कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » उलटेपालटे…

उलटेपालटे…

गेल्या चार-पाच दिवसांत सर्व काही उलटेपालटे झाले आहे. निशाचर वटवाघळे स्वत:ला झाडांना उलटे टांगून घेतात म्हणे. इथे तथाकथित विद्वानांना, राजकीय पंडितांना, स्वत:ला अर्थशास्त्राचे मूर्धन्य जाणकार म्हणवून घेणार्‍यांना जनतेनेच उलटे लटकवून टाकले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ५०० व १०००च्या नोटा रद्द केल्याचा निर्णय तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांना बसविण्याचा अमेरिकन जनतेचा निर्णय, हे दोन्ही निर्णय काही लोकांना पचविणे कठीण होत आहे. या दोन्ही निर्णयांनी खळबळ माजणे अपेक्षितच होते. परंतु, टीका करणारे इतक्या खालच्या पातळीवर जातील, असे वाटत नव्हते. डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत तर फारच धक्का बसला आहे. अजूनही या धक्क्यातून जग सावरले नाही. खरे तर, अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टीच्या समर्थकांना हा असला धक्का बसणे, समजू शकतो; पण जगातील इतर देशांतही भूकंपसदृश धक्का बसावा, याचे आश्‍चर्य आहे. याला कारण, जगात जी मंडळी स्वत:ला जगाचे तारणहार समजतात, स्वत:ला सर्व काही समजते असे मानतात, आमच्या सांगण्यावरूनच लोक आपले मत निश्‍चित करतात अशी शेखी मिरवितात, या असल्या भंपक विद्वानांनी, हिलरी क्लिटंनच निवडून येणार, असे छातीठोक सांगणे सुरू केले होते. जगानेही ते मानले. आता सर्वच विद्वान असे सांगत असल्यावर वेगळा विचार करण्याची सवड आहे कुणाला? त्यामुळे हिलरीच राष्ट्राध्यक्ष बनणार; फक्त वेळेचाच प्रश्‍न आहे, अशी मानसिकता सर्व जगाने केली होती. तसे घडले नाही, म्हणून हा भूकंपसदृश धक्का बसला. ट्रम्प निवडून आले म्हणजे, आता अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे, प्रतिष्ठेचे काही खरे नाही, असे भविष्य याच लोकांनी पसरविणे सुरू केले. कुणी, अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, शरमेने झाकून घेतल्याचे चित्र रंगविले, कुणी अमेरिकन जनतेच्या सदसद्विवेकबुद्धीवर शंका घेतली. भारतात हा प्रकार २०१४ च्या मे महिन्यात आपण सर्वांनी बघितला आहे. कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही चहा वाटपाची ज्याची लायकी नाही, अशी व्यक्ती, जी संघाची प्रचारक होती, पूर्ण बहुमताने प्रधानमंत्री होते, हे काही लोकांच्या समजण्याच्याही पलीकडचे आहे. महाराष्ट्रात ज्याच्याकडे आदराने बघितले जाते, असा रिबेरोसारखा माणूसदेखील मळमळ ओकायला मागेपुढे बघत नाही! केजरीवाल, राहुल, मायावती तसेच कम्युनिस्ट नेत्यांनी किती घाणेरड्या भाषेत मोदींवर टीका केली! मीडिया, सोशल मीडियाने तर कमरेचेच सोडले होते की काय, असे वाटत आहे. त्यामुळे अमेरिकन जनतेच्या आनंदाच्या आणि निराशेच्या, दोन्ही भावना भारतीय जनता समजून घेऊ शकते. ज्या दिवशी अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल होता, त्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे बहुतेक सर्व भारतीय कौतुक करीत असताना, काही राजकीय विरोधक, या मुद्यावरून नरेंद्र मोदींवर चिखलफेक करीत आहेत. अत्यंत असहिष्णू असलेले हे सर्व सेक्युलर राजकीय नेते लोक, नरेंद्र मोदींचे सरकार व्यापारी-शेठ लोकांचे, अंबानी-अडानी यांचे आहे, असा सारखा प्रचार करीत असतात. मग मोदींनी हा निर्णय कसा काय घेतला, असा साधा प्रश्‍नही यांच्या मनात येत नाही? नोटा रद्द झाल्यामुळे सर्वसामान्यांना किती त्रास सहन करावा लागत आहे, याची कल्पित वर्णने, वृत्तवाहिन्यांवरील भाकड चर्चेत सुरू झाली. खरे तर, या राजकीय पंडितांचे आश्रयदातेच उलट अडचणीत आले आहेत. परंतु, हे