ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:

ए टीम ठरवलेलीच आहे

भाऊ तोरसेकर |

चारपाच महिन्यांपूर्वी कर्नाटकातल्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि सगळेच प्रमुख पक्ष आवेशात प्रचाराला लागलेले होते. त्यात मग एकमेकांवर आरोप आणि चिखलफेक, ही नित्याची बाब झालेली होती आणि आताही आहे. पण एक आरोप गेल्या चारपाच वर्षांत सातत्याने सगळे बिगरभाजपा पक्ष सातत्याने करीत असतात, त्याची गंमत वाटते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तो आरोप झाला होता आणि अलिकडल्या काळात तोच आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावरही झालेला आहे. गेल्या बुधवारी तोच आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी काँग्रेसवर केला आणि गंमत वाटली. त्यांनी मध्यप्रदेश व राजस्थानात आपल्या पक्षातर्फे सर्व जागा लढवण्याची घोषणा करतानाच, महागठबंधन व काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपवतानाच काँग्रेसलाच भाजपाचा एजंट म्हणण्यापर्यंत मजल मारली. तिथले माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे तोंडाळ नेते दिग्विजयसिंग, यांना भाजपाचे एजंट म्हटले. नेमका हाच आरोप कर्नाटकात पाच महिन्यांपूर्वी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या देवेगौडांच्या पक्षावर करीत होते. आज काँग्रेसशी युती करून सत्तेत बसलेले कुमारास्वामी व त्यांचा जनता दल सेक्युलर, हा पक्ष भाजपाची ‘बी टीम’ असल्याचा तो आरोप होता. मात्र मजेची गोष्ट अशी, की मतदान संपून निकाल लागल्यावर काँग्रेसने सर्वप्रथम याच भाजपा बी टीमशी सत्तेसाठी हातमिळवणी करून टाकली होती. थोडक्यात भाजपाची बी टीम हा आता एक राजकीय विनोद होऊन गेला आहे. ज्याला कोणाला शिव्या घालायच्या असतील, त्याच्यावर भाजपाची बी टीम असा शिक्का मारायचा, ही पुरोगामी फॅशन बनलेली आहे. पण त्यातून एक निष्कर्ष नक्की काढता येतो. सगळा मोदी विरोधातला शोध हा भाजपाच्या बी टीमसाठी चालू असून, ए टीम कुठली ती प्रत्येकाने मान्य केलेली आहे. तिचे नाव मुद्दाम सांगण्याची गरज आहे काय?
कुठल्याही खेळात उत्तम खेळाडूंचा संघ असतो, त्याला ए टीम असे नाव गृहीत असते. साहजिकच जे कोणी तितकेच चांगले पण उत्तम खेळू शकत नसतील, त्यांचीही एक टीम तयार ठेवली जात असते. विचित्र प्रसंग आला मग ही बी टीम बाहेर काढली जाते. कुठल्याही जटील, गुंतागुंतीच्या कामात व योजनेत ए प्लान असतो, तसाच बी-सी असे आणखी प्लान तयार असतात. त्याचा अर्थ मुख्य योजना असफल झाली तर इतर पर्याय बघायचे असतात. विचारात घ्यायचे असतात. पण पहिलाच प्लान वा योजना चांगली असेल, तर इतर योजनांना कोणी किंमत देत नाही, विचारातही घेत नाही. बी टीम हा तसाच प्रकार आहे. हा संदर्भ लक्षात घेतला, तर भाजपाची बी टीम म्हणजे काय ते लक्षात येऊ शकेल. कुठल्याही क्षणी भाजपाला अडचण आली, तर त्याच्या मदतीला धावून जाईल अशा पक्षाला वा नेत्याला बी टीम संबोधले जायला हवे. पण प्रत्यक्षात बघितले तर या सगळ्या भाजपाच्या बी टीम, नेहमी भाजपा विरोधकांनाच मदतीला धावून जात असतात. ते शरद पवार, मायावती वा देवेगौडा असोत वा ममता असोत. याच मायावतींनी उत्तराखंडात कोसळणारे काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी आपले दोन आमदार कोणाच्या मदतीला पाठवले होते? एफडीआय विरोधात मोठे भाषण संसदेत दिल्यानंतरही प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मायावती कोणाच्या बाजूने गेल्या होत्या? हा सगळा इतिहास उकरून काढला तर भाजपाच्या बी टीम या प्रत्यक्ष व्यवहारात काँग्रेसच्याच बी टीम म्हणून कायम राबत राहिल्या आहेत. त्यात बंगालच्या मार्क्सवादी पक्षाची गणना होते, तशीच महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी पक्षाचीही गणती होते. मात्र त्यांचे एकमेकांशी सौदे साधले गेले नाहीत, तर मग परस्परांवर चिखलफेक करताना त्यापैकी कोणावर तरी भाजपाची बी टीम असा शिक्का मारला जात असतो. पण अशा कुठल्याही बी टीमची भाजपाला निदान मागील चारपाच वर्षांत गरजही भासलेली नाही ना?
