ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या निकालावर स्थगिती

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या निकालावर स्थगिती

►परीक्षेत घोटाळा झाल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ठपका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट –

Supreme Court 6

Supreme Court 6

सरकारी कार्यालये आणि मंत्रालयांमध्ये कर्मचार्‍यांची भरती करण्याकरिता मागील वर्षी घेण्यात आलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी स्थगिती दिली. या परीक्षेत घोटाळा झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
घोटाळा झालेल्या या परीक्षेचा फायदा मिळवून उमेदवारांनी सरकारी नोकरी प्राप्त करावी, असे आम्ही कदापि होऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यावर स्थगिती देत आहोत, असे न्या. शरद बोबडे आणि न्या. एल. नागेश्‍वर राव यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले. तत्पूर्वी सीबीआयने या प्रकरणातील आपला तपास अहवाल न्यायालयात सादर केला.
या अहवालाचा आम्ही बारकाईने अभ्यास केला आहे. कमिशनमधील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कस्टडीत ठेवण्यात आलेल्या प्रश्‍नपत्रिका लीक झाल्या असाव्या, अशी शंका अनेक उमेदवारांनी व्यक्त केली आहे. सीबीआयचा अहवालही तसेच काही संकेत देत आहे. प्रथमदर्शनी हेच दिसून येते की, या संपूर्ण परीक्षेतच मोठ्या प्रमाणात गडबड झालेली आहे. त्यामुळे ही परीक्षा निष्कलंक पार पडली, प्रश्‍नपत्रिका ज्यांच्या कस्टडीत होत्या, त्यांनी कुठलीच गडबड केली नसावी, यावर आम्ही सरसकट विश्‍वास ठेवू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने यावेळी सीबीआयचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजित बॅनर्जी यांचीही कानउघडणी केली. ही परीक्षा हाताळणार्‍या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकार्‍यांनी कुठलीच गडबड केली नाही, असा दावा तुम्ही कसा काय करू शकता. तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेत आहात, याचेच आम्हाला आश्‍चर्य वाटते. तुम्ही सीबीआयचे प्रतिनिधी आहात, त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात यावी, अशा भूमिकेची आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा होती. सीबीआयच्या चौकशी अहवालात काही अधिकार्‍यांच्या व्यवहारावर संशय घेण्यात आला असताना, तुम्ही मात्र सीबीआयच्या विरोधात भूमिका घेत आहात, असे न्यायालयाने त्यांना खडसावले.
शंतनू कुमार या उमेदवाराने ही याचिका दाखल केली होती. त्यांचे वकील प्रशांत भूषण आणि गोविंद जी यांनी, सीबीआयने आपल्या अहवालात पेपर फुटले असण्याची शक्यता नमूद केली आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आणि परीक्षेचा निकाल जाहीर करण्यावर स्थगिती आणली जावी, अशी विनंती केली.

Posted by : | on : 1 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (1090 of 2213 articles)

Vidhi Ayog
आयोगाची प्रस्तावाला मंजुरी ►घटना दुरुस्तीची केली शिफारस, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३० ऑगस्ट - सततच्या निवडणूक चक्रातून देशाला बाहेर काढण्यासाठी लोकसभा ...

×