ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » कदमांची मुक्ताफळे!

कदमांची मुक्ताफळे!

राजकारणात निवडणूक महत्त्वाची. निवडणुकीत लढणं, लढण्यापेक्षाही जिंकणं महत्त्वाचं. जिंकण्यासाठी पैसा महत्त्वाचा. पैशासोबतच लोकप्रियताही तेवढीच आवश्यक. लोकप्रियता कशी मिळवायची? काही लोक ती कर्तबगारीने, स्वकष्टातून कमावतात, तर बेगडी लोकप्रियतेच्या हव्यासापोटी स्वस्त, तकलादू मार्गांचा अवलंब करतात काही लोक. परवा मुंबईत भाजपाच्या एका आमदाराने नेमक्या याच तर्‍हेचा अवलंब केला. खरंतर राम कदम हे राजकारणात विविध राजकीय विचारांना, काही पक्षांना गवसणी घालून, गेले काही दिवस भाजपात स्थिरावलेले एक नेते. जिथून निवडणूक लढायची अन् जिंकायची आहे, त्या स्वत:च्या मतदारसंघातल्या लोकांना, विशेषत: मतदारांना खूष करण्याच्या नादात त्यांना सध्या आपण ज्या पक्षात वावरतोय्, त्याची संस्कृती, विचार याचाही विसर पडला. आपल्या बेताल बरळण्याचा परिणाम काय होईल, याची चिंता त्यांनी वाहण्याचे प्रयोजनच उरत नाही. त्यांनी बिनधास्तपणे मुक्ताफळे उधळली, मन मानेल तसे बरळले. पण, त्याचे खापर मात्र आता पक्षाच्या माथ्यावर फोडले जात आहे. दहीहांडी फोडायला जमलेल्या गोविंदांची करामत बघायला ओसंडून वाहिलेला तरुणाईचा गजर बघितला अन् कदमांच्या अंगात राजकारण संचारले. बरं, दहीहांडी फोडण्याच्या कार्यक्रमातही नेत्यांची भाषणं हवीतच. त्या शिवाय ‘ते’ आले असल्याची वर्दी कशी मिळणार? या कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांचाही आर्थिक हातभार लाभला असल्याची बाब लोकांना कशी कळणार? आर्थिक मदतीच्या त्याच उपकाराचे पांग फेडण्यासाठी आयोजकांनी कदमांच्या हातात माईक सोपवला. समोर उपस्थित असलेल्या तरुणांचा दांडगा उत्साह बघून स्वारी पुरती बिथरली. मग तरुणांना आवडेल असे बरळणे सुरू झाले. आपण पब्लिकच्या पाठीशी कसे ठामपणे उभे आहोत, त्यांच्या मदतीला कायम कसे तत्पर असतो, हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगण्याच्या अट्टहासापायी जमलेल्या शेकडो लोकांना स्वत:चा फोन नंबर जाहीर रीत्या सांगण्याचा मोह कदमांना आवरला नाही. पुढे पुढे तर साहेबांची गाडीच रुळावरून घसरली. म्हणाले, ‘‘केव्हाही गरज पडली तर मला फोन करा. मी आहेच आपल्या मदतीला हजर. काम कुठलेही असो. प्रसंग कुठलाही असो. चिंता करायची नाही. एक फोन लावायचा बस्स! अगदी, एखादी पोरगी तुमच्या प्रेमाला नकार देत असेल तरीही…’’
झालं! भाजपाला सत्तेत बघितल्याने पोटशूळ उठलेल्या माध्यमांना आयते कोलीतच मिळाले हातात. खरंतर राम कदम त्याच्या पुढेही एक वाक्य बोलले होते-‘‘एखादी मुलगी तुम्हाला नाही म्हणत असेल, तर आईवडिलांना माझ्याकडे घेऊन या. त्यांचेही म्हणणे असेल, तर आम्ही मदत करू. पोरीला पळवून आणून तुमच्या स्वाधीन करू.’’ एवढ्या गर्दीत जाहीर केलेल्या नंबरवर आलेले किती कॉल्स साहेब स्वत: अटेंड करू शकतील, खरंच उद्या राहिलीच शंभर पोरांची गर्दी दारात उभी, तर त्यांना आवडलेल्या मुली पळवून आणून यांचे लग्न त्यांच्याशी लावून देण्याची कल्पना तरी परवडणारी असणार आहे का कदमांना वास्तवात? पण, वस्तुस्थितीला विचारतो कोण इथे? स्वत:चा फोन नंबर जाहीर केल्याने अन् पोरी पळवून आणण्याकरिता मदत करण्याचे जाहीर आश्‍वासन दिल्याने जर समोरची तरुणाई जल्लोश करीत असेल, टाळ्यांचा कडकडाट करीत असेल, तर राम कदमांचे काय जाते फुकटचे आश्‍वासन द्यायला? आपण काय बोलतो, कसल्या थराची आश्‍वासनं देतोय्, याचा