ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » आता सर्वांचीच लागणार कसोटी!

आता सर्वांचीच लागणार कसोटी!

केंद्रीय निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी शनिवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. त्यात छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत म्हणजे १२ आणि २० नोव्हेंबरला, २८ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मध्यप्रदेश आणि मिझोरम आणि ७ डिसेंबरला तेलंगणा आणि राजस्थानात एकाच दिवशी मतदान होईल. ११ डिसेंबरला निकाल घोषित केले जातील. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत यासाठी की, हे राज्य नक्षलप्रभावित आहे. सुरक्षा तैनातीच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकींची स्थिती काय राहील, हे या पाच राज्यांच्या निकालावरून स्पष्ट होईल. काँग्रेसला यातही राजकारण दिसत आहे. म्हणे, निवडणूक आयोगाने आधी दुपारी साडेबाराची वेळ पत्रपरिषदेसाठी ठरविली होती. पण, मोदींच्या राजस्थानातील सभेमुळे वेळ तीनवर नेण्यात आली. काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या पारदर्शितेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण केेले. त्याचा खुलासा आयोगाचे अध्यक्ष रावत यांनी त्वरित केला. तेलंगणात निवडणूक यादी प्रकाशित न झाल्याचा संदेश आला. निवडणूक यादीचे प्रकरण उच्च न्यायालयात आहे आणि अंतिम यादी उच्च न्यायालयाच्या संमतीने जाहीर होणार होती. आता ही यादी १२ ऑक्टोबरला प्रकाशित केली जाणार आहे. काँग्रेसला ही अडचण माहीत नव्हती का? काँग्रेसचे लोक तेलंगणात नाहीत का? अडचण माहीत असतानाही, केवळ निवडणूक आयोगावर शंका घेण्याची भूमिका यावेळीही काँग्रेसने बजावली आणि आपला कंड तेवढा शमवून घेतला. दुसरी बाब म्हणजे, भारतीय जनता पार्टी ही काही लेचीपेची पार्टी नाही. कारण, आज कार्यक्रम घोषित होऊ शकतो, हे सर्वच राजकीय पक्षांना माहीत होते. तरीही काँग्रेसने वळवळ केलीच! आता निवडणुका घोषित झाल्या आहेत. काही राजकीय पंडित या पाच राज्यांतील निवडणुकांना ‘उपान्त्य सामने,’ असेही म्हणत आहेत. हे खरेच आहे. कारण, अनेक राजकीय पक्ष आतापासूनच मोठमोठे दावे करीत आहेत. वाहिन्यांवरून निवडणुकीचे अंदाजही बांधले जात आहेत आणि त्यावर चर्चांसत्रांना नुसते उधाण आले आहे. मध्यप्रदेशात सर्वाधिक २३१ जागा, त्यापाठोपाठ राजस्थान २००, तेलंगणा १२०, छत्तीसगड ९१ आणि मिझोरममध्ये केवळ ४० विधानसभा जागा आहेत. या जागा जिंकण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे, तर काँग्रेसही जोर लावत आहे. पाचपैकी तीन राज्यांत भाजपाची सत्ता आहे, तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समिती आणि मिझोरममध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या ८३ जागा आहेत. यांपैकी पाचही राज्यांत खरी कसोटी आहे काँग्रेसची आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची! त्याचे कारण म्हणजे, मिझोरमवगळता चारही राज्यांत कोणत्याच पक्षाला काँग्रेससोबत युती नको आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानात बहुजन समाज पक्षासोबत युती करून अधिक जागा पदरात पाडण्याचा काँग्र्रेसचा विचार होता. छत्तीसगडमध्येही त्यांची हीच योजना होती. मध्यप्रदेशात बसपाला कमी लेखून अवघ्या २५-३०, तर राजस्थानात फक्त १०-१५ जागा देण्याची काँग्रेसची योजना होती. ती मायावतींनी साफ फेटाळून लावली आणि मध्यप्रदेश व राजस्थानात एकटे