प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक » उत्तरप्रदेशची ‘स्मिता‘ आणि अस्मिता !

उत्तरप्रदेशची ‘स्मिता‘ आणि अस्मिता !

दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी

घराणेशाहीचा पाया असेल्या राजकीय पक्षांना घराणेशाहीचा शापही लागतो. मग, तो पक्ष शिवसेना असो की समाजवादी असो की राष्ट्रीय जनता दल असो. शिवसेनेत फूट पडली ती वारसदारीच्या मुद्यावरुन. बाळासाहेब ठाकरे शक्तिशाली असताना, दोन्ही बछडे निमुटपणे त्यांच्यामागे चालत असत. त्यांना वृध्दत्वाने गाठले. त्यातच त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले. मग ,पक्षात स्मिता ठाकरे युग सुरु झाले. वाजपेयी सरकार असताना एका केंद्रिय मंत्र्याने त्याची वर्णी स्मिता ठाकरे यांच्यामुळेच लागली असे प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले होते. बाळासाहेब उध्दव ठाकरे यांचे ऐकत नाहीत काय या प्रश्‍नावर त्याचे उत्तर होते, माझी वर्णी स्मिता ठाकरे यांच्यामुळे लागली एवढेच मी सांगेन.नंतर वारसदारीचा मुद्या समोर आला. अखेर शिवसेनेत फुट पडून दोन पक्ष स्थापन झाले. बाळासाहेबांच्या निधनानंतर स्मितायुगही लयास गेले.
तोच घटनाक्रम
समाजवादी पक्षात जे काही सुरु आहे ते बरोबर याच धर्तीवर सुरु आहे. मुलायमसिंग घडघाकट असताना, शिवपाल, रामगोपाल आणि अखिलेश सारे त्यांच्यासोबत होते. त्यांच्या निर्णयात दखल देण्याची ताकद कुणाजवळही नव्हती. मधल्या काळात मुलायमसिंग यांच्या पत्नी मालतीदेवी यांचे निधन झााले. मुलायमसिंगांना वृध्दत्वाने गाठले आणि साधना गुप्ता नावाच्या महिलेचा उदय झाला. शिवपाल, रामगोपाल, अखिलेश विरोध करु लागले . मुलायमसिंगांच्या घरात साधना गुप्ता नावाच्या महिलेचा प्रभाव वाढू लागला. यात अमरसिंग यांची मोठी भूमिका असल्याचे मानले जाते. मुलायमसिंग यांचा दुसरा विवाह साधना गुप्ताशी झाला होता. मात्र त्यांनी सार्वजनिकपणे साधनाला स्वीकारले नव्हते. अमरसिंगांच्या प्रयत्नाने ते झाले. आता साधना गुप्ता अमरसिंगांच्या उपकाराची परतफेड करीत आहेत. अखिलेशचे अमरसिंगाची कधी जमले नाही. अखिलेशला प्रतिशह म्हणून अमरसिंग यांनी साधना गुप्ताच्या मुलास प्रतीकला राजकारणात आणण्याचे चालविले आहे.मुलायमसिंगांनी पाच वर्षांपूर्वी अखिलेश यादवला आपल्या मोठ्या पुत्रास लखनौचे राजसिंहासन दिले. दरम्यान, साधना गुप्तांचा प्रतीक मोठा झाला. राजसिंहासनावर त्याचाच हक्क असा स्त्रीहट्ट साधना गुप्तांनी सुुरु केला आणि पिता- पुत्रात दुही सुरु झाली. याने समाजवादी पक्षाची व उत्तरप्रदेशची अस्मिता धोक्यात आणली.
समाजवादी पक्षाचे आता वाटोळे झाले तरी त्याची अमरसिंगांना चिंता नाही. उलट सपाचे वाटोळे करण्याचे त्यांचे धोरण आहे. कारण, मुलायमसिंग यांच्या पश्यात सपात आपल्याला स्थान नाही हे त्यांना पक्के ठावूक आहे. या सार्‍या घटनाक्रमात
नायक- खलनायक
समाजवादी पक्षात दुहीची बीजे पडली आहेत. विधानसभा निवडणुका येता- येता या बीजांनी फुटीचे फळ धरलेले असेल. या सार्‍या घटनाक्रमात मुलायमसिंग यादव यांचे बंधू शिवपाल यादव व त्यांचे साथीदार अमरसिंग हे दोघे खलनायक म्हणून सिध्द होत आहेत तर अखिलेश यादव यांना सहानुभूती मिळत आहे.