विचार त्यांनी करण्याचा प्रश्‍नच नव्हता. पुढच्या वर्षभरात निवडणुकी व्हायच्या आहेत. त्याच्या आधीच स्वत:ला फोकस करून घेण्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय आयताच श्रोता म्हणून लाभल्यावर त्यांनी त्यांची राजकीय गणितं मांडत या संधीचे सोने करून घेण्याची धडपड केली. दुर्दैवाने यात पडझड झाली. तोल सुटला. बोलणे वाहवत गेले… पण, नैतिकतेच्या निकषांवर तावूनसुलाखून निघालेल्या, साधनशुचितेच्या संदर्भात धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असलेल्या माध्यमजगताला राम कदमांचे हे बोलणे किंचितसेही मानवले नाही! आवडले तर मुळीच नाही. खरंच कदमांनी कुणाच्या तरी पोरी पळवण्यात मदत करून कुणाची तरी लग्न लावून दिली, तर समाज किती रसातळाला जाईल, याची चिंता माध्यमांएवढी इतर कुणाला असेल? राम कदमांची बडबड वायफळ, अनाठायी होती हे खरेच; पण तद्दन फालतू, गैरवाजवी, समाजाच्या दृष्टीने अहिताची असल्याची शंभर टक्के खात्री कदमांच्या ज्या विधानाबाबत माध्यमांची होती, नेमकी तीच वायफळ बडबड प्रसारमाध्यमांनी काल लाखो लोकांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवली. दिवसभर त्यावर चर्चा घडवून आणली. कदमांनी काही हजार लोकांसमोर केलेली पोपटपंची काही कोटी लोकांपर्यंत पोहोचवून माध्यमांनी नेमके काय साधले, हे त्यांचे तेच जाणोत. पण, प्रत्यक्षात तसे घडले खरे! हे आमदार महोदय सध्या भाजपाच्या खेम्यात आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे नाते थेट त्या पक्षाशी जोडून भाजपावर तोंडसुख घेण्याची संधी कुणी दवडण्याची शक्यता नव्हतीच. उद्धव ठाकरेंनी तर नाहीच नाही! आता खुद्द आमदारांनीच ती संधी आपणहून लोकांच्या स्वाधीन केलीय् म्हटल्यावर, इतरांनी तोंडाची वाफ दवडणे स्वाभाविकच होते. सर्वांनी ती आपापल्या परीने साधली. साधनशुचितेची प्रमाणपत्रं स्वत:च स्वत:ला बहाल करून घेत प्रत्येकाने कदमांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. लोकप्रिय ठरतील अशा काही घोषणा करणे, पूर्ण करता येणार नाहीत याची खात्री असतानाही काही आश्‍वासनं छातीठोकपणे देणे ही निवडणुकीच्या राजकारणाची अपरिहार्यता असेलही कदाचित; पण म्हणून पातळी सोडून नेमकं किती रसातळाला जायचं, हे निदान समाजधुरिणांना तरी उमजायला हवं ना! परवा आमदार नेमके तिथेच चुकले अन् सारा समाज त्यांचा तमाशा करायला सरसावला. आधुनिकतेच्या नावाखाली बदलत्या जीवनशैलीपासून रीतिरिवाजापर्यंत अन् राहणीमानापासून तंत्रज्ञानापर्यंतच्या ज्या ज्या बाबी आम्ही स्वीकारल्या, त्याचे परिणामही समाज भोगतो आहे. मुंबईच्या समुद्रकिनार्‍यापासून तर गावाकडच्या बगिचांपर्यंत सर्वदूर वाहवलेल्या तरुणाईने जी प्रणयाची उद्याने साकारली आहेत, तो त्याचाच परिणाम आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हाताच्या बोटांवर सहज उपलब्ध झालेल्या बाबींनी घातलेल्या धिंगाण्याचे तर आपण सारेच साक्षीदार ठरतो आहोत. अशात दोर्‍या बिनधास्तपणे ढिल्या सोडायच्या की गच्च आवळून धरायच्या, याचे भान जपले तरच समाजस्वास्थ्य टिकून राहील. राम कदमांना परवा नेमके त्याचेच भान राहिले नाही अन् सगळाच कचरा झाला…

https://tarunbharat.org/?p=61322
Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (191 of 779 articles)


जहागीरदार | काँग्रेसमध्ये काही नेते आपल्या कृतीने पक्षाला वारंवार अडचणीत आणत असतात. अशा नेत्यांची यादी खूप मोठी आहे. पण, या ...

×