ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय, स्तंभलेखक » अंधार हा अभाव; अवस्था नाही!

अंधार हा अभाव; अवस्था नाही!

श्याम पेठकर |

पहाटे दवात न्हालेल्या अन् हिवात थरथरणार्‍या तुळशीजवळ मंदपणे तेवणार्‍या दिव्याची ऊबच तिला आधार देते. दूर देवळात काकडा निनादत असतो. देवळाला धुक्याचा वेढा पडलेला असतो. एखादी एकट गाय देवळाच्या भिंतीला अंग घासून स्वत:लाच उबवीत असते. महादेवाच्या पिंडीजवळ गावकुत्रं पायात मान खुपसून, कान ताठ करून व टपोर्‍या डोळ्यांत आरती साठवीत बसलं असतं. काकड्याची नवचेतना वातावरण उजळून टाकते आणि हळूहळू धुकंही सोनेरी होऊ लागतं. हे कार्तिकाचे दिवस असतात. अशा दिवसांत पहाटे उठून आंघोळ न करताही बाहेर पडलं; तरी देहाचे मंदिर होते अन् मनाच्या राऊळात विठ्ठल कटेवर हात ठेवून समचरण दाखवीत उभा असतो. कार्तिक हा उजळण्याचा महिना आहे. उजळण्याचा अन् उजळविण्याचाही. अशा दिवसांत देहाचे मंदिर झाल्यावर गावाची पंढरी होणारच. मग कातरवेळेला गावातल्या घराघरांवर आकाशदिवे लागतात. बांगड्यांच्या किणकिणाटात दिव्यांना जाग येते. कार्तिक हा जाणिवेचे, ज्ञानाचे आणि स्पर्शाचे दिवे पेटविण्याचा महिना आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चे स्वप्न डोळ्यांच्या बाहुल्यांत स्थलांतरित करण्याचे हे दिवस. सगळीकडे दिवे उजळलेले असतात. याचा अर्थ गाव उजळून निघाले, असा होत नाही. या दिवसांत दिव्यांची आरास मांडण्याची अहमहमिका लागलेली असते; पण सारेच दिवे उजेडासाठी लावलेले असतात असे नाही. प्रकाशाची दिशाभूल करण्यासाठी काही स्वप्नविके अशा उजेडाची आरास मांडत असतात. प्रकाशाची झूल पांघरून काही जण मग भरल्या गावात दुकान थाटतात. अशा दुकानात मनोवेधक वेष्टनंच विकण्यात येतात. अशा दुकानांवर चकाकणारे दिवे वेड्या जिवांना भूल पाडण्यासाठी असतात. जे चकाकते ते सारेच सोने असते, असे समजून गाव खरेदी-विक्रीचे व्यवहार करते. विठूनामाच्या व्यवहारापासून या उजेडाच्या विक्रीपर्यंत गावाचा प्रवास झाला की, गावाचे मग शहर होते. ऋतूंप्रमाणे शहरात सणही येत नाहीत. दिव्यांचा सण तर नाहीच. कारण गावाबाहेरचा उजेड हा राबत्या गुरांच्या पावलांसोबत गावात येत असतो. शहरात जनावरं भरपूर असतात. पण, रानात राबणार्‍या सोशीक गुरांना शहरात थाराच नसतो. शहराच्या कुठल्याही कोपर्‍यात एक पणती ठेवली पाहिजे. खरेतर अंधारात एक दिवा लावायचा झाला, तर आयुष्याच्या कितीतरी वाती खर्ची घालाव्या लागतात; पण इथेतर दिव्यांची नुसती झुंबरेच वेठीस धरण्यात येतात- लोकांना खोटी-चकाकती स्वप्नं विकण्यासाठी. उजेडाचे एखादे स्वप्न असेल काय?
स्वप्न फक्त डोळ्यांच्या बाहुल्या ज्यांच्याजवळ आहेत त्यांनाच पडतात. जे जन्मांध आहेत त्यांच्या स्वप्नांचं काय? उजेड आंधळा असतो का? जन्मांधांनाही स्वप्नं पडावीत, असे स्वप्न तर उजेडाला पडत नसेल? उजेडाला पडणार्‍या स्वप्नांचा शोध घेण्यासाठी आपण एक एक दिवा घराच्या छपरापासून तुळशीच्या पायापर्यंत लावत नेतो. दिवे आणि वाती विस्तवाने पेटवायच्या नसतात. त्या प्राणांच्या पलित्यांनी उजळून टाकायच्या असतात. हडळींनी आणि वेताळांनी गावपंढरीच्या बाहेर गाव पेटविण्यासाठी दिवे लावून ठेवलेले असतात. या दिवसांत ते गावातल्या सात्त्विक दिव्यांत मिसळून जाऊ नयेत, यासाठी ते याच वेळी प्राणपणाने फुंकून विझवून टाकण्याची वेळ आता आली आहे, हे प्रकाशवेड्यांना कळायला हवे. या वेळी ऋतू, दिव्यांच्या तोंडी अंगार फुलवून कूस पालटत असतो. प्रत्येक ऋतू, बदलांची अशी सांकेतिक भाषा घेऊन येत असतात. संपर्काची आणि बदलाची ही भाषा दिव्यांच्या उजेडात डोळ्यांतील बाहुल्यांची आहुती देऊन आत्मसात करायची असते. ऋतूंच्या बदलाची ही भाषा आत्मसात झाली की, गावावर अस्मानफेक हल्ले होण्याआधीच पळून जायची वेळ येत नाही. म्हणून या दिवसांत दिव्यांची पूजा करायची असते. श्‍वासात उजेड पेरून घेता आला तर ते जमते. उजेडाच्या पूजेचे फलित काय? तर मनाचा कणा ताठ होतो. दृष्टीच्या कक्षा रुंदावतात. हिंमत वाढते. मुख्य म्हणजे