ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर –

Dr Mohanji Bhagwat4

Dr Mohanji Bhagwat4

हिंदुत्वाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोधून काढलेली नाही, तर ती अतिशय प्राचीन काळापासून आपल्या देशात अस्तित्वात आहे. रा. स्व. संघाचा कुणीही शत्रू नाही आणि जर कुणी असेल तर त्याला आम्ही आपलेसे करीत असतो, यालाच हिंदुत्व म्हणतात. संपूर्ण जग सुखाचा शोध बाहेर घेत असताना, आम्ही मात्र आपल्या अंतर्मनात शोध घेत होतो. त्यातूनच आम्हाला आपल्या पूर्वजांच्या एकतेचा मंत्र मिळाला, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज मंगळवारी केले.
दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित ‘भविष्यातील भारत आणि रा. स्व. संघाचा दृष्टिकोन’ यावरील तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवशी सरसंघचालक उपस्थितांना उद्बोधन करीत होते.
भारतीय हे नाव केवळ भुगोलापुरते मर्यादित नसून, ते एका स्वभावाचे नाव आहे. भारताला जे दुसर्‍या नावाने संबोधतात, त्यांनाही आमचा विरोध नाही, असे सांगताना सरसंघचालक म्हणाले की, धर्म या शब्दाबाबतही संभ्रम आहे. कारण, ‘रिलिजन’ या शब्दाचा अनुवाद जेव्हा धर्म असा केला जातो, तेव्हा खरा गोंधळ निर्माण होतो. धर्म हा मानव धर्मच आहे, कारण आम्ही स्वत:ला विश्‍वबंधुत्वापासून वेगळे मानले नाही. खाणे, पिणे, भाषा आणि वेशभूषा यासारख्या गोष्टींमधून हिंदुत्वाची संकल्पना निश्‍चित होत नाही.
हिंदुत्वाची निर्मिती भारतात झाली. सर्वांच्याच कल्याणात आपले कल्याण होवो, अशी शिस्त आणि संंतुलन हिंदुत्वात आहे. बंधुभाव देखील धर्म आहे. आपला सांस्कृतिक वारसा एकच आहे आणि आपली मातृभूमीही एक आहे. संपूर्ण समाजाचे संघटन हेच हिंदू संघटन आहे. आज अनेक प्रकारच्या वाईट प्रवृत्तींनी हिंदू समाजात प्रवेश केला आहे, त्यांचा नायनाट गरजेचा आहे. आमचे राष्ट्र प्राचीन आहे. त्याची कल्पना पाश्‍चात्त्यांच्या राष्ट्रकल्पनेने करणे योग्य नाही. पश्‍चिमेकडे राज्य असेल तर राष्ट्र असते. राज्य गेले की राष्ट्रही जाते. आमची ही व्याख्या नाही. राज्य बदलत जातात, पण आमचे राष्ट्र जे सांस्कृतिक आहे, ते कायम राहात आले आहे. पश्‍चिमेच्या देशांकडे विकासाची वेगळी धारणा आहे, आमची विकासाची धारणा वेगळी आहे. विकासाचे अंधानुकरण करणे आवश्यक नाही. आयुष्य यशस्वी तर हवेच, शिवाय ते अर्थपूर्णही हवे. ज्यामुळे मनात कुठलीही वैरभावना निर्माण होत नाही, अशा हिंदुत्वावर आमचा विश्‍वास आहे, असे विचारही डॉ. भागवत यांनी मांडले.
आम्ही सर्व संविधान-धर्माने बांधलेलो आहोत. संविधानाला मानूनच संघ चालतो. संविधानाविरुद्ध संघाने कार्य केले, असे एकही उदाहरण नाही, असेही ते म्हणाले.
हिंदुत्वाचे तीन आधार
आम्ही हिंदुत्वाचे तीन आधार मानतो. देशभक्ती, पूर्वजांचा गौरव आणि संस्कृती. याविषयी अजिबात दुमत नाही. हा सिद्धांत सर्वांसाठीच आहे. संविधानाचा सन्मान सर्वांनीच करायला हवा.
राजकारणापासून संघ दूर
संघाचे कार्य संपूर्ण समाजाला जोडण्याचे आहे. समाजसेवा हाच आमचा सिद्धांत आहे आणि म्हणूनच संघाने राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. अमूक राजकीय पक्षासाठी प्रचार करा, असेही संघाने आपल्या स्वयंसेवकांना कधीच सांगितलेले नाही. संघाचे स्वयंसेवक एका विशिष्ट पक्षातच का जातात, याचा खरे तर इतर राजकीय पक्षांनीच विचार करायचा आहे. संघाने आजवर कधीच निवडणूक लढली नाही आणि संघाचा पदाधिकारी कधीच राजकीय पक्षात पदावर राहणार नाही. राज्य कुणाचे असावे, याचा निर्णय मतदार घेत असतात. राष्ट्रीय धोरणाबाबत मात्र आमचे काही विचार आहेत. आपल्या शक्तीनुसार आम्ही प्रयत्न करीत असतो आणि हे प्रयत्न लोकशाहीच्या चौकटीत राहूनच असतात. संघाला राजकारणापासून दूर ठेवायचे आहे, पण त्याचवेळी घुसखोरांच्या मुद्यावर आम्ही शांत बसू शकत नाही. आम्ही आपले मत व्यक्त करणारच, असेही मोहनजी म्हणाले.
नागपुरहून दिशानिर्देश नाहीत
अनेकांना असे वाटते की, नागपूर हे संघाचे मुख्यालय असल्याने, या मुख्यालयातूनच फोन जात असावा आणि सरकारला संघाच्या सूचना प्राप्त होत असाव्यात. सरकारने जर आम्हाला एखाद्या विषयावर मत मागितले, तर आम्ही ते नक्कीच देत असतो. पण, सरकारच्या धोरणांवर आमचा प्रभाव नाही. केंद्रातील सरकारमध्ये असलेले आमचेच स्वयंसेवक आहेत आणि आपले काम कुठल्याही दबावाविना करण्यासाठी ते स्वतंत्र आहेत, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
महिलांना समानतेचा अधिकार
महिलांना स्वतंत्र आणि सक्षम करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे आपण महिलांना जगदम्बेच्या रूपात मानतो, पण प्रत्यक्षात आपला व्यवहार अगदी विरुद्ध असतो. महिलांना देवी बनवून, त्यांची मंदिरात पूजा करण्याची गरज नाही, तसेच त्यांच्यासोबत दासीसारखाही व्यवहार व्हायला नको. त्यांना समानतेचा अधिकार मिळावा, अशी आमची भावना असल्याचेही ते म्हणाले. घ(वृत्तसंस्था)
हिंदुत्व आणि मुसलमान
आम्ही म्हणतो की, आमचे हिंदुराष्ट्र आहे, पण हिंदुराष्ट्राचा अर्थ असा मुळीच नाही की, येथे मुसलमान नको. ज्या दिवशी आम्ही अशी भूमिका घेऊ तेव्हा हिंदुत्वाची भावना संपलेली असेल. सर्वांना सोबत घेऊनच भारत पुढे वाटचाल करू शकतो आणि हीच संघाची विचारधारा आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.

Posted by : | on : 19 Sep 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (635 of 1883 articles)

Cbi 1
घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ सप्टेंबर - माझी साक्ष जेव्हा घेण्यात आली होती तेव्हा मी पोलिस अधिकारी ...

×