कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » स्वामी असीमानंदांसह सर्व आरोपी निर्दोष

स्वामी असीमानंदांसह सर्व आरोपी निर्दोष

►मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण
►एनआयए कोर्टाचा निकाल,
वृत्तसंस्था
हैदराबाद, १६ एप्रिल –

Swami Asimanand

Swami Asimanand

२००७ मध्ये येथील मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व पाचही आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने आज सोमवारी निर्दोष मुक्तता केली.
सुमारे ११ वर्षांनंतर न्यायालयाने आपला निकाल दिला. आरोपींविरोधात एकही ठोस पुरावा सादर करण्यात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएला अपयश आले असल्याने सर्व आरोपींना दोषमुक्त करण्याचा आदेश आम्ही देत आहोत, असे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
८ मे २००७ रोजी मक्का मशिदीत शुक्रवारचा नमाज सुरू असताना शक्तिशाली स्फोट झाला होता. यात ९ जणांचा मृत्यू, तर अन्य ५८ लोक जखमी झाले होते. या प्रकरणी स्वामी असीमानंद यांना मुख्य आरोपी करण्यात आले होते. सोबतच, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, भारत मोहनलाल आणि राजेंद्र चौधरी यांच्यावरही एनआयएने आरोप ठेवले होते.
बॉम्बस्फोट झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी सुरुवातीचा तपास केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले आणि अखेर २०११ मध्ये एनआयएने तपासाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. खरं तर या प्रकरणात एकूण दहा लोकांवर आरोप ठेवण्यात आले होते. यातील संदीप डांगे आणि रामचंद्र कालसंग्रा हे अजूनही फरार आहेत, तर सुनील जोशी यांची हत्या झाली. अन्य दोघांविरुद्ध अजूनही तपास करण्यात येत आहे. एनआयएने या खटल्यात एकूण २२६ साक्षीदार आणि ४११ दस्तावेज सादर केले होते.
स्वामी असीमानंद यांनी २०११ मध्ये सत्र न्यायालयात दिलेल्या जबाबात अजमेर दर्गा, हैदराबाद येथील मक्का मशीद आणि अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट केल्याची कबुली दिली होती. मात्र काही दिवसातच त्यांनी आपला जबाब फिरवला होता. एनआयएने बळजबरीने आपल्याकडून हवा तसा कबुली जबाब घेतला होता, असा आरोप त्यांनी केला होता.
मक्का मशीद प्रकरणाचा घटनाक्रम
ऐतिहासिक मक्का मशिदीत २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत नऊ जणांचा बळी गेला होता. या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप हिंदू संघटना अभिनव भारतचे सदस्य स्वामी असीमानंदावर ठेवण्यात आला. त्यांना २०१० मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर सात वर्षांनी जामिनावर बाहेर आलेल्या असीमानंदांना आज न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम असा:
>१८ मे २००७ ः शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हैदराबादमधील ऐतिहासिक मक्का मशिदीमध्ये स्फोट घडवण्यात आला.
>जून २०१० ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता सुनील जोशी याचे नाव सीबीआयने आरोपी म्हणून निश्‍चित केले. जोशीची तीन अज्ञातांनी २९ डिसेंबर २००७ रोजी हत्या केली.
>९ नोव्हेंबर २०१० ः अभिनव भारतचे सदस्य जतीन चॅटर्जी उर्फ स्वामी असीमानंद यांना सीबीआयकडून अटक. सीबीआयकडून देवेंद्र गुप्ता व लोकेश शर्मासह अन्य आरोपींना अटक.
>१८ डिसेंबर २०१० ः स्फोटात सहभाग असल्याची असीमानंदांची न्यायालयात कबुली.
>एप्रिल २०११ ः प्रकरणाचा तपास सीबीआयकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्वत:कडे घेतला.
>२३ मार्च २०१७ ः हैदराबाद न्यायालयाने असीमानंदांना जामीन दिला.
>१५ फेब्रुवारी २०१८ ः २००८ मधील मालेगाव स्फोटातील आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मक्का मशीद बाँबस्फोटातील साक्ष फिरवली.
>१६ एप्रिल २०१८: स्वामी असीमानंदांसह पाचही आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले.

Posted by : | on : Apr 17 2018 | Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (6 of 2161 articles)

Mohan Bhagwat Vijayadashami Speech 2017
►विराट हिंदू संमेलनात सरसंघचालकांचे प्रतिपादन, तभा वृत्तसेवा मुंबई, १६ एप्रिल - [caption id="attachment_35703" align="alignleft" width="300"] Mohan Bhagwat Vijayadashami Speech 2017[/caption] ...

×