ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » हुंडा प्रकरणात अटकेचा निर्णय तपास अधिकारी घेतील

हुंडा प्रकरणात अटकेचा निर्णय तपास अधिकारी घेतील

►अटकपूर्व जामीन देण्याचा न्यायालयाला अधिकार
►सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात सुधारणा,
नवी दिल्ली, १४ सप्टेंबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

हुंड्यासाठी होणार्‍या छळप्रकरणात पती व सासू-सासर्‍यांविरोधात कारवाई करण्यापूर्वी महिलेच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याच्या आपल्या आधीच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी थोडा बदल केला. अशा प्रकरणांमध्ये तत्काळ अटकेचा निर्णय तपास अधिकारीच घेतील, तसेच ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांना अटकपूर्व जामीन देण्याचे आणि एकमत झाल्यास कायद्याचे संतुलन कायम ठेवण्यासाठी फौजदारी तक्रार रद्द करण्याचा अधिकारही न्यायालयांना राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायासनाने यापूर्वीच्या दोन न्यायमूर्तींच्या न्यायासनाच्या निर्णयात बदल केला.
कायद्यात नवीन तरतूद जोडण्याचे काम न्यायालयाचे नाही. त्यामुळे कुटुंब कल्याण समितीच्या स्थापनेचा आदेश रद्द करण्यात आला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, आता सत्यता पडताळण्यासाठी तक्रारी कोणत्याही समितीकडे पाठविल्या जाणार नाहीत, अस न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
हुंड्यासाठी छळाची प्रकरणे हाताळणार्‍या पोलिस अधिकार्‍याला विशेष प्रशिक्षण दिले जावे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकार्‍याकडेच तपास सोपविला जावा. आवश्यक असेल अशाच वेळी तपास अधिकार्‍याने अटकेची कारवाई करावी. अशा प्रकरणांमध्ये पती किंवा पत्नी यातील एकाला खटल्याच्या सुनावणीवेळी हजेरीस मुभा हवी असेल आणि सर्व खटले एकत्र चालविण्याची इच्छा असेल, तर सीआरपीसीच्या कलम २०५ आणि ३१७ अंतर्गत ते अर्ज करू शकतात, असेही निकालात नमूद आहे.
कायद्याचा दुरुपयोग नकोच
हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणात काही लोक या कायद्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. महिलांच्या सुरक्षेसाठी या कायद्यात जोडण्यात आलेल्या ४९८A कलमामुळे अनेक नातेवाईक बळी ठरतात. राग किंवा बदल्याच्या भावनेमुळे तरुण, वृद्ध किंवा दूर राहणार्‍या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली जाते, ज्यांचा या प्रकरणाशी कुठलाच संबंध नसतो, असे निरीक्षणही न्यायालयाने यावेळी नोंदविले.
कायद्याच्या गैरवापराचा प्रकार केवळ क्रूर नाही, तर सामाजिक रचनेला तडा निर्माण करणाराही आहे. त्यामुळे पोलिस किंवा न्यायालयांनी संवेदनशील व्हायला हवे, असे स्पष्ट करताना, आवश्यक वेळी आरोपींना अंतरिम जामीन किंवा अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा अधिकार न्यायालयांना आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
यापूर्वीचा निकाल
न्यायालयाने यापूर्वीच्या निकालात भादंविच्या कलम ४९८A म्हणजेच हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणात विनाकारण अटक आणि जामीन मिळू नये म्हणून महत्त्वाचे आदेश दिले होते. देशातील प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब कल्याण समिती स्थापन करावी आणि यात सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर लोक असावेत. या तक्रारी सर्वप्रथम या समितीकडे पाठविल्या जाव्या. समितीने या प्रकरणांशी संबंधित चर्चा करून सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. समितीच्या अहवालाच्या आधारे अटकेचा निर्णय व्हावा. अतिशय आवश्यक असल्यास अहवाल येण्याआधीच अटक केली जाऊ शकते. ज्या लोकांविरोधात तक्रार आहे, पोलिसांनी त्या सर्वांची भूमिका स्वतंत्रपणे तपासावी. कुणा एकाच्या तक्रारीवरून सर्वांना अटक करू नये, असेही न्यायालयाने म्हटले होतेे.

Posted by : | on : 15 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (460 of 1905 articles)


फेटाळला पुनिया यांचा दावा, नवी दिल्ली, १४ सप्टेंबर - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विजय मल्ल्याला भेटल्याचा दावा ...

×