आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

नवी दिल्ली, १९ जानेवारी – गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन…

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

►ए. राजा यांच्या पुस्तकातील आरोप, नवी दिल्ली, १९ जानेवारी…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

नवी दिल्ली, १९ जानेवारी – सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्यांचे…

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

दिल्ली, १९ जानेवारी – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील…

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

न्यू यॉर्क, १९ जानेवारी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

►पारा उणे ६७ अंश सेल्सियसपर्यंत, मॉस्को, १८ जानेवारी –…

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

•► ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे वणीत थाटात उद्घाटन,…

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

ग्रामीण प्रतिनिधी, पंढरपूर, १८ जानेवारी – समाजाच्या परिवर्तनासाठी सर्वांचा…

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

►राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, १७ जानेवारी – राज्यातील अनाथ…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर » एक शाळा फूटपाथवरची…!

एक शाळा फूटपाथवरची…!

सुनील कुहीकर |

मागण्यासाठी म्हणून कायम कुणातरी समोर पसरवले जाणारे हात आता प्रार्थनेसाठी जोडले जाताहेत. मदतीसाठी आलेल्या लोकांकडील सामान लूट माजवल्यागत ओढून-ओरबाडून नेणारे लोक आता शांतपणे रांगेत उभे राहून त्या मदतीचा स्वीकार करताहेत. अंगावरच्या घाणेरड्या कपड्यांची जागा आता, नवे नसले तरी स्वच्छ कपडे घेताहेत. सकाळचे स्नान हा त्यांच्या दिवसभरातील कामांतला एक महत्त्वाचा आणि आवश्यक भाग ठरू लागला आहे. सकाळी उठलं की आहे त्या अवतारात भीक मागण्यासाठी चौकातल्या सिग्नल्सकडे वळणारी पावलं आता शाळांच्या दिशेनं वळताहेत. गेली काही वर्षे झालेल्या सततच्या प्रयत्नांचे ते फलित आहे. इंग्रजीतले अल्फाबीट्‌स, मराठीतली बाराखडी, आकड्यांच्या पाढ्यांचे औपचारिक शिक्षण तर खूप दूर… इथे तर कपडे नीट घालण्यापासून तर  ‘मागण्याची’ सवय सोडविण्यापर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाचेच धडे गिरवायचेत अजून. धंदा तर ठरलेला, भीक मागण्याचा. त्यासाठी लोकांपुढे पसरायला हातांची संख्या वाढेल तितके चांगले. त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या सार्‍या सरकारी योजना धुडकावून जन्माला आलेली पोरं ती. सरकारने तयार केलेला शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा आपल्यालाही लागू होतो, हे तर त्यांच्या गावीही नसते. सरकारी यंत्रणेने राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेतही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कधी कुणी. राहिला प्रश्‍न स्वच्छतेचा, तर त्याच्याशीही इथे कुणाला सोयरसुतक नसते. उलट अवतार जितका ओंगळवाणा, भीक मागणे तेवढेच सोपे… पण अवैधरीत्या वसलेल्या झोपड्यांमधली पोरं आता, हा सारा इतिहास मागे टाकून शाळेत धाडली जाऊ लागली आहेत. औपचारिक शिक्षणासाठी ज्यांना शाळेत पाठवले जाऊ शकत नाही, अशा मुलांसाठी त्यांच्या वस्तीच्या शेजारीच कुठल्याशा मोकळ्या जागेवर एक शाळा चालवली जाते. तास-दोन तासांची, उघड्यावरची ती शाळा. त्यांनी नावंच दिलंय् त्याला-‘फूटपाथ शाळा.’
नागपूरपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मौद्याच्या एनटीपीसीत कार्यरत असलेले एक आयआयटीयन वरुण श्रीवास्तव यांच्या कल्पनेतून साकारलेली एक संस्था म्हणजे ‘उपाय.’ उपायच्या माध्यमातून साकारलेले दोन उपक्रम….एक फूटपाथ शाळेचा. दुसरा ‘रीच ऍण्ड टीच’चा.
झाशीजवळच्या एका छोट्याशा खेड्यात राहून आयआयटीपर्यंतचा खडतर प्रवास केल्यानंतर आपसुकच शिक्षणाच्या मार्गातले खाचखळगे जाणवले होते. असले अडथळे जाणवणार्‍या आपल्या नंतरच्या पिढीतल्या सहकार्‍यांना जमेल तेवढे साह्यभूत ठरण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे ‘उपाय.’ सुरुवातीला मौद्याजवळच्या कुंभारी नावाच्या एका छोट्या गावात एका उपक्रमाची सुरुवात झाली. आजूबाजूच्या गावातील निदान पाचशे शाळकरी पोरांना त्यांच्या शालेय शिक्षणात साह्यभूत ठरेल असा शिकवणीवर्ग सुरू झाला. गावाकडची गरीब घरातली, शेतकरी-शेतमजुरांची, कंत्राटी मजुरांची पोरं या वर्गात यायची. वरुण श्रीवास्तव आणि त्यांचे सहकारी अभियंते वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून या मुलांना शिकवायचे. सुरुवातीला फारसा बदल जाणवला नाही, पण हळूहळू या वर्गातली मुलंही नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळवून यशाची पताका झळकवू लागले तेव्हा या वर्गांचं महत्त्व प्रकर्षानं जाणवलं अन् त्याची व्याप्तीही वाढत गेली.
त्या काळात रविवारी नागपुरात राहाणं असायचं. एखाद्या चौकातल्या सिग्नलजवळ गाडी उभी राहिली की लागलीच, हात पुढे करून उभे राहिलेले केविलवाणे चेहरे नजरेस पडायचे. समाजातल्या या घटकासाठीही काहीतरी केलं पाहिजे. निदान शिक्षणाच्या दालनापर्यंत तरी त्यांना नेऊन सोडलं पाहिजे, असा विचार मनात आला. मग रविवारचा दिवस नागपुरातल्या बर्डी, यशवंत स्टेडियम अशा परिसरात जाऊ लागला. तिथल्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या पालकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. त्यांच्यासमोर कल्पना मांडली तर ती कुणालाच मानवेना. सुरुवातीला तर लोक जवळच येईनात. चार पैसे घरात येतात, तो भिकेचा ‘धंदा’ बंद करून बिनपैशाच्या शाळेत कोण आपल्या पोरांना पाठवेल? पण प्रयत्न मात्र थांबले नव्हते. खडगपूरच्या आयआयटीतून शिक्षण पूर्ण झालेला हा उच्चपदस्थ अधिकारी दर रविवारी या झोपड्यांच्या दाराशी उभा राहायचा. त्यांची नकारघंटा सहन करायचा. त्यांची समजूत काढायचा. सोडवता न येणारी त्यांची गार्‍हाणी गुमान ऐकून घ्यायचा. पोरांचं भवितव्य घडविण्यासाठी त्यांना शाळेत पाठवणं किती आवश्यक आहे ते सांगण्यासाठी धडपड चाललेली असायची त्याची. जवळपास एक ते दीड वर्षांचा काळ पालकांच्या मनधरणीत गेल्यावर, त्यांच्या मनात जरासा विश्‍वास निर्माण झाल्यानंतर काही लोक तयार झाले. सुरुवातीला तर बोटावर मोजण्याइतक्याच पोरांची ‘शाळा’ सुरू झाली. रस्त्याच्या कडेला. भिकार्‍यांची पोरं, त्यांच्या घाणेरड्या अवतारात एका रांगेत बसलेली अन् हे ‘मास्तर’ त्यांना शिकवीत असलेले… रस्त्याने ये-जा करणारे