ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » अर्बन नक्षल…

अर्बन नक्षल…

‘‘मी गेल्या तीन वर्षांपासून सांगत आहे की, नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहे.’’ हे विधान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी २०१० साली केले होते. कोणत्या पक्षाचे पंतप्रधान होते डॉ. मनमोहसिंग? काँग्रेसचे! त्यानंतर २०१३ साली एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारतर्फे एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. त्यात स्पष्ट म्हटले होते की, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांच्या विचारांशी जुळलेला एक समूह, ज्यात विचारवंत आहेत, उच्चविद्याविभूषित आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे लोक मोठ्या संख्येत संस्था, संघटना उभारून वरील संघटनेच्या कामात छुपी मदत करण्यासाठी झटत आहेत. हे अर्बन नक्षल पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीपेक्षाही अधिक धोकादायक आहेत. यांच्यावर कडक कारवाईची गरज आहे. कारवाईला मंजुरी देणारे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कोणत्या पक्षाचे होते? काँग्रेसचे! बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा २००९ साली आला. त्यात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी आणि माओ-लेनिनवादी, या संघटनांच्या सर्व शाखा, विभाग, संस्था या प्रतिबंधित करण्यात आल्या होत्या. कुणाचे सरकार होते तेव्हा? काँग्रेसचे! २०१० साली केंद्रीय गृहसचिव यांनी एका चर्चासत्रात सांगितले होते की, आमच्याजवळ आलेल्या पत्रांवरून येत्या ५० वर्षांत नक्षली भारतातील लोकशाही व्यवस्था उलथून टाकणार आहेत. यांची रचना मोठी आहे. अजून जे मास्टरमाईंड आहेत, छुपे माओवादी आहेत, ते अजून समोर आलेले नाहीत. कुणाचे सरकार होते तेव्हा? काँग्रेसचे! सध्या अटकेत असलेले वरवरा राव यांना तर आंध्रप्रदेशात कित्येकदा याच कारवायांसाठी अटक झाली, तुरुंगवास झाला. कुणाचे सरकार होते तेव्हा? काँग्रेसचे! गौतम नवलखा याला श्रीनगर विमानतळावर अटक झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. कुणाचे राज्य होते तेव्हा? काँग्रेसचे!… अशा अनेक घटना काँग्रेसच्या सत्ताकाळात घडल्या. त्या वेळी अनेकांना अटक झाली. शिक्षा झाली. त्या वेळी नक्षलवाद, अर्बन नक्षल हे देशासाठी सर्वात मोठा धोका होते. आणि आता? त्याच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात, केंद्र सरकारची या सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध केलेली कारवाई ही लोकशाहीविरोधी आहे. देशात विविध विचारांचे लोक आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे. पण, या देशात एकच संस्कृती चालते आणि ती नागपुरातून चालते. काँग्रेस या कारवाईविरुद्ध लढा देईल. राहुलचे हे विधान दुटप्पी तर आहेच, आपल्याच आधीच्या सरकारांनी घेतलेल्या निर्णयांना छेद देणारे आहे. १९८४ च्या शीख नरसंहारावरूनही त्यांनी अशीच संतापजनक भूमिका घेतली आहे. सध्या पुणे पोलिसांनी पाच अर्बन नक्षल्यांना पकडले आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यात नक्षल्यांकडून आणि या अर्बन नक्षल्यांकडून लिहिलेली हजारो पत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. सध्या हे प्रकरण तपासात आहे. पण, काही कम्युनिस्ट व काँग्रेसधार्जिण्या प्रसिद्धिमाध्यमांनी एकच आरडाओरडा चालविला आहे. या देशातील वकील, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार आणि स्वयंघोषित समाजसेवक हे नक्षलवादी अथवा दहशतवादी नसतात, त्यांचे हस्तक नसतात, असे संविधानात लिहून ठेवले आहे का? पुणे पोलिसांनी नुकत्याच अटक केलेल्या पाच माओवादी हस्तकांवरून हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अरुंधती रॉय यांना तर आणिबाणीची चाहूल लागली आहे! या सर्व लोकांना सोडविण्यासाठी मोठमोठ्या वकिलांची फौज लगेच सर्वोच्च न्यायालयात उभी झाली. एखादा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तपासात कालावधी लागतो. कधीकधी हा तपास अनेक वर्षे चालतो. ज्या पाच जणांना अटक केली आहे, ते सर्व धुतल्या तांदळासारखा आहेत, तर मग त्यांची नावे नक्षलवाद्यांच्या पत्रात कशी काय आली? ६ सप्टेंबरला या प्रकरणावर सुनावणी होईल, त्या वेळी महाराष्ट्र शासन पुरावे सादर करणार आहे. या पाच जणांची बाजू मांडणारे एक तथाकथित मानवतावादी वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयातही भ्रष्टाचार आहे, असे विधान रांची येथे केले होते. त्यांच्या विधानाची सुप्रीम कोर्टाने काहीच दखल का घेतली नाही, असाही प्रश्‍न येथे उपस्थित होतो. पुणे पोलिसांनी या अर्बन नक्षल्यांची