ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » …ही तर मिनी लोकसभा निवडणूक!

…ही तर मिनी लोकसभा निवडणूक!

श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर –

Election Voting

Election Voting

निवडणूक आयोगाने आज छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा केल्यामुळे आधीच निवडणुकीच्या कामाला लागलेल्या राजकीय पक्षाच्या हालचालींना आता आणखी वेग आला आहे. या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाचा २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीवर थेट परिणाम होणार असल्यामुळे या निवडणुकांकडे मिनी लोकसभा निवडणूक म्हणून पाहिले जाणार आहे.
त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपा आणि काँग्रेस यांच्या दृष्टीने या निवडणुका जीवनमरणाच्या ठरणार आहेत. त्यामुळेच या दोन्ही पक्षांनी आपली पूर्ण ताकद या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पणाला लावली आहे. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा कौल मिळणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहेत. लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपासमोर या तीन राज्यांतील आपली सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे, तर या तीन राज्यात भाजपाला पराभूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यासाठी मायावती यांच्या बसपाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता, मात्र मायावती यांनी या तीन राज्यात काँग्रेसशी आघाडी करण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे निराश आणि नकारात्मक मानसिकतेत काँग्रेसला या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे भाजपाचा आत्मविश्‍वास वाढला आहे.
या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे लोकसभा निवडणूक या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसोबत होण्याची वा या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याची चर्चाही निकालात निघाली आहे. लोकसभा निवडणूक आता आपल्या ठरल्यावेळी म्हणजे २०१९ मध्ये होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एक देश एक निवडणुकीची चर्चा देशात जोरात सुरू होती, त्यामुळे देशातील सर्व नाही पण काही राज्यातील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणूक एकत्र घेण्याची चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणुकीसोबत जवळपास दहा ते बारा राज्यांतील विधानसभा निवडणुका घेतल्या जातील, असे वाटत होते. यासाठी काही विधानसभांचा कार्यकाळ वाढवण्याची तसेच काहींचा कार्यकाळ कमी करण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार असल्यामुळे ही चर्चा बारगळली.
निवडणूक आयोगाने या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कार्यकाळ संपण्याच्या जवळपास वर्षभर आधीच विधानसभा बरखास्त केल्यामुळे आयोगाला तेलंगणातही विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा करावी लागली.
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे, तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता होती. एकट्या मिझोरामध्ये काँग्रेसची सत्ता आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये तर गेल्या १५ वर्षांपासून तर राज्यस्थानमध्ये पाच वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. छत्तीसगडमध्ये डॉ. रमणसिंह तर मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान १५ वर्षांपासून सलग मुख्यमंत्री आहेत. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वात भाजपा विधानसभा निवडणूक लढवत आहे.
२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेशात भाजपाने २३० पैकी १६६ जागांवर निर्विवाद विजय मिळवला होता. काँग्रेसला फक्त ५७ जागांवर समाधान मानावे लागले होते. बसपाला ४ तर अन्यांना राज्यात तीन जागा मिळाल्या होत्या.
छत्तीसगडमध्ये २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४९ तर काँग्रेसला ३९ जागा मिळाल्या होत्या. एक जागा बसपाला तर एक जागा अपक्षाला मिळाली होती. राज्यातील ९० पैकी ५१ जागा खुल्या असून २९ जागा अनुसूचित जमातीसाठी तर १० जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.
२०१३ मध्ये २०० सदस्यीय राजस्थान विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १६३ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला फक्त २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. राज्यात बसपाला तीन तर अपक्षांना ७ जागा मिळाल्या होत्या.
४० सदस्यीय मिझोराम विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये काँग्रेसने ३४ जागा जिंकल्या होत्या. एमएनएफला ५ तर एमपीसीला एक जागा मिळाली होती.
२०१४ मध्ये झालेल्या ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने ९० जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. काँग्रेसला १३ तर ओवैसी यांच्या एआयएमआयएमला ७, भाजपाला ५, तेलगू देसमला ३ आणि माकपाला १ जागा मिळाली होती.
लोकसभा लढवणार नाही : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. स्वत: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हे जाहीर केले. त्यामुळे पवारांच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी २०१९ ची निवडणूक लढवणार नाही, हे २०१४ मध्येच स्पष्ट केले होते, असे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शरद पवारांनी बैठकीत याबाबत केवळ पुनरूच्चार केला असल्याचे आव्हाड म्हणाले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक सुरू आहे.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (42 of 1621 articles)

Rahul Gandhi 7
गांधी यांनी व्यक्त केली अपेक्षा, नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर - मित्रपक्षांची इच्छा असेल तर आपण निश्‍चितपणे देशाचे पुढील पंतप्रधान होऊ, ...

×