ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » २०१७ मध्ये १.१७ कोटी लोकांना मिळाला पासपोर्ट

२०१७ मध्ये १.१७ कोटी लोकांना मिळाला पासपोर्ट

►ज्ञानेश्‍वर मुळे यांची माहिती
►यापुढे त्रासाशिवाय व कमीतकमी वेळात पासपोर्ट,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट –

Indian Passport1

Indian Passport1

सामान्य नागरिकाला कोणत्याही त्रासाशिवाय आणि कमीतकमी वेळेत पासपोर्ट मिळावा, यादृष्टीने परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वात आम्ही नियोजन केले होते, ते पूर्णपणे यशस्वी झाले असून, २०१७ मध्ये देशातील एक कोटी १७ लाखांवर लोकांना पासपोर्ट मिळाला, हा आतापर्यंतच्या इतिहासातील विक्रम असल्याचे परराष्ट्र सचिव (पासपोर्ट सेवा) ज्ञानेश्‍वर मुळे यांनी सांगितले.
अकबर भवनातील आपल्या कार्यालयात तरुण भारतला विशेष मुलाखत देताना ज्ञानेश्‍वर मुळे बोलत होते. देशात सध्या ३६ प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये तसेच ९३ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. देशातील २१५ पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट देण्यालाही आम्ही सुरुवात केली आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक पासपोर्ट कार्यालय उघडण्याचा आमचा निर्धार आहे, असे मुळे यांनी सांगितले.
आतापयर्र्त पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची तसेच वेळखावू होती, आम्ही त्यात आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या, याकडे लक्ष वेधत मुळे म्हणाले की, शहरी भागातीलच नाही तर ग्रामीण भागातील माणसालाही सुलभपणे पासपोर्ट मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पासपोर्ट मिळण्याबाबतच्या नियमात आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत. पासपोर्ट मिळण्यासाठी असलेले अनेक गुंतागुंतीचे तसेच क्लिष्ट नियम आम्ही बदलवले आहेत. घटस्फोटित तसेच तलाक मिळालेल्या महिलांच्या अर्जात त्यांच्या (माजी) पतीचे नाव टाकण्याबाबतचा नियम शिथिल करण्यात आला आहे. यामुळे एकल पालक असलेल्या महिलांच्या मुलांना सुलभपणे पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अगदी अनाथालयात राहणार्‍या मुलांनाही पासपोर्ट मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही, अशी व्यवस्था आम्ही केली आहे.
पासपोर्ट मिळण्यासाठी पोलिस व्हेरिफिकेशनची सक्तीही रद्द करण्यात आली आहे, ज्याला पासपोर्ट जारी करायचा त्याच्या नावावर एकही गुन्हा नाही, एवढेच यापुढे पाहिले जाणार आहे, असे स्पष्ट करत मुळे म्हणाले की, पोलिस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. व्हेरिफिकेशनसाठी प्रत्येक अर्जावर काही विशिष्ट राशी आम्ही पोलिस खात्याला देत असतो. पोलिस व्हेरिफिकेशनसाठी लागणारा वेळ कमी व्हावा, यादृष्टीने आम्ही राज्याच्या पोलिस महासंचालकांशी सातत्याने चर्चा करत असतो. सध्या यासाठी लागणारा वेळ किमान २१ दिवसांचा आहे.
पासपोर्ट अर्जावर प्रकिया करण्याची मुदत आम्ही कमी केली आहे. सामान्यपणे पासपोर्ट मिळण्याच्या अर्जावर १० दिवसांत प्रक्रिया पूर्ण व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे, मात्र ८५ टक्के प्रकरणात आम्ही ७ दिवसातच प्रक्रिया पूर्ण केली आहे, तत्काळ पासपोर्टच्या अर्जावर तीन दिवसात निर्णय घेतला जातो, असे मुळे यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला म्हणजे १९१४ मध्ये भारत सुरक्षा कायद्यांतर्गंत पासपोर्ट जारी केले जायचे, १९२० मध्ये भारतीय पासपोर्ट कायदा तयार करण्यात आला, असे स्पष्ट करत मुळे म्हणाले की, १९३५ ते ५५ पयर्र्त केंद्र सरकारच्या सहकार्याने पासपोर्ट देण्याची प्रक्रिया राज्य सरकार करत होते. १९५४ मध्ये भारतीय घटनेने पासपोर्ट हा केंद्राच्या अखत्यारीतील विषय केल्यानंतर तो परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत देण्यात आला. याचवर्षी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि नागपूर येथे पाच प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये स्थापन केली.
देशभरातील पासपोर्ट कार्यालयाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी १९५९ मध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत केंद्रीय पासपोर्ट संघटनेची स्थापना करण्यात आली.
चार वर्षांत सात कोटी पासपोर्ट
देशात आज पासपोर्टधारकांची एकूण संख्या दहा कोटी आहे, यातील ७० टक्के म्हणजे जवळपास ७ कोटी पासपोर्ट केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतरच्या चार वर्षांत जारी करण्यात आले, हा एक विक्रम आहे, असे ज्ञानेश्‍वर मुळे यांनी अभिमानाने सांगितले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २०१४ पर्यंत देशातील फक्त तीन कोटी लोकांना पासपोर्ट मिळाला होता, उच्चभ्रू वर्गापर्यंत मर्यादित असलेली ही सुविधा मोदी सरकारने समाजातील शेवटच्या माणसापर्यंत उपलब्ध करून दिली. हवाई चप्पल घालणार्‍याच्या आवाक्यात हवाई सेवा आणणार्‍या पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रत्येक माणसापर्यंत पासपोर्ट पोहोचविण्याचा निर्धार केला आहे, असे मुळे यांनी सांगितले.
चार वर्षांत सात कोटी पासपोर्ट
देशात आज पासपोर्टधारकांची एकूण संख्या दहा कोटी आहे, यातील ७० टक्के म्हणजे जवळपास ७ कोटी पासपोर्ट केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतरच्या चार वर्षांत जारी करण्यात आले, हा एक विक्रम आहे, असे ज्ञानेश्‍वर मुळे यांनी अभिमानाने सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २०१४ पर्यंत देशातील फक्त तीन कोटी लोकांना पासपोर्ट मिळाला होता, उच्चभ्रू वर्गापर्यंत मर्यादित असलेली ही सुविधा मोदी सरकारने समाजातील शेवटच्या माणसापर्यंत उपलब्ध करून दिली. हवाई चप्पल घालणार्‍याच्या आवाक्यात हवाई सेवा आणणार्‍या पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रत्येक माणसापर्यंत पासपोर्ट पोहोचविण्याचा निर्धार केला आहे, असे मुळे यांनी सांगितले.

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (661 of 1924 articles)


नवी दिल्ली, १० ऑगस्ट - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तीन तलाकसंदर्भातील विधेयक पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. या ...

×