ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » आशियाडमधील दमदार कामगिरी!

आशियाडमधील दमदार कामगिरी!

आशियाडची यशस्वी सांगता झाली. यंदाच्या आशियाड क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार, दिमाखदार कामगिरी केली. चीन, जपानच्या तुलनेत आपल्या देशाला कमी पदकं मिळाली असली, तरी भारताची कामगिरी लक्षणीय ठरली आहे, हे नाकारून चालणार नाही. यंदाच्या आशियाडमधील भारताची कामगिरी लक्षात घेता, भारतीय खेळाडू पुढल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये निश्‍चितपणे चांगली कामगिरी करतील, अशी आशा आता निर्माण झाली आहे. आशियाड क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय खेळाडूंनी यंदा सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदनही केले आहे, हे विसरून चालायचे नाही. यंदाच्या स्पर्धेत भारताला सुवर्ण, रौप्य आणि कांस्य मिळून एकूण ६९ पदकांची कमाई करता आली, याचा अर्थ, आपल्या खेळाचा दर्जा आता सुधारत चालला आहे आणि पुढल्या ऑलिम्पिकपर्यंत तो आणखी सुधारेल, यात शंका नाही! पूर्वीच्या तुलनेत राज्य सरकारे आणि केंद्र सरकारकडून खेळाला विशेष प्रोत्साहन दिले जात असल्यानेच खेळात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. खेळातले राजकारण जर संपुष्टात आणले, तर आणखी सुधारणा घडून येईल आणि अधिक पदकं जिंकता येतील, हेही लक्षात घेतले पाहिजे. ज्यांचा कधी कोणत्याच खेळाशी संंबंध आला नाही, असे लोक जेव्हा क्रीडा संघटनांवर ताबा मिळवितात, तेव्हा त्या संघटनेचा सत्यानाश होण्यास आणि खेळाचा दर्जा घसरण्यास वेळ लागत नाही. दुर्दैवाने पैशांच्या बळावर आपल्या देशातील राजकारण्यांनी बहुतांश क्रीडा संघटना आपल्या ताब्यात ठेवण्याचा व त्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यानेच आपल्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकले नाहीत, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांचा टिकाव लागू शकला नाही. पण, यंदाच्या आशियाड स्पर्धेने भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत. भारतीय खेळ आणि खेळाडूंना चांगले दिवस येतील आणि नवनव्या क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्ण पदकं प्राप्त होतील, अशी आशा आता वाटायला लागली आहे. भालाफेक, शॉटपुट, हेप्टाथ्लॉन, पुरुषांची १५०० मीटर दौड, लाईटवेट बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले. यानिमित्ताने सुरुवात झाली आहे आणि ही तमाम भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. आपल्या महाराष्ट्राची कन्या कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिने आशियाड क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच नेमबाजीत सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ती जरी महाराष्ट्रीयन असली, तरी तिच्या कामगिरीचा संपूर्ण भारताला अभिमान आहे. नेमबाजीत सुवर्णपदक मिळवून तिने या क्रीडा प्रकारात सहभागी होणार्‍या इतर सर्व भारतीय खेळाडूंचे मनोबलही उंचावले आहे. घोडेस्वारीमध्येही तब्बल ४२ वर्षांनंतर रौप्यपदक मिळाले आहे. जवळपास एवढ्याच कालावधीनंतर भारताला कुस्तीतही दोन सुवर्णपदकं मिळाली आहेत, ही बाबही लक्षणीय मानली पाहिजे. बॅडमिंटन या खेळात वैयक्तिक प्रकारात यंदा पहिल्यांदाच रौप्य आणि कांस्यपदक मिळाले, ही मोठी उपलब्धी मानावी लागेल. टेबल टेनिस या खेळात भारताला आतापर्यंत पदक मिळालेच नव्हते. दोन कांस्यपदकं जिंकून तो दुष्काळही खेळाडूंनी संपुष्टात आणला आहे. आठशे मीटर दौड स्पर्धेत मंजित सिंग या धावपटूने ३६ वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवून देत ऑलिम्पिकसाठीच्या आशा पल्लवित केल्या आहेत. त्याचप्रमाणे दुतीचंदने महिलांच्या शंभर मीटर दौडीत आणि मोहम्मद अनसने चारशे मीटर दौडीत ३२ वर्षांनंतर रौप्यपदक मिळवून देत पदकतालिकेची उंची वाढविण्याची मोलाची कामगिरी केली आहे. भालाफेकीत तर नीरज चोपडाने ऑलिम्पिकच्या