ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १६ ऑगस्ट –

Atal Bihari Vajpayee After Stroke

Atal Bihari Vajpayee

अटलबिहारी वाजपेयी अत्यवस्थ आहेत, हे वृत्त वार्‍यासारखे पसरले आणि सारा देशच व्हेंटिलेटरवर असल्यागत झाला होता. ते ४८ तास देशवासीयांना व्याकुळ करून जाणारे होते. भारताचे पंचप्राणच मृत्युशय्येवर असल्याचा प्रत्यय येत होता…
इतकी अस्वस्थता या आधी देशांत कधी जगणे करपवून गेली नव्हती. घराघरांत आपल्याच घरचाच कुणी ज्येष्ठ अनंताच्या वाटेवर निघाला असल्यागत वातावरण होते. अटलजींनी पुन्हा तसेच परत यावे, त्यांना पुन्हा एकदा तसेच रसरसते जीवन मिळावे यासाठी प्रार्थना, मृत्युंजयाचा पाठ, यज्ञ सुरू होते. धर्म, जात, पंथ, वर्ण… सारेच भेद विसरून देशवासी एक आले होते अन् सार्‍यांची एकच भावना होती, अटळ असलेल्या मृत्यूने परत फिरावे. शाळा, महाविद्यालये, रेल्वे-बसस्थानके अन् सार्वजनिक सगळ्यांच स्थानांवर अटलजींसाठी प्रार्थना सुरू होत्या. ‘आम्ही सारे भारतीय बांधव आहोत.’ हा विलक्षण असा प्रत्यय देशाने या निमित्ताने घेतला. आरोग्य विज्ञान काहीही सांगत असले तरीही देशवासीयांच्या आस्थेने चमत्कार घडेल अन् खरोखरीच अटलजी पुन्हा त्यांच्या अमोघ वाणीने देशवासीयांना मार्गदर्शन करायला येतील, गळ्यांत स्नेहींनी घातलेले हार काढून पोडियमवर ठेवत म्हणतील, ‘‘मुझे हार नही, जित चाहिये’’ असेच वाटून जात होते. समाजमाध्यमांवर क्षणक्षणाला अदमास घेतला जात होता. अटलजींच्या कविता एकमेकांना पाठविल्या जात होत्या. देशांतल्या बड्या नेत्यांपासून मजुरापर्यंत सारेच, ‘अटलजी को भेजो तार, कमलबिहारी फिर एक बार!’ म्हणत होते. सारा देश मौन झाला होता अन् अटलजी म्हणायचे तसा या मौनाला शब्द असले तरीही विवेकही होता. अन्यथा नेता जातोय्, गेला असे नुसते जाणवले तरीही भावनातिरेकाने आत्मघात केला जातो. मात्र जीवनाचा प्रवाहच थांबला होता, थिजला होता… अन् त्यांच्या निधनाची वार्ता सांगणारे ते बुलेटिन एम्सच्या डॉक्टरांनी दिले… सारेच स्तब्ध झाले!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ४८ तासांत दोन वेळा एम्मला जावून अटलजींची चौकशी केली. अजातशत्रू अटलजींना भेटायला देशभरांतील नेते एम्सला जात होते अन् ते बाहेर आल्यावर माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याभोवती गर्दी करत होते. या काळांत विविध वृत्तवाहिन्यांवर केवळ एकच बातमी होती, ‘अटलजींची ख्यालीखुशाली’ अन् इतर वेळी ब्रेकिंंग न्यूजच्या मागे लागलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वाहिन्यांना आता मात्र मने मोडून काढणारी ही ‘ब्रेकिंग’ न्यूज नको होती!
अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती ढासळल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी आणि भाजपा नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही एम्सला भेट दिली.
बुधवारी सायंकाळी मोदी जवळपास ५० मिनिटे एम्समध्ये होते. गुरुवारी दुपारीही मोदी परत एम्समध्ये आले. वाजपेयी यांच्या प्रकृतीचे वर्तमान समजताच मोदी अस्वस्थ झाले. आपल्या निवासस्थानातूनही ते सतत एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांच्या संपर्कात होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि आरोगमंत्री नड्डाही आज सकाळपासून एम्समध्ये तळ ठोकून होते. वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून काय करता येईल, परदेशातून तज्ज्ञ डॉक्टर बोलवता येईल का, याचीही चाचपणी करण्यात आली. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही, असे सांगण्यात आले.
अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची बातमी पसरताच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान, अल्पसंख्यक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी, भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बसपाच्या नेत्या मायावती यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी एम्समध्ये धाव घेत वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

Posted by : | on : 17 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1372 of 2426 articles)

Pm Narendra Modi 15 Aug 2018
किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार लाभ, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ...

×