ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » स्वच्छ पर्यावरणासाठी मोबिलिटी रोडमॅपचा शुभारंभ

स्वच्छ पर्यावरणासाठी मोबिलिटी रोडमॅपचा शुभारंभ

ई-वाहन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन,
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Pm Narendra Modi 2

Pm Narendra Modi 2

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सर्वसामान्य वाहतुकीची आधारशिला म्हणून इलेक्ट्रॉनिक्स व्हेईकल्सचा पर्याय देशापुढे सादर केला. यासाठीचा मोबिलिटी रोडमॅप (गतीशिलतेचा आराखडा) आज त्यांनी जाहीर केला. सोबतच, बॅटरींपासून तर स्मार्ट चॉर्जिंगपर्यंतच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्समध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
आर्थिक आणि पर्यावरणावरील खर्च वाचविण्यासाठी वर्दळमुक्त आणि पर्यावरणपूरक मोबिलिटी आज काळाची गरज आहे, असे पंतप्रधानांनी जागतिक मोबिलिटी शिखर परिषदेत (मूव्ह) बोलताना स्पष्ट केले.
सर्वसामान्य वाहतूक ही मोबिलिटी पुढाकाराचा आधारस्तंभ असायला हवी, असे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला कारच्याही पलीकडे जाऊन स्कूटर आणि रिक्षा यासारख्या अन्य वाहनांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. स्वच्छ मोबिलिटी आणि स्वच्छ इंधन हेच पर्यावरण बदलाविरोधातील आपले मुख्य शस्त्र आहे.
देशात ई-वाहनांच्या निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आणि प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. वाहनांची वर्दळ आणि गर्दीमुळे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था दोन्हीचे नुकसान होत आहे. ते कमी करण्यासाठी वर्दळमुक्त परिवहन व्यवस्था अतिशय महत्त्वाची आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक गतीने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे. या देशात शंभर स्मार्ट शहरांची निर्मिती होत आहे. नवीन विमानतळ आणि बंदरांसोबतच नव्या रेल्वे मार्गांचा अधिक गतीने विकास होत आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
प्रदूषणरहित स्वच्छ परिवहन व्यवस्थेमुळे आपल्या सभोवतालचे वातावरण आणि हवाही स्वच्छ होईल आणि त्यामुळे आपल्या नागरिकांचे आरोग्यही उंचावेल.
१५ टक्के विक्रीचे उद्दिष्ट
विषारी वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी आणि जीवाष्म इंधनाची आयात कमी करण्यासाठी देशातील सर्व वाहनांमध्ये ई-वाहनांच्या १५ टक्के उद्दिष्ट आपल्या सरकारने आगामी पाच वर्षांसाठी निर्धारित केले आहे. गेल्या वर्षी देशात दोन हजारावर ई-वाहनांची विक्री करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
सात ‘सी’चा मंत्र
मोदी म्हणाले की, भविष्यातील वाहतुकीच्या साधनांसंदर्भात माझे विचार सात ‘सी’ वर आधारित आहेत. कॉमन (समान), कनेक्टेड (जोडणी), कन्विनियंट (सुविधाजनक), कंजेशन-फ्री (वर्दळमुक्त), चार्ज (चार्ज झालेला), क्लीन (स्वच्छ) आणि कटिंग एज (अत्याधुनिक) हेच ते सात ‘सी’ असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (358 of 1770 articles)

Bjp Kamal New
वृत्तसेवा नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची द्विदिवसीय बैठक उद्या शनिवारपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. ...

×