पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त

पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त

►लष्कराने जारी केला व्हिडीओ, श्रीनगर, २३ फेब्रुवारी – संघर्षविरामाचे…

पाक, बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करा

पाक, बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करा

►कटियार यांचा ओवेसींवर प्रहार, नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी –…

गीतांजली समूहाची १२०० कोटींची संपत्ती जप्त

गीतांजली समूहाची १२०० कोटींची संपत्ती जप्त

►आयकर विभागाची कामगिरी ►नीरव मोदीला जोरदार दणका, नवी दिल्ली,…

आता शिक्षकांनाच बंदुका द्याव्यात : ट्रम्प

आता शिक्षकांनाच बंदुका द्याव्यात : ट्रम्प

►गोळीबाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाय, वॉशिंग्टन, २२ फेब्रुवारी –…

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

इम्रान खान तिसर्‍यांदा लग्नाच्या बेडीत

कराची, १९ फेब्रुवारी – पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार…

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

पाकच्या कारवाईने हाफिझ सईद चवताळला

►नजरकैदप्रकरणी न्यायालयात जाणार, लाहोर, १६ फेब्रुवारी – पाकिस्तानने बेकायदेशीरपणे…

आता राज्यात पाच नाही, सहा लाख कोटींची कामे!

आता राज्यात पाच नाही, सहा लाख कोटींची कामे!

►४ लाख २७ हजार ८५५ कोटींची कामे मार्गी ►केंद्रीय…

बायोमेट्रिक कार्डधारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य : हायकोर्ट

बायोमेट्रिक कार्डधारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य : हायकोर्ट

मुंबई, २३ फेब्रुवारी – आधारकार्ड शिधापत्रिकेशी जोडणे अनिवार्यच असल्याचे…

सोहराबुद्दिन शेख दाऊदचाच हस्तक

सोहराबुद्दिन शेख दाऊदचाच हस्तक

►पळून जात असल्याने चकमकीत मारला गेला ►आताची सीबीआय तटस्थ…

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

काँग्रेसमुक्त भारत, काळाची गरज!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | काँग्रेस राजवटीत शिक्षणक्षेत्रात…

काँग्रेसला काय धाड भरलीय?

काँग्रेसला काय धाड भरलीय?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | शेखर गुप्ता…

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

राष्ट्रद्रष्टे : श्रीगुरुजी

॥ विशेष : डॉ. कुमार शास्त्री | श्रीगुरुजी आध्यात्मिक…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » अखंड असावे सावधान!

अखंड असावे सावधान!