त्यातला विनोद बाजूला ठेवला तर एक गोष्ट लक्षात येते, की ही विरोधकांची पराभूत मानसिकता आहे. त्यांच्यात परस्परांवर विश्‍वास नाही आणि स्वत:च्या बळाविषयी आत्मविश्‍वासही नाही. एकमेकांच्या आधाराशिवाय चालणे, उभे राहणेही अशक्य असल्याचा आत्मविश्‍वास जबरदस्त आहे. मात्र एकमेकांना आधार देताना आपले ओझे कुणा दुसर्‍याने निमूटपणे उचलावे आणि आपण पालखीत बसून सैर करावी; अशी प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा आहे. तिथेच सगळी गडबड होऊन जाते. तसे झाले, तर मग बाकी गोष्टी सोडून देत एकमेकांना भाजपाची बी टीम ठरवण्याची स्पर्धा सुरू होत असते. पण यातला कोणीही भाजपाची ए टीम कोण त्याचा खुलासा कशाला करत नाही? की त्यांना ती टीम ठाऊक आहे आणि त्या भाजपाच्या ए टीमचे नावही घेण्याची भीती वाटत असते? की त्या ए टीमला कुठल्याही बी टीमची गरजही नसल्याची भीती अशा लोकांना सतावत असते? मायावती वा काँग्रेसला आपल्या शक्तीचा इतकाच आत्मविश्‍वास असेल, तर त्यांनी मुळात जागावाटप किंवा तडजोडीची भाषा करवीच कशाला? आपल्याच बळावर भाजपाला एकहाती पराभूत करायचा मनसुबा कशाला नसावा? कारण स्पष्ट आणि उघड आहे. आपला नाकर्तेपणा प्रत्येकाला साफ माहिती आहे. मात्र ते मान्य करून तडजोड करायची नाही, की एकहाती लढायची क्षमता आत्मसात करायचे कष्ट घ्यायचे नाहीत. साध्या शब्दात भीक हवी आहे, पण हक्काचे दावेही जोरात आहेत. एक दुसर्‍याला आपल्याशिवाय तुझे चालणार नसल्याचे पटवून देण्यासाठीचे खेळ चालवित आहेत. मात्र त्यात त्यांचेच नाकर्तेपण जनतेसमोर उघडे पडत चालले आहेत. अशा भाजपाची बी टीम आरोपातून ते जनतेला समजावून देत आहेत, की आम्ही सगळे विरोधकच राजकारणातली बी टीम आहोत आणि उत्तम टीम हवी असेल, तर मतदाराने भाजपाची ए टीम म्हणजे मोदींकडे जावे.
आघाडीत आपल्याला मित्रपक्ष काय देणार, यापेक्षा आपण मित्राला काय अधिक देऊ शकतो, याला प्राधान्य असते. मोदींची घोडदौड रोखण्यासाठी बिहारमध्ये नितीश हट्टाला पेटले. त्यांनी ११२ आमदार असतानाही शंभर जागांवर समाधान मानले होते आणि २८ आमदार असलेल्या लालूंना शंभर जागा दिल्या होत्या. काँग्रेसचे अवघे ४ आमदार असतानाही त्यांना ४० जागा देऊ केल्या होत्या. त्याला खरी आघाडी म्हणतात, जिथे ए टीम किंवा बी टीम असले आरोप करावे लागत नाहीत. आताही तिथे बिहारमध्ये लोकसभेच्या २२ जागा भाजपाकडे आहेत. पण नितीशना सोबत घेण्यासाठी भाजपा २० जागांपर्यंत खाली यायला राजी झालेला आहे. लढायला अधिक जागा मागण्यापेक्षा जिंकायच्या जागा अधिक जुळवण्याला आघाडी वा गठबंधन असे नाव आहे. पण ते काँग्रेसच्या स्वभावातच नाही. म्हणून त्यांनी बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षाशी आघाडी करून त्याला बुडवले आणि उत्तरप्रदेशात शंभर जागा घेऊन समाजवादी पक्षाचा बोर्‍या वाजवून दिला. मायावतींना त्यासाठीच काँग्रेसच्या सोबत जाण्याची भीती सतावते आहे. लाभ होण्यापेक्षा आपला तोटा झाला तर? काँग्रेस सोबत युती-आघाडी करून कुठल्याही पक्षाचा स्थानिक वा सार्वत्रिक निवडणुकीत फायदा झाल्याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र अशा आघाड्यांतून बी टीम झालेल्यांचा अवतार संपुष्टात आल्याचे दाखले पैशाला पासरी आहेत. मायावती त्यालाच घाबरलेल्या असाव्या. म्हणून त्यांनी छत्तीसगडमध्ये अजित जोगींच्या नवख्या पक्षाची बी टीम होणे पसंत केले, कर्नाटकात देवेगौडांची बी टीम होण्याला मान्यता दिली. पण काँग्रेस पक्षाची बी टीम व्हायला मायावती तयार नाहीत. त्याच कशाला? दिवस जवळ येत जातील, तसे इतरही लहानमोठे पक्ष असेच काँग्रेसला हुलकावणी देऊन अन्य पर्याय स्वीकारत जातील. कारण भाजपाची बी टीम म्हणून बदनाम होण्यापेक्षा काँग्रेसी बी टीम होण्यातला धोका अधिक आहे.

https://tarunbharat.org/?p=65163
Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (362 of 1332 articles)


वाढत्या किमतीमुळे महागाई अधिक वाढू नये म्हणून, केंद्र सरकारने पेट्रोल व डीझेलच्या किमतीत प्रतिलिटर अडीच रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला. ...

×