ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय » अटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत!

अटलजी आजचे श्यामाप्रसाद आहेत!

लालकृष्ण अडवाणी |

Atal Bihari Vajpayee Advani

Atal Bihari Vajpayee Advani

१९५७ साली दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत श्री. अटलबिहारी वाजपेयी प्रथमच संसदेत निवडून आले. एवढ्यातच अटलजींनी- झिंझौली, हरयाणामध्ये पार्टीच्या प्रशिक्षण शिबिरात या संदर्भात विनोदाने सांगितले की, ती निवडणूक त्यांना एकाच वेळी तीन प्रकारचे अनुभव देऊन गेली. जनसंघाने त्या वेळी वाजपेयीजींना उत्तरप्रदेशातून तीन स्थानांवर उभे केले होते. मथुरा, बलरामपूर आणि लखनौ ही ती तीन स्थाने होती. अटलजींनी सांगितले की, लखनौत ते निवडणूक हारले. मथुरेत केवळ हारलेच नाहीत, तर त्यांची निवडणूक जमानत रकमही जप्त झाली. बलरामपुरात मात्र ते अत्याधिक मतांनी निवडून आले आणि जनसंघातील चार सदस्यीय सभासदांचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.
पक्षाच्या नेत्यांनी त्या वेळी अटलजींना तीन स्थानांहून का उभे केले हे मला माहीत नव्हते. पण मला वाटते की, हा निर्णय दीनदयालजींचा असावा. कारण त्या वेळी निर्णयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. माझ्या मते, दीनदयालजींना असं वाटत होतं की, अटलजी लोकसभेत जावयासच हवेत, भलेही त्यांना तीन ठिकाणांहून लढावे लागो. त्यासाठीच त्यांनी तीन जागांहून अटलजींना निवडणूक लढावयास सांगितले असावे. पंडितजींचे (दीनदयालजी) असे स्पष्ट मत होते की, श्यामाप्रसादांच्या देहान्तामुळे पक्षाची फार मोठी हानी झाली होती. त्यांच्या जाण्याने जी भली मोठी पोकळी पक्षात निर्माण झाली होती, ती फक्त अटलजीच भरून काढू शकत होते. अटलजींमध्ये त्यांच्या वयाच्या मानाने जास्त समज आहे आणि त्यांचा दृष्टिकोन फार स्वच्छ आणि साफ आहे, याची दीनदयालजींना खात्री होती.
चाळीस वर्षे देशाच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास केला आणि अटलजींनी प्राप्त झालेली प्रतिष्ठा पाहिली, की वाटते खरोखरच दीनदयालजींना केवढी दूरदृष्टी लाभलेली होती! अटलबिहारी खरोखरच आजचे श्यामाप्रसादच आहेत. मी हेही सांगण्याचे साहस करीन की, ५० व्या दशकात देशासाठी श्यामाप्रसाद जेवढे महत्त्वाचे होते त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचे ९० व्या दशकामध्ये अटलबिहारीजी आहेत. (मूळ हिंदी विधान असे – मैं यह कहने का दु:साहस भी करना चाहता हूं कि नब्बे के दशक में देश के लिए अटलबिहारी का महत्त्व पचास के दशक के श्यामाप्रसाद से कहीं ज्यादा है।) मला या दोन महनीय व्यक्तींची तुलना करायची नाही. पण, या दोन व्यक्तींनी ज्या परिस्थितीत कार्य केले ती स्थिती कशी होती, याकडे लक्ष वेधत आहे. डॉ. मुखर्जी एक श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ होते. संसदेत आणि राजकारणात त्या वेळी त्यांचे विशिष्ट स्थान होते. पण, त्या वेळी अनेक दिग्गज होते- काँग्रेसमध्ये आणि अन्य राजकीय पक्षांमध्येही.
उलटपक्षी हल्लीच्या राजकारणात सुमार लोकांचाच भरणा अधिक आहे. त्यामुळे अटलजींचे विशाल व्यक्तिमत्त्व हल्लीच्या राजकारणातील नेत्यांमध्ये अधिक उठून दिसते आणि म्हणूनच लोकांच्या आशांचे आणि आकांक्षाचे ते केंद्र बनले आहेत, यात कुठलेच आश्‍चर्य नाही. देशात गेल्या काही वर्षांत जी सर्वेक्षणे घेतली आहेत, त्यात अटलजींचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे, हेच दिसून आलेले आहेे.
१९५७ पासून अटलजींचा व माझा संबंध आहे. १९५७ पर्यंत माझे कार्यक्षेत्र राजस्थान होते. पण, १९५७ मध्येच अटलजींची निवड लोकसभेत झाल्यानंतर पार्टीचे महासचिव श्री. दीनदयालजी यांनी मला दिल्लीला पाठविले. जनसंघाचे संसदीय कार्यालय स्थापन करणे आणि खासदारांना मदत करण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपविले. त्यावेळेपासून आम्ही दोघेही बरोबरच कार्य करू लागलो. त्यानंतर राज्यसभेत माझीही निवड झाली आणि त्यामुळे संसदेतही आमचे संबंध स्थापित झाले.
देशात आज अटलजींचे लाखो प्रशंसक आहेत. त्यातील अधिकतर लोक त्यांच्या अजोड वक्तृत्वाने प्रभावित झालेले आहेत. पण, त्यांना फार जवळून पाहिल्यामुळे मी सांगू शकतो की, त्यांची ओजस्वी वाणी आणि भाषेवरचे नियंत्रण या दोन्ही गोष्टी त्यांच्यातील नेतृत्वक्षमतेच्या कौशल्यात समाविष्ट आहेत. या देशातील लोकांना आणि या राष्ट्राला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे आणि त्याचीच त्यांचे नेतृत्व ही फलश्रुती आहे.
