ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » कसोटीचा कस…

कसोटीचा कस…

क्रिकेटच्या खेळात भारतीय संघ पराभूत झाल्याने सामान्यांच्या जीवनावर फारसा काही फरक पडत नाही. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या समस्या कमी होत नाहीत. महागाई कमी होत नाही. सरकारी कार्यालयांत फटाफट कामे होतात असेही नाही. भारतीय संघ क्रिकेटमध्ये जिंकतच राहिला तर आरक्षण, जातीयवाद यांसारखे प्रश्‍न चुटकीसरशी सुटत नाहीत. तरीही क्रिकेट हा आमच्यासाठी ‘जीव की प्राण’ असा खेळ आहे. सकल भारतीयांचा तो सामूहिक धर्मच आहे. एखाद्या खेळाडूवर सारेच भारतीय धर्म, जात, पंथ असे कुठलेही भेद बाजूला सारून प्रेम करत असतात. त्यात कुठेही, काहीही अन् कुठलाही दुरावा आड येत नाही. भारताने दोन वेळा एकदिवसीय क्रिकेटचा विश्‍वचषक जिंकला आहे. एकदा टी ट्वेंटीचाही विश्‍वचषक जिंकला आहे आणि देशात होणार्‍या क्रिकेटच्या मालिकाही अनेकदा जिंकल्या आहेत. त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणाले होते, ‘सर्व सिद्धीचे कारण, मन करारे प्रसन्न…’ क्रिकेटविजयाने आमची मने प्रसन्न होतात, असे मानले जाते, मग सर्व सिद्धीला ती प्रसन्नता कारण ठरत का नाही, याचा विचार आम्ही करायला हवा. एकतर हा खेळ गुलामगिरीचे प्रतीक आहे… अर्थात, हे सारेच चिंतन भारतीय संघ परदेशात जाऊन मार खाऊ लागला की प्रकट होत असते. आताही इंग्लंडच्या दौर्‍यावर असलेला भारतीय संघ एकदिवसीय मालिका गमावल्यावर कसोटीत कस दाखवेल, असे वाटले होते. अ‍ॅजबेस्टनची कसोटी गमावल्यावर आता लॉर्डस्वर आपण नक्की जिंकू, असे वाटत होते. अ‍ॅजबेस्टन कसोटी गमावली, तरीही कर्णधार कोहलीने पहिल्या डावात १४९ धावा केल्या होत्या अन् दुसर्‍या डावातही त्याने अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे कसोटी रँकिंगमध्ये तो अव्वल ठरला होता. तेवढाच काय तो आनंद! मात्र, हा आनंद गरीब भावाने आपला भाऊ श्रीमंत आहे, याचा आनंद मनवण्यासारखा आहे. वातावरणाच्या सरावाचाही प्रश्‍न नव्हता. कारण त्या आधी आम्ही तिथे एकदिवसीय मालिका खेळून गमावली होती. त्याही आधी टी ट्वेंटी खेळलो अन् आधी सराव सामनेही झाले होते. असे असतानाही पहिली कसोटी आम्ही गमावली त्याला वातावरणाचा सराव, हे कारण नक्कीच देता येत नाही. लॉर्डस्च्या कसोटीत भारतीय क्रिकेट चाहत्यांची ही खंत भरून निघेल, असे वाटत होते. किमान पहिल्या कसोटीत आपली फलंदाजी ढेपाळली, तरीही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. साहेबांच्या फलंदाजांना वेसण घातले होते. त्यामुळे लॉर्डस्वर गोलंदाजांनी तीच तिखट धार कायम ठेवली अन् फलंदाजांना लय सापडली तर आपण सहज विजयी होऊ, असा उगाच आत्मविश्‍वास चाहत्यांना वाटत होता. दुसर्‍या कसोटीत मात्र फलंदाजी आणखीच ढेपाळली. अ‍ॅण्डरसन, ब्रॉड, वोक्स यांच्या मार्‍यापुढे आमच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. अगदी जगात अव्वल असलेला कोहलीदेखील दोन्ही डावांत अपयशी ठरला. मुरली विजय, लोकेश राहुल अन् चेतेश्‍वर पुजाराही काहीच करू शकले नाहीत. उपकर्णधार अजिंक्य राहणेबाबत तर आता चिंतेचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांत तो नीट खेळलेला नाही. २०१६ पर्यंत त्याच्या उत्तम खेळाची पुण्याई त्याला आणखी किती साथ देईल, हा प्रश्‍न आहे. २०१८ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर त्याने ४८ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला साधे अर्धशतकदेखील करता आलेले नाही. कसोटीचा उपकर्णधार म्हणून त्याला आणखी कितीवेळ असेच खेळविणार, हा सवाल आहे. कारण आता युवा प्रतिभा रांगेत आहे. मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, करण नायरसारखे १९ वर्षांखालील संघातले खेळाडू चांगला खेळ करत आहेत. करण नायरने २०१६ ला इंग्लंडचा संघ भारतात खेळायला आला असताना ३०३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मात्र त्याची लय बिघडली आणि त्याला भारतीय संघातून स्थान गमवावे लागले. आता तो पुन्हा नव्या क्षमतेने सिद्ध झाला आहे. असे असताना अजिंक्यला किती वेळ खेळविणार, हा सवाल आहे. कर्णधार कोहलीने या पराभवानंतर चाहत्यांना शब्द दिला आहे की, लॉर्डस्वर केलेल्या चुका पुन्हा करणार नाही. चुकांतूनच आपण शिकत असतो… आता तिसर्‍या कसोटीत भारतीय संघ सावरला नाही, तर त्यांना ही कसोटीची मालिकाही गमवावी लागेल. एकदिवसीय आणि टी ट्वेंटीच्या प्रकारांत भारतीय संघ आघाडीचा आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या गोर्‍यांच्याच संघांनी नव्हे, तर श्रीलंका, पाकिस्तानसारख्या भारतीय उपखंडातील देशांनीही कसोटीतली शास्त्रीय लय कायम ठेवली आहे. भारतीय संघ मात्र झटपट क्रिकेट खेळल्यासारखाच वागत असतो. कसोटी प्रकारात खेळपट्टीवर टिकून राहण्याची अन् टिच्चून फलंदाजी करण्याची सवय असावी लागते. लॉर्डस्वर भारतीय फलंदाजांना सुरक्षात्मक खेळीही करता आली नाही. हा दौरा तसा दीर्घ काळाचा आहे. त्यामुळे आता येत्या काळात खेळाडू अवसरतील. थकतीलही. अशात कर्णधार कोहलीची भूमिका महत्त्वाची ठरते. आता क्रिकेटचे पंडित बोलू लागले आहेत की, विराट कसोटी संघाचा कर्णधार म्हणून अपयशी आहे. बिशनसिंग बेदीसारखा जाणता बुजुर्गही हेच म्हणतो. पहिल्या कसोटीत कोहलीने वैयक्तिक खेळ चांगला केला, त्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन म्हणाला होता की, त्याचा खेळ चांगला झाला याचा अर्थ तो कर्णधार म्हणून यशस्वी ठरला असे होत नाही… भारतीय संघाचा हा ‘फॅमिली टूर’ आहे, असेच ते वागत आहेत. प्रशिक्षक रवी शास्त्रीचा वचक नाही, असे दिसते आहे. खेळाडूंचे कुटुंब त्यांच्यासोबत आहे अन् पहिली कसोटी गमावल्यावरही सराव करायचा तर सगळेच खेळाडू आपल्या कुटुंबासह साहेबांचा देश ‘एन्जॉय’ करत होते. एकतर गेल्या दोन दशकांत अति क्रिकेटमुळे खेळाडूंना त्यांचा फिटनेसही राखता येत नाही अन् कुटुंबापासून खूप वेळ दूर राहिल्याने त्यांच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम होतो. खेळांत विजय- पराभव होतच असतो, मात्र लॉर्डस्वरचा पराभव भारतासारख्या संघाला लाजिरवाणाच आहे. एक डाव आणि १५९ धावांनी ही कसोटी गमवावी लागली. साहेबांनी तीनच दिवसांत निकाल लावला… भारतीय संघ पराभूत झाल्याने सामान्य जीवनावर काही परिणाम होत नाही, हे वरवरचे. खरे तर क्रिकेट या खेळाचा आर्थिक परिणाम मोठा आहे. कोट्यवधीची उलाढाल क्रिकेटमुळेच होत असते. अगदी सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या हक्कापासून तर विविध कंपन्यांच्या जाहिरातींपर्यंत हा पैशांचा खेळ चालतो. त्यांना त्यांचे ब्रॅण्ड असलेले खेळाडू सतत चर्चेत असावेच लागतात अन् कार्पोरेट गुंतवणूक सुरक्षित राहावी या खेळातली यासाठी रसिक निराश होऊ नयेत, याचीही काळजी घ्यावीच लागते. त्यासाठी भारतीय संघ जिंकतही राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तेंडुलकरला ‘भारतरत्न’ दिला जातो अन् त्याच्या आयुष्यातला अखेरचा विश्‍वचषक म्हणून श्रीलंकेच्या संघाला पराभूतही व्हावे लागते. अखेर क्रिकेट हा कार्पोरेट खेळ आहे, हा संघ भारत सरकारचा नसला, बीसीसीआयचा असला, तरीही पूर्ण व्यवसायी असलेल्या या खेळात गुंतवणूक मोठी असल्याने कथित भारतीय संघ अजिंक्यच असावा असे नाही, पण जिंकत राहणे आवश्यक आहे…

https://tarunbharat.org/?p=59763
Posted by : | on : 14 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (360 of 787 articles)


कहू | २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. २०१४ प्रमाणेच यावेळीदेखील रालोआच सत्तेत येईल, असे सध्याचे वातावरण आहे. ...

×