सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » १७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका

१७ विरोधी पक्षांना हवी मतपत्रिका

निवडणूक आयोगाकडे करणार मागणी,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, २ ऑगस्ट –

Electioncommissionofindia

Electioncommissionofindia

लोकसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षाही कमी कालावधी राहिला असतांना आणि देशातील सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने कामाला लागले असतांना घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न काही विरोधी पक्षांनी चालवला असल्याचे वृत्त आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करता पुन्हा मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी विरोधी पक्षांतर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या तीन दिवसात ज्या उद्देशाने राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यामागे हाही एक उद्देश होता, असे समजते. २०१९ ची लोकसभा निवडणूक ईव्हीएमचा वापर न करता मतपत्रिकांचा वापर करून घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांतर्फे निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. यादृष्टीने ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. या पक्षांच्या नेत्यांनीही या मागणीला अनुकूलता दर्शवली असल्याचे समजते.
या मागणीसाठी जवळपास १७ राजकीय पक्षांमध्ये सहमती झाल्याचेही वृत्त आहे. या १७ राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ मतपत्रिकांचा वापर करुन २०१९ ची लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करण्यासाठी लवकरच निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसशिवाय निवडणूक आयोगाकडे जाणार्‍या या शिष्टमंडळात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, मायावती यांचा बसपा, अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, लालूप्रसाद यादव यांचा राजद, एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील द्रमुक, एच. डी .कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील जनता दल सेक्युलर या पक्षांचा समावेश राहणार असल्याचे समजते. भाकप, माकप, तेलुगू देसम, वायएसआर काँग्रेस यांनीही या मागणीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.
आतापर्यंत झालेल्या जवळपास प्रत्येक निवडणुकीतील आपल्या पराभवाचे खापर सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर फोडले आहे. ईव्हीएममध्ये गैरप्रकार घडवून आणण्यात येत असल्यामुळे भाजपा विजयी होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांतर्फे केला जात आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी विरोधी पक्षांना विजय मिळाला तिथे मात्र विरोधी पक्ष ईव्हीएमवर आक्षेप घेत नाही.
ईव्हीएमवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून याआधीही अनेकवेळा करण्यात आला. विशेष म्हणजे याचे शास्त्रशुद्ध निराकरण निवडणूक आयोगातर्फे वारंवार करण्यात आले. ईव्हीएममध्ये गैरप्रकार करून दाखवा, असे खुले आव्हान निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिले होते. मात्र त्यावेळी कोणत्याच राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाचे हे आव्हान स्वीकारले नव्हते. त्यामुळे विरोधी पक्ष राजकीय हेतूने असा आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचे समजते.
निवडणूक आयोगाने देशातील सर्व निवडणुका ईव्हीएमचा वापर करून घेण्याची घोषणा करतांना मतपत्रिकांचा वापर करून निवडणुका घेण्याची मागणी आयोगाने स्पष्ट शब्दात फेटाळून लावली होती. मात्र तरीसुद्धा मतपत्रिकांचा वापर करून निवडणुका घेण्याची मागणी विरोधी पक्षांतर्फे पुन्हा निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात यासाठी या विरोधी पक्षांतर्फे निवडणूक आयोगाची वेळ मागितली जाणार असल्याचे समजते.

Posted by : | on : Aug 3 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (54 of 1851 articles)

Gavel Law
वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ ऑगस्ट - [caption id="attachment_45357" align="alignleft" width="300"] Gavel Law[/caption] नातेवाईकांनाच न्यायाधीशपदावर नियुक्त करण्याचा मुद्दा आता चर्चेचा विषय ...

×