एखाद्या कौटुंबिक कलहात, कुटुंबातील सर्वांनी मिळून, शिकल्या सवरल्या मुलास घराबाहेर काढल्यावर त्याला जी सहानुभूती मिळते ती सध्या अखिलेशला यादव यांना मिळत आहे. एका ताज्या जनमत चाचणीतही अखिलेश यादव यांची लोकप्रियता वाढली असल्याचे सांगण्यात आले आहे. समाजवादी पक्षात सुरु असलेल्या संघर्षाचा मोठा फायदा अखिलेश यादव यांना मिळत असल्याचे या जनमत चाचणीत म्हटले आहे. विधानसभा निवडनुकीपयर्ंंत सपात विभाजन झालेले असेल असे अनेकांना वाटते. कारण, आता मुख्य मुद्या तिकीटवाटपाचा राहणार आहे. शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आल्याचे ते तिकीट वाटपात माघार घेणार नाहीत. अखिलेशने त्यांना सरकारबाहेर काढल्यानंतर त्यांनी सरकारी निवास तातडीने रिकामा केला. शिवपाल यादव तिकीटवाटपात अखिलेश यादव यांना जराही महत्व देण्याच्या मन:स्थितीत नाहीत असे समजते. दुसरीकडे अखिलेश यादव तिकीटवाटपाचे महत्व जाणून आहेत. सपातील सारी लढाई विधानसभा निवडणूकीनंतरच्या वर्चस्वाची आहे हे स्पष्ट असल्याने अखिलेश यादवही तिकीटवाटपात माघार घेणार नाहीत असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. आणि या मुद्यावरुनच सपात विभाजन होईल असा एक कयास आहे. या विभाजनाचा मुलायम- अखिलेश यांना फटका बसेल की त्यांना फायदा होईल हे आताच सांगता येणार नाही. मात्र यात मुलायसिमग यांना फायदा होण्याची शक्यता कमी दिसून येते. मुलायमसिंग व अखिलेश यादव यांनी एकत्र राहण्यात दोघांचेही हित होते, मात्र ती शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे.
तणाव वाढला
भारत- पाक सीमेवरील तणाव अपेक्षेनुसार वाढत आहे. नोव्हेंबर महिण्याची प्रतिक्षा करा, अनेक घटना घडताना दिसतील असे भाष्य पाकिस्तानातील एका अधिकार्‍याने काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत केले होते. त्याचा अर्थ आता लक्षात येत आहे. सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स व सैनिक यांच्या कारवाया वाढत आहेत. पाकिस्तानी लष्करप्रमुख राहिल शरीफ यांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिण्यात संपत आहे आणि ते आपला कार्यकाळ वाढविण्याच्या प्रयत्नात सीमेवर गडबड करण्याची दाट शक्यता आहे असे म्हटले जात होते. तशा घटना सीमेवर घडू लागल्या आहेत. या घटना मर्यादित राहतात की त्यांची व्याप्ती वाढते हे सांगणे अवघड आहे. कारण तणावाच्या वातावरणात परिस्थिती कधीकधी हाताबाहेर जात असते. पाक लष्कर ज्या कारवाया करीत आहे त्याने ही शक्यता तयार होत आहे.
अंतर्गत असंतोष
दुसरीकडे पाकिस्तानातील नवाझ शरीफ सरकारला अंतर्गत असंतोषाचा सामना करावा लागत आहे. पनामा पेपर्स या नावाने जे दस्तावेज बाहेर आले, त्यात नवाझ शरीफ व त्यांच्या कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली. याचा फायदा लष्कराने उचलला व शरीफ सरकारच्या भारतविषयक धोरणाला आव्हान देणे सुरु केले असे मानले जाते. शरीफ यांना भारतासोबतचे संबध सुधारावयाचे होते. ही बाब पाक लष्कराला मान्य नव्हती. त्याला पनामा पेपर्सचे निमित्त मिळाले. लष्कराच्या दबावाखाली शरीफ यांनाही भारतविरोधी भुमिका घ्यावी लागली. भारताची लष्करी कारवाई व पनामा पेपर्स यामुळे पाकिस्तानात शरीफ सरकारची स्थिती कमजोर झाली असून त्या स्थितीचा फायदा इम्रानखान यांचा पक्ष उठवित आहे. त्यांनी नवाज सरकारविरुध्द सुरु केलेल्या आंदोलनाला जनतेत चांगला पाठिंबा मिळत आहे. इम्रानखान यांच्या पक्षाने २ नोव्हेंबर रोजी राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. याचाही दबाव शरीफ सरकारवर आहे. या सार्‍याचा परिणाम लष्करावर आणि लष्कराचा परिणाम पाक सरकारवर होत आहे. भारत- पाक संबधात पाकच्या अतर्ंगत समस्या हा एक महत्वाचा घटक राहात आलेला आहे. यावेळीही तो राहणार आहे. एका पाक अधिकार्‍याने म्हटल्याप्रमाणे, नोव्हेंबर महिना खरोखरीच महत्वाचा ठरणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, रविंद्र दाणी, संपादकीय, स्तंभलेखक (1266 of 1302 articles)


•तरंग : दीपक कलढोणे | निरभ्राकाश हे दीपावली पर्वाचे सुंदर वैशिष्ट्य होय. मन निरभ्र होत गेले पाहिजे. मनावर अभ्र घेऊन ...