अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » आता आरक्षणाचे आंदोलन थांबवावे…

आता आरक्षणाचे आंदोलन थांबवावे…

मराठा आरक्षणाचा राज्यातील चिघळलेला (की मुद्दाम चिघळविलेला) प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या संयमाने आणि निर्धाराने सोडविला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. मराठा समाजाला आरक्षण आमचेच सरकार देणार आणि तेही टिकाऊ, देवेंद्र फडणवीस यांच्या या ग्वाहीवर, ते इतर चलाख नेत्यांसारखे नसल्यामुळे लोकांनी विश्‍वास ठेवला पाहिजे. संपूर्ण मंत्रिमंडळ, सत्ताधारी पक्ष आणि समाजातील शहाणे मान्यवर यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठाम राहून, एक सकारात्मक संदेश समाजात दिला आहे.
हा प्रश्‍न चिघळत राहावा आणि त्याचा लाभ निवडणुकीत घ्यावा, अशी मनीषा बाळगून जे कुणी राजकीय पुढारी मनात मांडे खात होते, त्यांची मात्र साफ निराशा झाली आहे. समाजात उद्भवलेले प्रश्‍न किंवा समस्या या तत्काळ न्याय्य मार्गाने सोडवायच्या असतात, याचाच या मतलबी नेत्यांना विसर पडला आहे.
मुळात, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न २००३-०४ सालचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री व खासदार शालिनीताई पाटील यांनी हा मुद्दा मांडला होता. त्या वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेले मराठ्यांचे कथित नेते शरद पवार यांना शालिनीताई पाटील यांची ही मागणी योग्य वाटली नाही. कदाचित शालिनीताई वरचढ होतील, अशी भीतीही त्यांना वाटली असावी. त्यानंतर पवारांनी शालिनीताईंना खड्यासारखे बाजूला सारून, शालिनीताईंचे राजकीय आयुष्य संपवून टाकले. त्यानंतर इतकी वर्षे सत्तेचे सुख भोगताना शरद पवारांना कधीही मराठा आरक्षणाची आठवण झाली नाही. मराठा समाज पाठीशी असल्यामुळे तशी त्यांना गरजही वाटली नसावी. परंतु, २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची धुळधाण झाली. एकूण ४८ जागांपैकी राष्ट्रवादीला केवळ चारच जागा- कोल्हापूर, सातारा, बारामती व माढा- जिंकता आल्या. मराठा समाजाने साथ सोडल्याशिवाय असे घडले नसते, हे जाणून राजकीय नेत्यांनी चाणाक्षपणे डावपेच लढविणे सुरू केले. या समाजाला भडकावून पुन्हा आपल्या वळचणीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचाच एक व महत्त्वाचा भाग म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलन. शालिनीताई पाटील यांनी तर स्पष्ट आरोप केला आहे की, शरद पवार बोलतात एक व करतात दुसरेच आणि आतातरी त्यांनी असे करू नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आज मराठा आरक्षणासाठी आग्रही असणार्‍या व त्यासाठी प्रसंगी घटनादुरुस्ती करण्याची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अक्कल सांगणार्‍या शरद पवारांनी, १२-१४ वर्षांपूर्वीच शालिनीताई पाटील यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत कारवाई केली असती, तर आज मराठा आरक्षणाचे चित्र वेगळेच दिसले असते. आज शरद पवार मराठा आरक्षण दिले पाहिजे असे म्हणत आहेत. त्यावर कुणीही विश्‍वास ठेवायला तयार नाही. कारण ओठात एक व पोटात दुसरेच. आता ते पूर्णपणे उघडे पडले आहेत. तेच का म्हणून? मराठा समाजाचे जे कुणी नेते आतापर्यंत मिरवत होते, ते सर्वजण उताणे पडले आहेत. इतकी वर्षे केवळ मूठभर लोकांची घरे पैशाने भरण्यात आलीत. सर्वसामान्य मराठा समाज मात्र तसाच भणंग अवस्थेत राहिला. हे सत्य आज अत्यंत कठोरपणे समोर येत आहे. दुसरे असे की, मराठा आरक्षण देणे आज कायद्याच्या दृष्टीनेही थोडे किचकट झाले आहे. पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे घिसाडघाईमुळे मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला तरी तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. हे सर्व ज्ञात असतानाही, केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांची या निमित्ताने कोंडी करायची, या दुष्ट हेतूनेच हा सगळा हिंसाचाराचा खेळ राजकीय सारिपाटावर मांडण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकायचे असेल, तर आधी या समाजाला मागासवर्गीयांच्या व्याख्येत बसवावे लागेल. त्यासाठी फडणवीस सरकारने मागासवर्ग आयोगाकडे हा प्रश्‍न सोपविला आहे. एक प्रामाणिक सरकार जितके काही करू शकते, तितके या सरकारने मनापासून केले आहे. परंतु, ज्यांना मराठ्यांना आरक्षण मिळण्यापेक्षा, ही व्होटबँक आपल्याकडे कशी वळेल यातच अधिक स्वारस्य आहे, त्यांना फडणवीस सरकारचे हे प्रयत्न कसे गोड वाटणार? विधिमंडळात, सार्वजनिक प्रतिक्रिया देताना चोपड्या गोष्टी बोलायच्या आणि तिकडे पडद्यामागून हे आंदोलन कसे चिघळेल, कसे हिंसक बनेल व त्यामुळे फडणवीस सरकार निवडणुकीच्या तोंडावर कसे अडचणीत येईल, असे प्रयत्न करायचे. अधिकांश मराठा नेत्यांचे हेच कारनामे सुरू होते. ते सर्व कारनामे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संवेदनशीलतेने, प्रामाणिकतेने, स्पष्टवक्तेपणाने व मुत्सद्दीपणाने थंडे केलेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा अनुभव केवळ मराठा आरक्षणाबाबतच आलेला नाही. गेल्या चार वर्षांत जितकी काही आंदोलने झालीत, मागण्या समोर आल्यात, त्या संदर्भातही या सरकारने संवेदनशीलतेने तत्काळ निर्णय घेऊन, समाजाला आश्‍वस्त व समाधानी केले आहे. जे न्याय्य आहे, हक्काचे आहे, ते देण्याला या सरकारने कधीही विलंब किंवा टाळाटाळ केली नाही. शेतकर्‍यांच्या बाबतीत तर आतापर्यंतचे कुठलेही सरकार, फडणवीस सरकारइतके संवेदनशील सिद्ध झाले नाही. समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणाचा मार्ग स्वीकारणार्‍यांकडून हेच अपेक्षित होते आणि आहे. मराठ्यांना टिकाऊ आरक्षण देण्यात, किती व काय अडचणी आहेत, याची कल्पना मुख्यमंत्र्यांना आहे व ती त्यांनी सर्वांना करूनही दिली आहे. त्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल. परंतु, त्या काळात, मराठा समाजाला ताटकळत न ठेवता, त्यांनी आरक्षणाच्या समकक्ष अनेक योजना व सवलती जाहीर केल्या आहेत. राज्यात ७२ हजार पदभरती आहे. त्यातही मराठा समाज वंचित राहू नये म्हणून या ७२ हजारांत १६ टक्के जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. शिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर व मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. मनात एक व कृतीतही तेच असले की, समाजही ते समजून घेतो. संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील प्रत्येक जण माझा सुहृद आहे आणि त्याचा योगक्षेम सांभाळण्याची जबाबदारी जनतेने माझ्यावर सोपविली आहे, ही जाणीव हृदयात सतत जागृत होती म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना ही समस्या सोडविण्यात यश आले. ही जाणीव आधीच्या राज्यकर्त्यांमध्ये असती, तर आज महाराष्ट्राचे रूप अधिकच सुंदर, संपन्न व समृद्ध दिसले असते. आता मराठा समाजाने तुटेपर्यंत न ताणता, आपल्या राज्याला संपन्न व श्रीमंत करण्यासाठी सर्वांसोबत झटण्याच्या कार्याला प्राधान्य द्यावे, हीच अपेक्षा आहे…

http://tarunbharat.org/?p=59096
Posted by : | on : Aug 4 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (31 of 795 articles)


सुनील कुहीकर | एव्हाना पहिल्या वर्गात नाव दाखल करण्याचं वय झालं होतं. पण उपाय नव्हता. गावात शाळाच नव्हती. करणार काय? ...

×