लोक कुतूहलाने बघायचे. चुकून कुणीतरी आस्थेनं चौकशी करून जायचा. असले चौकशी करणारे लोकच पुढे या कार्यात जुळत गेले. थोडे थोडके नव्हे, सुमारे दोनशे कार्यकर्त्यांची टीम गेल्या चार वर्षांच्या काळात वरुण यांच्या साथीने या उपक्रमात सहभागी झाली आहे. सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांपासून तर कॉलेजात शिकवणार्‍या तरुण प्राध्यापकांपर्यंत. या वस्त्यांच्या आसपासच्या भागात राहणार्‍यांपासून तर सेमिनरी हिल्स सारख्या पॉश एरियात राहणार्‍या लोकांचा सहभाग या कार्यात लाभला आहे. आजघडीला नागपुरात आठ वस्त्यांत अशी फूटपाथवरची शाळा चालते.
उपक्रमात सहभागी सारेच कार्यकर्ते उदरनिर्वाहासाठी कुठे ना कुठे काम करणारे. त्यामुळे त्यांची कार्यालये सुरू होण्यापूर्वी किंवा संपल्यानंतरची वेळ या मुलांच्या शाळेची. भीक मागण्यासाठी सिग्नलवरच्या गाडीच्या खिडकीपाशी समोर केले जाणारे हात फूटपाथवरच्या या शाळेत ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ म्हणताना जोडले जातात, एवढे परिवर्तन गेल्या चार वर्षांत या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून घडले आहे. नागपूर रेल्वे स्थानकाजवळच्या एका वस्तीतील जवळपास पंचेवीस मुलं एव्हाना नियमितपणे शाळेत जाऊ लागली आहेत. पुष्कळदा तर त्यांना शाळेत पाठविण्याची तयारी, अगदी त्यांची आंघोळ घालून देण्यापासूनची तयारी हे कार्यकर्तेच करतात. महिनेवारीने लावलेला ऑटोवाला या पोरांना शाळेत घेऊन जातो. शाळा सुटली की त्यांना परत आणून सोडतो… दोनशे कार्यकर्त्यांच्या सहभागातून उभ्या झालेल्या टीमच्या माध्यमातून केवळ नागपुरातच नाही, तर आता पुणे, गुडगाव, वाराणशी, नाशकातही फूटपाथ शाळेचा प्रयोग यशस्वीरीत्या साकारलाय्. एकूण वीस केंद्रांवरच्या मुलांची बाराशेची संख्या बघितली की ‘राईट टु एज्युकेशन’ची दयनीय अवस्था ध्यानात येते. आणि हो! लवकरच मुंबईत अशी शाळा सुरू होऊ घातली आहे. शाळा कसली, जगण्याचे प्राथमिक धडे देणारे केंद्र ते. सकाळी उठल्यावर दात घासायचे इथपासून तर अंगावरचे कपडे स्वच्छ असावेत यासाठीचा आग्रह हाच या शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग. पण या मुलांना औपचारिक शिक्षणासाठी शाळेच्या दाराशी नेऊन सोडण्याचा अट्टहास मात्र आहे. फूटपाथवरची शाळा हा त्याचा प्राथमिक टप्पा आहे. तर ‘रीच ऍण्ड टीच’ चा उपक्रम मात्र शाळेत पोहोचलेल्या पण तरीही साधन, सुविधांच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या वंचितांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात साह्यभूत ठरण्याचा एक प्रयत्न आहे. त्याचेही प्रयोग नागपूर आणि वाराणशीत चालले आहेत. जी मुलं वयाच्या दृष्टीने शाळेत जाण्यास अपात्र आहेत, त्यांना केश कर्तनापासून तर मोबाईल फोन सुधरवण्याचे प्रशिक्षण देऊन स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्नही चाललाय्. उद्देश एकच भीक मागणारे हात मेहनतीत गुंतले पाहिजेत… हा प्रयोग साकारणारी टीमही हीच. ‘उपाय’ची…

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर (863 of 892 articles)


सैनिकांच्या रक्ताची सरकार दलाली करत असल्याचा घाणेरडा आरोप करणारे आता माजी सैनिकाच्या आत्महत्येचे तितकेच घाणेरडे राजकारण करत आहेत. सरकारच्या विरोधात ...