जम्मूजवळील नगरोटा येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि महाराष्ट्रातील दोन वीर जवानांसह सात जण हुतात्मा झाले. ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता जवळजवळ सर्व सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केली होती. दुसरीही एक शक्यता वर्तविली जात होती ती, पाकिस्तानातील लष्करप्रमुखाच्या निवृत्तीआधी काहीतरी घडण्याची! पाकिस्तानातील लष्करप्रमुख हे एक मोठे सत्ताकेंद्र असते. सत्ता सहजासहजी न सोडता आजवर तेथे लष्करप्रमुखाने अंतर्गत किंवा भारताच्या विरोधात काही ना काही मोठी घटना घडविल्याचा इतिहास आहे. तशा प्रकारे लष्करप्रमुख बदलताना काही घडेल, असे भाकीत वर्तविले जात होते. मात्र, नव्या लष्करप्रमुखांनी पाकिस्तानात कार्यभार स्वीकारताच त्यांनी दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला जणू ही नगरोटाची सलामी दिली आहे! नगरोटामध्ये हल्ला करणारे दहशतवादी हे भुयारी मार्गाने आले, असे बातमीमध्ये म्हटले आहे. यापूर्वी पाकिस्तानातून काश्मीरकडे एक भुयारी मार्ग खणत असल्याचे उघड झाले होते. मात्र, हा भुयारी मार्ग खणून तो उपयोगात आणण्यात पाकिस्तानातील नापाक मनसुबे यशस्वी झाले, असे दिसते आहे. असे जरी असले, तरी नगरोटामधील हल्ल्यात मोठे नुकसान करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा तेथील शूर सैनिकांनी आणि अधिकार्‍यांनी हाणून पाडला आहे. दोन अधिकारी आणि पाच जवान या धुमश्‍चक्रीत शहीद झाले. तीन दहशतवादी धारातीर्थी पडले. अशा हल्ल्यात हल्ला करणारे एकतर सतर्क असतात आणि आत्मघाताची तयारी करून आल्याने मरणाची भीती त्यांना नसते. त्यामुळे भारतीय लष्करी तळावरची मंडळी सावध होईपर्यंत जेवढे नुकसान करता आले तेवढेच ते करू शकले. नंतर भारतीय लष्करी तळावरील सावध सैन्याने या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या लष्करी तळावरील सैनिकांच्या निवासी भागात घुसण्याचा अतिरेक्यांचा इरादा होता. तेथे महिला आणि मुले होती, त्यांना बंदी बनवून भारत सरकारला नमवण्याचा यांचा इरादा असू शकतो. कंदहारच्या विमान अपहरण प्रकरणात विमानातील प्रवाशांचे नातेवाईक आणि भारतीय उथळ माध्यमे यांच्या दबावामुळे दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करत, अतिशय धोकादायक दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. त्या प्रकरणात जेवढा अपहरणकर्त्या दहशतवाद्यांचा दबाव होता त्यापेक्षा जास्त त्या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांचा होता आणि त्यांच्यापेक्षाही जास्त दबाव नेहमी सरकारविरोधाचाच आपला धर्म असे मानत, त्यासाठी देशहितालाही चूड लावणार्‍या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा दबाव सरकारवर आला होता. नगरोटा येथे दोन बहादूर महिलांनी निवासी भागाचा दरवाजा अतिशय हुशारीने बंद करून त्यामागे सगळे अवजड सामान ठेवल्याने दहशतवादी तेथे पोहोचू शकले नाहीत. तेथून महिला, मुले व सर्व निवासींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात लष्कराला यश आले. दुसरीकडे, दहशतवाद्यांना टिपण्याचेही काम लष्कराने पार पाडले. या सगळ्या घटनाक्रमात काहीही विपरीत घडले असते, तर ते या देशाला फार महागात पडले असते. पठाणकोट, उरी आणि आता नगरोटा अशा एकापाठोपाठ तीन दहशतवादी हल्ल्यांना अलीकडच्या काळात सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानने रणांगणावरचे युद्ध करण्याची हिंमत नसल्यामुळे दहशतवादी हल्ल्यांच्या माध्यमातून भारताला त्रास देण्याचे काम इमानेइतबारे चालू ठेवले आहे. दहशतवाद्यांचे हल्ले होतात, तेव्हा हा देशावर शत्रूने केलेला हल्ला आहे, असे लक्षात घेऊन देशातील सर्व शक्तींनी आपले मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्यांबद्दल विचार केला पाहिजे. हे हल्ले म्हणजे राजकारण करण्याची संधी असे मानत, या देशातील विरोधी पक्ष आणि सरकारचा विरोध हाच आपला धर्म असल्यासारखे काम करणारी प्रसारमाध्यमे यांनी सरकारवर हल्ले करण्याचा जो सपाटा लावलेला असतो तो अत्यंत चुकीचा आहे. भारतीय जनतेने या लोकांना त्यांच्या या मर्यादा उल्लंघनाबाबत जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. एका टीव्ही वाहिनीवर नेहमीप्रमाणे, सरकारने कारवाई करताच इतका गहजब माजविण्यात आला की, जणू टीव्ही वाहिन्या लोकशाही आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची लढाईच लढत आहेत! वास्तविक, या वाहिन्या इमानेइतबारे सरकारला अडचणीत आणण्याचा गंडा बांधल्यासारखेे काम करण्याच्या नादात भारताच्या शत्रूला साथ देत आहेत. यामुळे शत्रूला थेट माहिती तर मिळतेच, पण त्याबरोबरच त्यांचे मनोबलही वाढते. भारतावर अशा प्रकारचे हल्ले आज आणि आता अलीकडेच सुरू झाले आहेत असे नाही. युपीएच्या दहा वर्षांच्या कालावधीत अगदी सैनिकांचा शिरच्छेद करण्यापर्यंत शत्रूची मजल पोहोचली होती. मात्र, त्या वेळी या अशा कारवायांना भारत सरकार चोख प्रत्युत्तर देण्याची शक्यता जाणवत नव्हती. आता मात्र सरकारने अशा प्रकारे धडा शिकवणारे प्रत्युत्तर देण्याची मुभा लष्करालाच दिली आहे. उरीच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त गुलाम काश्मीरमध्ये घुसून केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हे याचेच उदाहरण आहे. मात्र, भारतीय सीमेवर, जम्मू-काश्मीर, पंजाब अशा सीमावर्ती प्रदेशात, मुंबईसारख्या मोक्याच्या शहरात पाक प्रायोजित असे दहशतवादी हल्ले केव्हाही घडू शकतात. आत्मघातकी दहशतवाद्यांना ताळतंत्र नसतेच. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा, भारतीय सैन्य, अंतर्गत सुरक्षा यंत्रणा यांना कायमच सतर्क राहावे लागणार आहे. भारतीय जनतेनेसुद्धा अखंड सावधानी बाळगण्याची गरज आहे. जागतिक पातळीवरच्या नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीने जगात पाकिस्तानला एकाकी पाडण्यात यश मिळाले असले, तरी जागतिक राजकारणाचे संदर्भ बदलत असतात आणि जो तो आपापल्या स्वार्थाचा विचार करत असल्याने, केवळ त्याच एका उपायावर अवलंबून राहता येणार नाही. भारतीय जवानांचे प्राण इतके स्वस्त नाहीत, हे भारताने कृतीने शत्रूला बजावण्याची गरज आहे. एका ‘सर्जिकल स्ट्राईक’ने भागणार नाही, तर जोपर्यंत भारतावर हल्ले करण्याची खुमखुमी शत्रूमध्ये आहे तोपर्यंत या हल्ल्याने त्यांचेच हात भाजतील, असा अनुभव त्यांना देण्याची गरज आहे. त्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’सारखे दणके तर द्यावे लागतीलच. पण, जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा सतर्कता ठेवून हे हल्ले हाणून पाडण्याची व्यूहरचना करावी लागेल. त्यासाठी सर्व शक्यतांचा विचार करून अखंड सावधान राहावे लागेल. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला आळा घालण्यात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सैन्याला मोकळीक, बचावात्मक धोरण सोडून आक्रमक धोरण, यामुळे खूप बदल झाला आहे. देशातील मोदीविरोधक, भारताच्या शत्रूने हल्ला केला की, मोदीसमर्थकांची कशी जिरली, अशा आविर्भावात खूष होतात, हे फारच आक्षेपार्ह आहे. सगळ्या देशाने एकसंधपणे अशा विषयात शत्रूच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. अखंड सावधान राहून देशाकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍या नापाक शक्तींना चोख प्रत्युत्तर द्यावे लागेल…

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (878 of 957 articles)


संस्कृतिविचार : दिलीप करंबेळकर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर, अनेक त्रास सहन करावे लागत ...