राजकीय जीवनात अटलजींना विरोधी पक्षातच दीर्घकाळ घालवावा लागला. बराच काळ विरोधी पक्षात राहिलेले नेते तीक्ष्ण टीका करणारे आणि कडवट बोलणारे होतात. नकारात्मक विचारसरणी त्यांच्या जीवनाचे एक अंग बनून जाते. पण, अटलजी मात्र या नकारात्मक विचारसरणीच्या खूपच दूर असल्याने सर्वच पक्ष अटलजींना मान देतात. मी त्यांना सत्तापक्षावर अनेकदा गंभीर आक्रमण करताना बघितले आहे. पण, व्यक्तिगत हल्ला मात्र ते क्वचितप्रसंगी करतात आणि त्यानंतर त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचे कटुत्व शिल्लक राहात नाही. त्यांचे टीकात्मक आणि उपरोधिक व्यंगबाण प्रतिपक्षाला हादरून तर सोडतात, पण त्यांना जखम करीत नाहीत आणि जखमेची कोणतीही निशाणी तिथे सोडत नाही. कारण त्यांचा उद्देश तसा नसतो. तो रचनात्मक आणि विधायक असतो.
श्री. वाजपेयी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संबंध हा प्रसारमाध्यमांसाठी विवादाचा विषय असतो. प्रसारमाध्यमांशिवाय इतरही अनेक लोक यावर वाद घालताना दिसतात. तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी अटलजींना जेव्हा परराष्ट्रमंत्री बनविण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तेव्हा जनता पार्टीतील अनेक लोकांनी त्या वेळी विरोध केला होता हे मला अजूनही चांगले स्मरते. श्री. देसाईंना त्यांनी सांगितले होते की, अटलजी हा शेवटी ‘संघाचा माणूस’ आहे आणि त्यांच्यामुळे पाकिस्तानशी आपले संबंध बिघडू शकतात. परंतु, देसाईजींनी त्या सर्व टीकेकडे आणि न मागितलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि स्वत:च्या सरकारात अटलजींना परराष्ट्र मंत्र्याचे स्थान दिलेच.
भारत-पाक संबंधाबद्दल अभ्यास करणारे आता तर पूर्णपणे मान्य करतात की, जेव्हा १९७७-७९ मध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते, तेव्हा भारत-पाक संबंधाचा तो सुवर्णकाळ होता. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही या विधानाला दुजोरा दिल्याचे मी ऐकले आहे. १९९१ मध्येसुद्धा नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि राजीव गांधींच्या अंत्यसंस्काराचे वेळी हजर राहण्यासाठी भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी (पाकच्या पंतप्रधानांनी) निमंत्रण दिल्यामुळे श्री. वाजपेयीजी त्यांना भेटायला अशोक हॉटेलमध्ये गेले होते. आम्हाला भेटल्यानंतर सर्वप्रथम ते म्हणाले, ‘‘वाजपेयीजी, मी यापूर्वी आपणास कधीच भेटलो नाही. पण, आपण जेव्हा परराष्ट्रमंत्री होता, तेव्हा पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये जसे मधुर आणि सौहार्दपूर्ण संबंध होते, तसे पुन्हा कधी झाले नाहीत.’’ श्री. वाजपेयीजींच्या कार्यकाळात श्री. देसाई आणि जिया-उल-हक यांच्यामध्ये ‘हॉटलाईन’ नव्हती. पण, गेल्या काही काळात जे बॉम्ब-विस्फोट एकसारखे झाले, ते पण नव्हते. वाजपेयीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासंबंधी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये अर्धवट माहिती असते आणि वृत्तपत्रातील काही जणांना तर भाजपाबद्दल चुकीची माहिती छापण्याचा गंभीर आजार झाला आहे.
१९८० मध्ये जनता पार्टीने दुहेरी सदस्यतेचा मुद्दा उचलून धरला आणि जनसंघातून येणार्‍या आमच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाते तोडण्यासाठी दडपण आणले गेले. त्यांचा हा गैरसमज होता की, अटलजी या गोष्टीला विरोध करणार नाहीत.
जनता पार्टीच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत जेव्हा या विषयावर चर्चा होत होती तेव्हा अटलजी रागाने लाल झाले आणि म्हणाले-‘‘आम्ही जनता पार्टीत केवळ गेल्या तीन वर्षांपासून आलो आहोत. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले आमचे नाते हे तर लहानपणापासूनचे आहे. तुमची इच्छा आहे की, आम्ही संघाशी नाते तोडावे. तुम्हाला कळत आहे का, तुम्ही काय म्हणत आहात?’’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची सांस्कृतिक राष्ट्रवादी विचारधारा यांच्याशी अटलजींचे अतूट नाते आहे. परंतु, हेही त्यांना माहीत आहे की, भारतासारख्या विशाल आणि विविध संस्कृती असलेल्या देशात निश्‍चित विचारधारेतून आदर्श नीतिमूल्य आणि नितिनिर्माण याबद्दल मार्गदर्शन मिळावयास पाहिजेच. पण, त्याचा परिणाम राजकीय आणि सरकरी निर्णयांचा संकोच होण्यावर व्हावयास नको.
देशातील अन्य लोकांसोबत मी अटलजींना शुभकामना देत आहे. एकविसाव्या शतकात त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे राष्ट्र आशा आणि विश्‍वास यांच्या शीर्षस्थानावर जाण्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहे.

Posted by : | on : Aug 17 2018
Filed under : उपलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, संपादकीय (71 of 860 articles)

Atal Bihari Vajpayee2
चिंतन भारत हे विश्‍वातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. १९७५ आणि १९७६ मधील लहानसा कालखंड सोडला, तर येथील लोकशाही अभंग ...

×