच १९५२ साली याच पक्षाचे खासदार म्हणून हुबळी मतदारसंघातून निवडूनही गेले होते, हे विशेष.
घरची अशी पृष्ठभूमी असतानाही सोमनाथ चॅटर्जी यांनी १९६८ मध्ये माकपमध्ये प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. २००८ पर्यंत ते माकपमध्ये सक्रिय सदस्य होते. १९७१ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. चॅटर्जी दहा वेळा लोकसभेचे खासदार होते. संपुआ सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत २००४ ते २००९ पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष होते.
माकपातून हकालपट्टी
२००८ मध्ये भारत-अमेरिका अणुऊर्जा करार विधेयकाच्या विरोधात माकपने संपुआ सरकारचा पाठिंबा काढला होता. तेव्हा सोमनाथ चॅटर्जी लोकसभा अध्यक्ष होते. माकपने त्यांना पद सोडण्यास सांगितले होते, पण त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून दु:ख
राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माकप नेते प्रकाश कारत, भाकपचे डी. राजा यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. सोमनाथदा हे भारतीय राजकारणातील अतिशय महान नेते होते. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी आपले दु:ख व्यक्त केले.

Posted by : | on : 14 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (466 of 1741 articles)


आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १३ ऑगस्ट - देशात लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या निवडणुका एकत्र ...

×