असले सत्य उघडपणे बोलता येत नसल्याने, मग सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांची ढाल पुढे करण्यात येत आहे. मोदींच्या या निर्णयामुळे दहशतवादाचे निर्मूलन करणे सोपे जाणार आहे, याबाबत कुणाच्याच बोलण्यातून कबुली येत नाही. इतकी वर्षे सत्ता भोगली असताना, तेव्हा का नाही गरिबांची आठवण आली? असा प्रश्‍न विचारला तर यांची बोबडी वळते. या विचारवंतांनी जी प्रतिमा तयार केली आहे, सर्वसाधारण लोकांना तीच माहिती आहे. अशा भ्रमात हे लोक होते. त्यामुळे पडलो तरी नाक वरच! या म्हणीनुसार यांचे वर्तन दिसून येत आहे. लहान लहान व्यापार्‍यांना विचारले तर ते कुठल्याही त्रासाची, गोंधळाची तक्रार करणार नाहीत. पण, स्टुडियोत बसून मात्र या लोकांना रस्त्यावर नेमके काय चालले आहे, याची फारशी माहिती न घेता, आपापले मतप्रदर्शन करणे सुरू केले आहे. विरोधकांना असे वाटते की, अजूनही जनता आपल्याच पाठीशी आहे. भाजपा आणि तत्संबंधित संस्थांना तर हे खिजगणतीतही मोजत नाहीत. कारण सर्व ज्ञान, बुद्धिमत्ता, कनवाळूपणा इत्यादी सद्गुण केवळ आणि केवळ आमच्याच लोकांमध्ये आहे, अशा प्रकारे यांचे आचरण असते. दुसर्‍याला अतिशय तुच्छ समजणे, ही यांची मूळ प्रवृत्ती असते. गोष्टी उदारतेच्या, व्यापकतेच्या करायच्या; परंतु आचरण मात्र शेणकिड्यांसारखे करायचे. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर आजतागायत, बौद्धिक क्षेत्राची नाडी या अशा लोकांच्याच हातात आहे. त्याची ही विषारी फळे आहेत. अमेरिकेचा भावी राष्ट्राध्यक्ष, नरेंद्र मोदींचा प्रशंसक आहे, हे वास्तव तर यांची झोप उडविणारेच आहे. नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयाने खरे तर दहशतवाद्यांचे सर्व मनसुबे ध्वस्त झाले आहेत. याची दिवाळी साजरी करायची, तर ही मंडळी शिमगा करीत आहेत. इतक्या प्रचंड संख्येत नोटा बदलायच्या तर थोडा फार विलंब होणारच, यंत्रणांवर ताण पडणारच; पण एकदा का हा धुराळा खाली बसला, तर मग लोकांनाच उमगून येईल की, मोदींच्या या निर्णयाने, एका दगडात कितीतरी पक्षी मारण्याची किमया साधली आहे. त्याचे पडसाद, उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत नक्कीच पडणार. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी तर तसे स्पष्टच सांगून टाकले आहे. दोन्ही ‘सर्जिकल स्ट्राईक्स’चा प्रभाव निवडणुकीच्या प्रचारावर असेल, असे ते म्हणाले. विदेशातील काळा पैसा आणू शकले नाहीत, म्हणून विरोधक नरेंद्र मोदींना किती टोचून टोचून बोलले! बालबुद्धी राहुल तर पिसे लागल्यासारखाच बोलत होता. पण, आता कुणाची हिंमत झाली नसेल, असा निर्णय घेऊन काळ्या पैशांविरुद्ध मोदींनी हा निर्णय घेतला, तर त्याचे कौतुक तरी करायला हवे ना! नाही कौतुक, किमान मौन तरी राहायचे! गेली दोन-तीन वर्षे मोदींना ज्या विरोधकांचा सामना करावा लागला, तसाच सामना डोनाल्ड ट्रम्प यांनाही करावा लागणार आहे, असे दिसते. याबाबतीत तरी मोदी आणि ट्रम्प यांच्यात समानता दिसते. बाकी एक मात्र निश्‍चित की, मोदी आणि ट्रम्प यांनी, निरस आणि आगाऊ समजून येणार्‍या (प्रेडिक्टेबल) जागतिक राजकारणात, खळबळजनक रंगत आणली आहे. त्यामुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातीलही राजकारणात कधी नव्हे इतके औत्सुक्याचे आणि आगाऊ न समजणारे (अनप्रेडिक्टेबल) झाले आहे. त्याबद्दल भारतीय आणि अमेरिकन जनतेचे कौतुकच केले पाहिजे.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (483 of 525 articles)


सुनील कुहीकर | सुमारे पंधरा वर्षांपूर्वीचा तो प्रसंग असेल. नुकताच अभियंता झालेल्या एका उमद्या तरुणाचा पुण्यातल्या एका कार्यक्रमात सत्कार झाला ...