लढण्याची घोषणा केली. छत्तीसगडमध्ये तर अवघ्या ५ जागाच काँग्रेस देणार होती. तेथे आधी मायावतींनी युती तोडली व अजित जोगी या जुन्या काँग्रेस नेत्यासोबत युती केली. त्यामुळे या राज्यांमध्ये आता काँग्रेसला एकट्याने लढावे लागणार आहे. तिकडे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनीही काँग्रेससोबत मध्यप्रदेशात युती करणार नसल्याची घोषणा करून टाकली. काँग्रेसने खूपच उशिर केला, असा आरोपच त्यांनी केली. अखिलेश यांना हे पक्के माहीत आहे की, मध्यप्रदेशात काँग्रेसला जवळ करणे म्हणजे बहेनजींसोबत उत्तरप्रदेशात युती तोडणे आहे. वास्तविक पाहता, मायावतींना आपल्या कोणत्याही युतीत काँग्रेस नकोच होती. निवडणुका घोषित होण्याची वेळ आली, तरी काँग्रेसने चर्चेचे गुर्‍हाळ कायमच ठेवले होते. ती काँग्रेसची जुनीच कार्यशैली. आता ‘तेलही गेले आणि तूपही गेले, हाती धुपाटणे आले!’ अशी स्थिती काँग्रेसची झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तिहेरी सामने होणार आहेत. त्याचा लाभ निश्‍चितपणे भाजपा उठविण्याचा प्रयत्न करेल. तेलंगणात तर राहुल गांधींची डाळ शिजणे शक्यच नव्हते. कारण, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुदतीपूर्वीच विधानसभा भंग करण्याची शिफारस केल्यानंतर, लगेच पत्रपरिषदेत जाहीर रीत्या सांगितले होते की, राहुल गांधी हे या देशातील सर्वांत मोठे विदूषक आहेत! आता तेथे आम्ही स्वबळावर सत्ता प्राप्त करू, अशा वल्गना राहुल गांधी करीत आहेत. काँग्रेसने महागठबंधनचा नारा दिला होता. आधी मोदींना पराभूत करा, नंतर कोण पंतप्रधान होणार याचा विचार करू, असे राहुल गांधी म्हणाले होते. पण, महागठबंधनात येणारे पक्ष मूर्ख नव्हते. काँग्रेसला लागलेली उतरती कळा पाहून, आपल्या भरवशावर काँग्रेस आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे, हे त्यांना आधीच समजले होते. दुसरी बाब म्हणजे, जे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे स्पिरीट होते, ते राहुल गांधींमध्ये एक टक्काही नव्हते. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा कशाला? म्हणून सर्वांनीच काँग्रेसपासून चार हात लांब राहण्याचाच निर्णय घेतला. काँग्रेस हे विसरूनच गेली की, मायावतीचे उमेदवार निवडून येणार नाहीत, पण काँग्रेसचे उमेदवार पाडण्याची बहेनजीमध्ये क्षमता आहे. हा सारा घटनाक्रम अन्य प्रादेशिक पक्ष पाहात आहेत. आज भाजपाजवळ स्वत: आणि मित्रपक्षांची मिळून २१ राज्यांत सत्ता आहे. या राज्यांत भाजपाला पराभूत करणे काँग्रेसच काय, कोणत्याच पक्षाला सहजासहजी शक्य नाही! सर्व हिंदीभाषिक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. मिझोरम वगळता संपूर्ण पूर्वांचलात भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. पक्षाजवळ एकाहून एक सरस नेत्यांची फळी आहे. काँग्रेसजवळ थोडके नेते प्रादेशिक स्तरावरचे आहेत. आजच काँग्रेसची ही स्थिती आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर लोकसभेत काँग्रेससोबत युती करायची, की आपले राज्य सांभाळायचे, याचा विचार अन्य नेत्यांना करावाच लागेल. या पाच विधानसभा ही काँग्रेससाठी पहिली कसोटी असेल, लोकसभेची दुसरी असणार आहे!

https://tarunbharat.org/?p=65278
Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (124 of 773 articles)


दाणी | ‘‘माझे व्यक्तिमत्त्व जरा कठोर आहे. मी जसा आहे तसाच राहणार आहे. त्यात बदल होणार नाही.’’- नवे सरन्यायाधीश न्या. ...

×