अंडीपिल्लीच बाहेर काढली. त्यांच्या घरांच्या झडतीत सापडलेल्या हार्ड डिस्क, कागदपत्रे तपासली असता, त्यात महाभयंकर कटाचे कारस्थान सुरू असल्याचे निष्पन्न झाले. देशातील माओवाद्यांना मदत करणारे हे शहरी नक्षलवादी कसे ओव्हरग्राऊंड राहून या कटाला हातभार लावत होते, याचे पुरावेच त्यांनी पत्रकारांसमोर सादर केले. राजीव गांधींसारखा एखादा कट रचून पंतप्रधान मोदींना संपविण्याचा उल्लेख यात आहे. तसेच एम-४ या अत्याधुनिक रायफली, रॉकेट लाँचर्स खरेदी करण्यासाठी आठ कोटी रुपयांची गरज असल्याचा उल्लेखही आहे. यात काँग्रेस, जिग्नेश मेवानी, प्रकाश आंबेडकर, उमर खालीद, आणि अनेक नावांचा उल्लेख आहे. आणखी अशी अनेक पत्रे आहेत, जी अद्याप पोलिसांनी उघड केलेली नाहीत. अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज म्हणतात, मी नवलखा यांना फार पूर्वीपासून ओळखते. ते समाजसेवक आहेत. अरुंधती रॉय स्वत:ला लेखिका आणि समाजसेविका समजतात. पण, याच अरुंधती रॉय नक्षलवाद्यांना जाऊन भेटतात. कुणाची सेवा करण्यासाठी? वरवरा राव यांचे नाव नक्षल्यांच्या पत्रांमध्ये वारंवार येण्याचे कारण काय? वेर्नन गोन्साल्विस याला मुंबई पोलिसांनी- २००७ साली मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने- अटक केली होती. तेव्हा तर काँग्रेसचेच शासन होते. हा गोन्साल्विस आणि त्याचा साथीदार श्रीधर श्रीनिवासन यांना नागपुरात २००७ साली अटक करण्यात आली होती. घातपाताची योजना तयार करण्याचा त्यांचा मनसुबा होता. त्या वेळी त्यांच्याजवळून ९ डिटोनेटर्स, जिलेटिनच्या २० कांड्या, एक वॉकी-टॉकी व संगणक जप्त करण्यात आला होता. गोन्साल्विस याला नागपूर कोर्टाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. अरुण फरेरा, ज्याला नुकतीच पुणे पोलिसांनी अटक केली, त्याला नागपूर पोलिसांनी, त्याचा साथीदार नक्षल कमांडर अरुण सत्या रेड्डी उर्फ मुरली याच्यासह अटक केली होती. नक्षल्यांचा मुख्य कमांडर कोंडापल्ली सीतारामय्या यालाही ७० च्या दशकात नागपुरात अटक झाली होती. ८० च्या दशकात कोबाड गांधी, गदर हाही त्याच वेळेस नागपुरात आपल्या कलामंचासह आला होता आणि तेव्हापासून नागपूर शहर व विदर्भाला अर्बन नक्षलच्या वाढीसाठी लक्ष्य केले गेले होते. अजूनही नागपूर-विदर्भात असे अर्बन नक्षल शेकडोंनी आहेत. हा अर्बन नक्षलवाद अलीकडे संपूर्ण देशात फोफावत चालला आहे. कारण, यांचे जे जंगलातील कॅडर आहे, त्यांच्या संख्येत ७० टक्क्यांनी घट झाली आहे. शेकडो नक्षल्यांनी या जीवनाला कंटाळून आत्मसमर्पणाचा मार्ग चोखाळला आहे, तर बरेच कॅडर चकमकीत ठार मारले गेले आहेत. त्यामुळे त्यांचा भर हा शहरांकडे वाढलेला आहे. त्यासाठी ते उच्चविद्याविभूषित लोकांना हाताशी धरत आहेत. जन्मठेपेची शिक्षा भोगणारा प्रो. साईबाबा आणि कोबाड गांधी यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचाही उल्लेख पत्रात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राजुरा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष बियाबानी याला ९० च्या दशकात रुग्णवाहिकेमधून नक्षल्यांसाठी साहित्य पोचविताना पोलिसांनी टाडामध्ये अटक केली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयानेही जामीन नाकारला होता. अर्बन नक्षल्यांचा नागपूर आणि विदर्भातील शहरांत बर्‍याच काळापासून वावर होता, हे वरील घटनांवरून दिसून येते. यानंतर यांनी आपले कार्यक्षेत्र पुणे निवडले. विविध कला मंचात, संघटनात, एनजीओत काम करणार्‍या लोकांना आपल्याकडे वळविण्याची मोठी मोहीम अर्बन नक्षल्यांनी चालविली आहे. सुप्रीम कोर्टाने असंतोष हा सेफ्टी व्हॉल्व्हसारखा असतो, असंतोष वाढला तर त्याचा स्फोट होईल, अशी टिप्पणी केली आहे. पण, न्यायालयांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, ज्या नक्षल्यांनी शेकडो आदिवासी आणि दलितांना क्रूरपणे ठार मारले, त्यांच्या मनातही हा असंतोष धुमसत आहे. त्याचाही स्फोट होऊ शकतो. गडचिरोलीत नुकत्याच चकमकीत ४० नक्षल्यांना ठार मारण्यात आले. अशीच एक अर्बन नक्षल्यांंची कथित चौकशी समिती आली असता, गावकर्‍यांनी त्यांना हुसकावून लावले. तेव्हा निर्णय देताना गरीब दलित-आदिवासींचा टाहोही आपल्या कानावर असू द्यावा. सध्या हे प्रकरण प्राथमिक अवस्थेत आहे. पोलिसांना आपला तपास करू द्यावा आणि नंतर त्यावर न्यायालयात जो काही निर्णय होईल तो होईल…

https://tarunbharat.org/?p=61142
Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (378 of 843 articles)


चौथाईवाले | तीस वर्षांपूर्वी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) माझे पीएच्. डी. प्रबंधाचे काम अर्ध्यावर आले असताना, मला एका फ्रेन्च ...

×