दर्जाची कामगिरी केली! त्यामुळे पुढल्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीतही भारताला पदक मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. यंदाच्या आशियाड क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण १५ सुवर्णपदकं जिंकली आहेत. एवढी पदकं याआधी १९५१ साली जिंकली होती. त्यानंतर प्रथमच एवढी चमकदार सोनेरी कामगिरी करण्यात यश मिळाले आहे. गेल्या आशियाड स्पर्धेच्या तुलनेत भारताने यंदा चार सुवर्णपदकं आणि १४ रौप्यपदकं जास्तीची जिंकली आहेत आणि ही बाब प्रत्येक भारतीयाच्या मनाला आनंद देणारी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसर्‍या स्थानी असलेल्या भारताला क्रीडा स्पर्धांमध्ये मात्र पदकांच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो, याचे प्रत्येक भारतीयाला आश्‍चर्य वाटते. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश, दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या, संसाधनांची विपुलता, अनुकूल वातावरण असतानाही खेळात पदकं जिंकताना आपण पिछाडीवर का जातो, याचा विचार प्रत्येकाच्या मनात येतो. पण, ज्यांना जाब विचारायला पाहिजे, त्या धोरणकर्त्यांना आम्ही कधीच तो विचारत नाही. त्याच्या परिणामी खेळातील राजकीय हस्तक्षेपही थांबत नाही आणि औदासीन्यही दूर होत नाही. मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज तयार करणारे मेकॉले पद्धतीचे शिक्षण देऊन आम्ही खेळांसाठी मात्र तरुणाईला तयार करू शकत नाही, हे दुर्दैवीच होय. अभ्यासासोबतच खेळांनाही प्राधान्य आणि प्रोत्साहन देण्यात आले, तर जगातल्या सगळ्याच स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू उत्तुंग कामगिरी करू शकतात, हे आशियाडमधील आपल्या कामगिरीने सिद्ध झाले आहे. केवळ क्रिकेटलाच प्राधान्य देऊन चालणार नाही. भविष्यात आपल्याला पदकं जिंकायची असतील, तर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक खेळाला प्रोत्साहन द्यावे लागेल. प्रत्येक खेळासाठीची साधनसामग्री, मार्गदर्शन, प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे लागेल. क्रीडाक्षेत्राला भ्रष्टाचाराचे जे ग्रहण लागले आहे, ते दूर करावे लागेल. क्रीडाक्षेत्रात घुसलेली वशिलेबाजीही संपुष्टात आणावी लागेल. ज्याच्याकडे क्षमता अहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, खेळभावना आहे, हुनर आहे अशांनाच सरकारी सोईसुविधा उपलब्ध करून दिल्यात, तर त्याचा निश्‍चितपणे फायदा होऊ शकेल. आपल्यापैकी अनेक जण केवळ सरकारी नोकरीत प्रवेश मिळतो म्हणून क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतात. एकदा का क्रीडा कोट्यातून नोकरी मिळाली, की मग पुन्हा ते खेळाकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळे क्रीडा कोट्यातून नोकर्‍या देण्यासाठीचे जे धोरण आहे, त्यातही आवश्यक ते बदल करायला हवेत. असे बदल करणे ही काळाची गरज आहे. नुकत्याच आटोपलेल्या आशियाड क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली असली, तरी अनेक क्रीडा प्रकारांमध्ये आपल्याला एकही पदक मिळाले नाही, याकडे दुर्लक्ष करून चालायचे नाही. वेटलिफ्टिंग, जलतरण, जिम्नॅस्टिक्स, हॅण्डबॉल, व्हालिबॉल, बास्केटबॉल, ज्युडो, कराटे, तायक्वांडो, तलवारबाजी, गोल्फ, सायकलिंग आदी खेळांमध्ये सहभागी झालेले भारतीय खेळाडू रिकाम्या हाताने परतले, हेही लक्षात घ्यावे लागेलच. काहीही असो, यंदाच्या आशियाड क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी आधीच्या तुलनेत खरोखरीच उजवी राहिली आहे आणि त्यासाठी सर्व भारतीय खेळाडू अभिनंदनास पात्र आहेत!

https://tarunbharat.org/?p=61269
Posted by : | on : 5 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (268 of 737 articles)


पेठकर | जो आपल्याला शाळा-कॉलेजला शिकवितो तो आपला गुरूच असतो, असे अजीबातच नाही. खरेतर क्रमिक अभ्यासक्रम शिकविण्याचे काम ज्यांनी मासिक ...

×