अंधाराची भीती वाटत नाही. प्रकाश म्हणजे तरी काय? आयुष्यात उभारीने उभे राहण्याची हिंमत. ती प्रकाशाच्या पूजेने मिळते. मग, अंधारात दडून बसलेल्या त्या नियतीच्या हिरव्या सापांना ठेचून मारण्याचे बळ येते. ‘आदम’च्या ‘इव्ह’ला संधिप्रकाशात अंधारवाटांतच अशाच एका सर्पाने नग्नतेची जाणीव करून दिली आणि संपूर्ण मानवजातीला वासनेच्या विवरात कायमचे ढकलून दिले. इव्हच्या हातात तेव्हा आकाशदिवा असता तर? एक पहाटपक्षी आहे. दूर कुठेतरी आफ्रिकेच्या जंगलात त्याच्या जमाती राहतात. हा पक्षी रात्रभर जागा असतो आणि पहाट झाली की, एका उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसतो. सूर्यप्रकाशाचे पान करतो. तेथील लोक म्हणतात की, तो प्रकाश पितो. एक क्षणभरच. नंतर तो त्याच वृक्षाच्या अंधारकोठडीत जाऊन दिवसभर झोपून असतो. एका क्षणाचा प्रकाश प्राशून रात्रभर अंधाराशी झगडत राहणे, हे त्याचे प्रारब्ध… पण, एका क्षणाच्या प्रकाशाने त्याने ते किती सोपे करून टाकले आहे! संपूर्ण वर्षभराच्या अंधारपर्वात वावरताना त्या आफ्रिकन पक्ष्यासारखे आपल्याला करता आले पाहिजे. उजेडाची पूजा करण्याच्या या दिवसांत जाणिवेचे, ज्ञानाचे, स्पर्शाचे आणि प्रेमाचे जेवढे दीप उजळून टाकता येतील तेवढे उजळून टाकले पाहिजे. अंधाराची कराल आणि कर्कश आरडाओरड सुरू होण्याआधीच उजेडाच्या प्रार्थनेला सुरुवात केली पाहिजे…
उजेडाची प्रार्थना करताना दिवे लावण्याची गरज नाही. आपण आतून जितके जास्त उजळून जाऊ, तेवढी त्या उजेडाच्या प्रार्थनेची हाक त्या दिव्यत्वापर्यंत जाऊन पोहोचते. उजळण्यासाठीसुद्धा काहीतरी करावेच लागते. पण, आपण जे जाळणार किंवा उजळणार आहोत, त्यामुळे कुठेही काजळी धरायला नको. ज्या जळणाने काजळी धरते ते उजळणे म्हणजे प्रकाशणे नव्हे. ती आग असते. त्याने काजळी धरते. दिव्याच्या जळण्याने काजळ धरते. ते दृष्टी सतेज करते. उजळण्यासाठीच जमलेल्या काजळाने ‘ध’चा ‘मा’ करणारे हात मात्र अंधाराला पायवाट करून देतात. म्हणून मग उजळण्यासाठी जे जळणे आहे ते सात्त्विक असले पाहिजे. आपल्या प्राणापेक्षा सात्त्विक काय असू शकते? म्हणून मग प्राणपणाने आतून उजळावे. एकदा हे जमले की, अंधाराचे काफिले उजेडाच्या गावावर चालून येण्याची हिंमत करणार नाहीत. उजेडाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग गाव घासूनपुसून लख्ख करता येईल. दगडांचेही टाळ होतात. हातात श्रद्धेचे बळ असले की सारेच शक्य होते. गावाभोवती सात्त्विक थंडी रुंजी घालायला लागली असताना गावाने भल्या पहाटे प्रार्थनेचा एक दिवा लावून ठेवावा. कारण पहाटेच्या स्निग्ध संधिप्रकाशातही वासनेचे हिरवे साप दबा धरून बसलेेले असतात. ते केवळ प्रकाशाच्या प्रार्थनेनेच रोखून धरता येतात.
प्रकाशाच्या प्रार्थनेसाठी मातीची साथ हवी. आम्ही आभाळाकडे हात करतो. आभाळ हा आभास आहे. त्याला अस्तित्व नाही. माती हीच अस्तित्व आहे. आमच्या अनेक पिढ्यांची नाळ मातीत गाडलेली आहे. आमच्या सार्‍याच समस्यांची उत्तरे मातीत आहेत. मात्र, आम्ही आकाशाची करुणा भाकतो. मातीत पाय घट्ट रोवून मातीतच हात घातलेत, तर समस्या निकाली निघतील. मातीचे गुरुत्वाकर्षण हा निसर्ग आहे. म्हणून दिवे मातीचे असतात. वाती कापसाच्या असतात आणि तेलदेखील आभाळातून नाही पडत… अग्निशलाका आभाळात नसतात. सीतामाउली लक्ष्मीचा अवतार होती म्हणतात, पण अवतार संपवून ती आभाळात नाही गेली. ती जमिनीतच गडप झाली. या लोककथेचा भावार्थ नीट समजून घेतला पाहिजे. तिचे प्रकटनही मातीतून आणि ती गेलीदेखील मातीतच… कारण, प्रकाशाची फुले आभाळात नाही, मातीत लागतात. प्रकाशाची ओढ मातीला असते…!

https://tarunbharat.org/?p=67248
Posted by : | on : 7 Nov 2018
Filed under : उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय, स्तंभलेखक (428 of 1507 articles)


हा प्रकाशाचा सण आहे. संपूर्ण सृष्टी प्रकाशमान करण्याची क्षमता असलेला दीपोत्सव सुरू झाला आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशी आटोपली असून, आज ...

×