ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक » अयोध्या खटल्याची निरर्थकता…

अयोध्या खटल्याची निरर्थकता…

रवींद्र दाणी |

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २८ ऑक्टोबरला होणारी सुनावणी जानेवारीपर्यंत टळल्याने सर्वांनाच धक्का बसला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने, २८ तारखेला झालेली सुनावणी दोन मिनिटांत आटोपली आणि ती जानेवारीत करण्याचा निर्देश दिला. याने अयोध्येचा निवाडा लोकसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता मावळली असल्याचे अनेकांना वाटत आहे. वास्तविक ही सुनावणी २८ ऑक्टोबरपासून सुरू झाली असती, तरी ती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होण्याची, निवाडा येण्याची शक्यता नव्हती. कारण, या प्रकरणात असलेली गुंतागुंत!
नवे पीठ
अयोध्या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी नवे पीठ गठित केले जाणार आहे. त्याची सुनावणी केव्हा सुरू होईल हे माहीत नाही. सुनावणी किती महिने की वर्षे चालेल, हेही माहीत नाही. अयोध्या वादाला टायटल सुट म्हणून मानले जात आहे. अशा खटल्यांची सुनावणी तर वर्षानुवर्षे चालते. म्हणजे अयोध्या खटला किती काळ चालेल, हेच कुणालाही माहीत नाही.
निकालानंतर
अयोध्येतील वादग्रस्त जागेचा ताबा हिंदूंकडे की सुन्नी वक्फ बोर्डाकडे, असा हा खटला आहे. याचा निवाडा निरर्थक यासाठी आहे की, निवाडा कोणताही लागला, तरी त्या ठिकाणी आज जे राममंदिर आहे ती स्थिती बदलणे कोणत्याही सरकारला शक्य नाही. मग, त्यावर सुनावणी, वाद-युक्तिवाद करण्याचे प्रयोजन नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाच्या बाजूने निवाडा दिल्यास, त्याची अंमलबजावणी कोणत्याही सरकारला करता येणार नाही आणि हिंदूंच्या बाजूने निवाडा दिल्यास त्याच्या अंमलबजावणीतही मोठे अडथळे आणले जातील. त्या जागेचा ताबा सहजासहजी हिंदू समाजाला मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाजवळ आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी स्वत:ची अशी कोणतीही यंत्रणा नसते. जी असते ती राज्य सरकारची असते. सरकारला ते करावे लागेल. शबरीमलै प्रकरणी जे होत आहे, त्यावरून अयोध्येत काय होईल, याची कल्पना करता येईल. याचा अर्थ, सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिल्यानंतर हा प्रश्‍न संपुष्टात येईल, अशी कोणतीही शक्यता नाही.
सर्वोच्च न्यायालयाने, हिंदू समाजाच्या बाजूने निवाडा दिल्यास, मुस्लिम समाज आस्थेचा मुद्दा उपस्थित करीत त्याचा विरोध करील. त्या विरोधाला मोडीत काढून, न्यायालयाचा निवाडा लागू करण्याचा प्रयत्न झाल्यास, त्यातून नव्या समस्या तयार होतील आणि पुन्हा मंदिरनिर्माणात अडथळे येतील.
एकच मार्ग!
अयोध्या वाद सोडविण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सरकारने या कामी पुढाकार घेत, वादग्रस्त जागा हिंदू समाजाला सोपविणे! याचे दोन फायदे होतील. न्यायालयीन लढाईत जो वेळ वाया जात आहे, तो वाचविता येईल. सरकारने सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करावी. कोणताही राजकीय पक्ष राममंदिराला विरोध करण्याच्या मानसिकतेत नाही आणि सारेच राजकीय पक्ष, मंदिराच्या बाजूने आहेत हे लक्षात आल्यावर, मुस्लिम समाजही राजी-नाराजीने मंदिरनिर्माणासाठी तयार होईल. यासाठी सरकारने पुढाकार घ्यावयास हवा. सरकारजवळ लोकसभेत बहुमत आहे आणि राज्यसभेत मंदिराला विरोध करण्याचे राजकीय साहस विरोधी पक्षांजवळ नाही. फक्त मुस्लिम लीग व कम्युनिस्ट वगळता अन्य कोणत्याही पक्षाने मंदिरनिर्माणाला विरोध केला नसता. सरकारने या कामी तातडीने पुढाकार घेत, कारवाई सुरू केली पाहिजे असे संत समुदाय, समाजाला वाटत असेल, तर त्यात काहीही गैर नाही. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्याने, या खटल्यातील न्यायालयीन मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत. हा न्यायालयाचा विषय नाही. आणि ही बाब सर्वोच्च न्यायालयाला नम्रपणे सांगण्यातही अडचण नाही.
