ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ९९.३ टक्के बाद नोटा आरबीआयकडे परत

९९.३ टक्के बाद नोटा आरबीआयकडे परत

►रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात नोंद
►समांतर अर्थव्यवस्थेला जबर धक्का,
वृत्तसंस्था
मुंबई, २९ ऑगस्ट –

Rbi

Rbi

चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या ९९.३० टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. नोटबंदीमुळे चलनातून बाद झालेल्या नोटांपैकी १५.३० लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या असून, त्यांच्या तपासणी व नोंदणीचे काम संपल्याचे आरबीआयने अहवालात म्हटले आहे. बँकेकडे न येता समांतर अर्थव्यवस्थेत फिरत असलेला हा पैसा बँकेत परत आल्यामुळे समांतर अर्थव्यवस्था बर्‍याच अंशी नष्ट झाली, असे मानण्यात येत आहे.
जीएसटी मैलाचा दगड
भारतीय रिझर्व्ह बँकेचा २०१७ -१८ चा वार्षिक अहवाल बुधवारी प्रकाशित झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे. देशात गुंतवणूक व उत्पादनाचे प्रमाण वाढले असून, महागाई काही प्रमाणात कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अप्रत्यक्ष कर प्रणालीत जीएसटी हा मैलाचा दगड ठरल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
सरकारने नोटबंदी केली, त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या १५.४१ लाख नोटा चलनात होत्या. बाद केलेल्या एकूण नोटांपैकी १५.३१ लाख कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. याचाच अर्थ १० हजार ७२० कोटी रुपयांचे चलन रिझ़र्व्ह बँकेकडे परत आले नाही. काळा पैसा संपुष्टात यावा, दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद व्हावी, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ व्हावी व रोखीचे प्रमाण कमी व्हावे अशा बहुउद्देशीय कारणांसाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीचे पाऊल उचलण्यात आले होते.
मार्च २०१८ अखेरीस भारतीय बाजारपेठेमध्ये १८ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य ३७.७ टक्क्यांनी वाढून १८.०४ लाख कोटी रुपये झाल्याचे आरबीआयने नमूद केले आहे, तर केवळ नोटांच्या संख्येचा विचार केला, तर ही वाढ दोन टक्क्यांची आहे. जास्त किमतीच्या म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यामुळे प्रत्यक्ष नोटांच्या संख्येतील वाढ दोन टक्क्यांची आहे. परंतु, मूल्यातील वाढ ३७.७ टक्क्यांची झाल्याचे स्पष्ट होत आहे. एकूण चलनात असलेल्या नोटांच्या मूल्यामध्ये म्हणजे १८ लाख कोटी रुपयांमध्ये ५०० व २००० रुपयांच्या नोटांचा वाटा तब्बल ७२.७ टक्के इतका आहे, तर नव्याने दाखल करण्यात आलेल्या २०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण २.१ टक्के आहे.
आरबीआयने या आर्थिक वर्षात म्हणजे २०१८-१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ७.४ टक्क्यांनी होईल असा अंदाज वर्तवला आहे. अर्थात्, महागाईकडेही बारकाईने लक्ष ठेवावे लागेल, असा इशारा आरबीआयने दिला आहे. वर्षाच्या उर्वरित महिन्यांमध्ये महागाईचा कल वाढण्याकडे असेल, असा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे.
९९.३ टक्के बाद नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या, याचा अर्थ नोटबंदीचा निर्णय फसला असा होत नाही. कर वाचवून साठविलेला पैसा (ज्याला काळा पैसा म्हटले जाते) पुन्हा बँकेच्या व्यवहारात आणि चलनात आला आहे. एरवी हा पैसा बँकेत न येता समांतर अर्थव्यवस्थेतच राहिला असता.
बँकेत जमा पैशावर आयकर व दंड भरून तो पैसा पांढरा होऊ शकतो. याने सरकारला आयकर तर मिळतोच शिवाय चलनातील काळा पैसा पांढरा होतो. त्यामुळे नोटबंदी फसली असे म्हणण्यात काही तथ्य नाही, असे मत अर्थविषयक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Posted by : | on : 30 Aug 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (421 of 1765 articles)


नरेंद्र मोदी यांचे आवाहन, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २९ ऑगस्ट - समाजात घाण पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका, असे आवाहन ...

×