सीबीआयचा वाद
सीबीआयमधील वाद आता निवळण्याऐवजी चिघळण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने, सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्यावर, विशेेष संचालक राकेश अस्थाना यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश मुख्य सतर्कता आयुक्तांना दिला आहे. ही चौकशी १४ दिवसांत पूर्ण करावयाची आहे. त्यापूर्वीच सीबीआयमधील आणखी एक अधिकारी बस्सी यांनी अस्थाना यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे काही पुरावे सर्वोच्च न्यायालयाला सादर केले असून, त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली असून, त्यावरील सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे. सीबीआयचे हंगामी संचालक नागेश्‍वर राव यांच्याविरोधातही एक याचिका दाखल करण्याची तयारी प्रशांत भूषण यांनी चालविली आहे. राफेल प्रकरणी अरुण शौरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करीत, सीबीआय चौकशीची मागणी केली असताना, सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली, प्रथम त्यांना त्यांचे घर सांभाळू द्या. म्हणजे सीबीआयमधील संघर्षाची लक्तरे वेशीवर टांगली जाणार आहेत. सीबीआयचे अधिकारी परस्परांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहेत. ही स्थिती किती काळ चालेल, सीबीआयला एक नियमित संचालक केव्हा मिळेल, हे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. कायद्यानुसार, सीबीआय संचालकाची नियुक्ती, पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता व सरन्यायाधीश या तिघांची समिती करीत असते.
नवा अवतार
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आता नव्या भूमिकेत राजकीय रंगमंचावर आले आहेत. त्यांच्या तेलगू देसम् पक्षाची भूमिका भाजपा व काँग्रेसविरोधाची होती. नायडू हे डाव्या विचारांचे मानले जातात. १९९८ मध्ये केंद्रात वाजपेयींचे सरकार आल्यावर नायडू यांनी थेट भाजपा सरकारला पाठिंबा दिला नव्हता. त्यांनी प्रारंभी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. तेलगू देसम्ने वाजपेयी सरकारमध्ये सामील व्हावे, असे प्रयत्न भाजपाने केले. त्यास नायडू तयार झाले नाहीत. मात्र, त्यांनी लोकसभा सभापतिपद स्वीकारण्यास संमती दिली व सी. एम. बालयोगी लोकसभेचेे सभापती झाले. त्यानंतर नायडू हळहळू भाजपाच्या जवळ येत गेले. त्यांच्याकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. असे चंद्राबाबू नायडू काँग्रेसच्या जवळ जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यांनी चक्क राहुल गांधी यांची भेट घेत, विरोधी ऐक्याला मजबूत करण्याची भूमिका घेतली आहे. युपीएमध्ये लालूप्रसाद यादव हे युपीएचे स्वयंघोषित संयोजक होते. ती भूमिका नायडू यांनी स्वत:कडे घेतली असल्याचे दिसते. उत्तरप्रदेशात महागठबंधन करण्याची जबाबदारी नायडू यांच्याकडे देण्यात आली असल्याचे समजते. यात नायडू किती यशस्वी होतात, हे काळच सांगेल!

https://tarunbharat.org/?p=67126
Posted by : | on : 5 Nov 2018
Filed under : उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक (49 of 1335 articles)

Prime Minister Narendra Modi
संवाद : सोमनाथ देशमाने | चोवीस तास केवळ राष्ट्रहिताचाच ध्यास घेतलेले नरेंद्र मोदी कुठलाही निर्णय घिसडघाईने घेत नाहीत. सखोल चिंतनानंतर ...

×