ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » काँग्रेस सुधरणार नाहीच…!

काँग्रेस सुधरणार नाहीच…!

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी, काँग्रेसमधील चौकडी आणि काँग्रेसचे देशभरातील अनेक नेते गांधी जयंतीला वर्धेत आले, संघ-भाजपाविरुद्ध बरळले आणि निघून गेले. गांधी जयंतीचा चांगला दिवस होता. गांधीजींचे स्मरण करून काँग्रेस पक्षाची पुढची दिशा काय राहील, देशातील जनतेच्या हितासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनतेपुढे काय अजेंडा सादर केला पाहिजे, यावर चिंतन करण्यापेक्षा काँग्रेसच्या या नेत्यांनी मोदी-संघाला शिव्या घालण्यातच धन्यता मानली. याचा अर्थच हा की, काँग्रेस अजूनही पराभूत मानसिकतेतून बाहेर आलेली नाही आणि पराभवातून धडा घ्यायलाही तयार नाही. गांधींचे नाव घेऊन, सेवाग्राम आश्रमात जेवणावळी करून स्वत:ची ताटं धुण्याचे नाटक तेवढे या मंडळींनी चांगले वठविले आणि सत्तेत येण्याचे दिवास्वप्न पाहून ही मंडळी निघून गेली. मोदींना सत्तेतून हटविण्याचे आवाहन करताना, आम्ही सत्तेत आल्यास देशासाठी काय करू, हे जर काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेला सांगितले असते, तर एकवेळ समजून घेता आले असते. पण, संघ-भाजपा-मोदींवर टीका करण्यापलीकडे कसलाही अजेंडा काँग्रेसकडे नव्हता आणि त्यामुळे त्यांच्या, वर्धेतल्या नाटकाचा त्यांना निवडणुकीत काही फायदा होईल, याची अजीबात शक्यता नाही. मोदींनी या देशातील गरिबांची फसवणूक केल्याचा आरोप करणार्‍या काँग्रेसने थोडे इतिहासात डोकावून पाहणे गरजेचे आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७५ साली त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. पण, प्रत्यक्षात काँग्रेसच्या सत्ताकाळात गरिबांच्या मतांचे फक्त राजकारण केले गेले आणि गरिबी हटण्याऐवजी गरीबच हटवले गेलेत! प्रत्येक वेळी गरिबीच्या नावाने राजकारण करण्यात काँग्रेस यशस्वी होत गेली आणि याच काँग्रेसने देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. आज परिस्थिती बदलली आहे. जनता हुशार झाली आहे, स्वत:च्या हक्कांप्रती जागरूक झाली आहे. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी, संधिसाधू काँग्रेसला घरी बसवून मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत भाजपाच्या हाती सत्ता सोपविली आहे. तेव्हापासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सातत्याने फक्त मोदी आणि भाजपावरच टीका करीत आहेत. ते दिशाहीन राजकारण करीत असल्याने, काँग्रेसचे राजकीय भवितव्यही अंधकारमय झाले आहे. मध्यंतरी राहुुल गांधी अमेरिकेत गेले होते. घराणेशाहीबाबत ते तिथे बोलले. कुणी कुठे काय बोलावे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. असे असले तरी बोलताना तारतम्य बाळगण्याचे भान ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. घराणेशाही तर भारतात चालतच राहणार, ती सगळीकडेच आहे, केवळ काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे इतरांनी आमच्यावर टीका करू नये, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. ती अजीबात योग्य नाही. देशात घराणेशाहीची सुरुवात काँग्रेसनेच केली. पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी, इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी, त्यांच्यानंतर आता सोनिया आणि राहुल गांधी काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारच. शिवाय, काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांची मुलंही सक्रिय राजकारणात उतरली आहेत. अनेकांची मुलं आमदार आणि खासदार झाली आहेत. यात काही गैर नाही आणि हे असे चालतच राहणार, असे जर राहुल गांधी म्हणत असतील, तर त्यांचे राजकीय भवितव्य किती उज्ज्वल आहे, हे येणारा काळच सांगेल! ज्या काँग्रेसने घराणेशाही जन्माला घातली, त्याच काँग्रेसने घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला असता, तर अन्य राजकीय पक्षांनाही त्याबाबत विचार करावा लागला असता. काँग्रेसने जन्माला घातलेली घराणेशाही इतर राजकीय पक्षांमध्येही आली आहे, हे नाकारता येत नाही. पण, ज्यांनी घराणेशाहीची सुरुवात केली, ते तिचा बचाव करीत असतील आणि त्यासाठी नेहरूंनी देशासाठी काय काय केले, याचा पाढा वाचणार असतील, तर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार पुन्हा त्यांना जागा दाखवतील, यात शंका नाही! पंडित नेहरूंच्या राजवटीत देशात उच्च शिक्षण देणार्‍या अनेक संस्था स्थापन झाल्या, पंडित नेहरू यांनीच देशाला वैज्ञानिक विचार दिला आणि आयआयटीसारख्या संस्थांनाही जन्म दिला, असा युक्तिवाद काँग्रेसकडून कायम केला जात असतो. पण, या देशात असलेली गरिबी वाढविण्याला, भ्रष्टाचाराची कीड फैलावण्याला, घराणेशाहीचा विस्तार करण्यालाही आम्हीच जबाबदार आहोत, हे काँग्रस कधीच मान्य करीत नाही. काँग्रेसचे नेते स्वत:च्या सोईने खरेखोटे बोलत असतात, हे देशाने अनुभवले आहे. ज्या भारतीय जनता पार्टीवर काँग्रेसकडून कायम सांप्रदायिकतेचा आरोप केला जातो, त्याच काँग्रेसने देशातील मुस्लिमांचे लांगूलचालन करीत बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजावर अन्याय केला आहे, याचा विसर पडता कामा नये. झालेल्या चुकांमधून धडा शिकायला काँग्रेस तयार नाही. २०१४ च्या निवडणुकीत मतदारांनी जोरदार आपटी दिल्यानंतरही काँग्रेस स्वत:मध्ये सुधारणा करायला तयार नाही. ज्या मुस्लिम समुदायाने काँग्रेसला कायम साथ दिली, त्या समुदायाच्या अधोगतीला काँग्रेसच जबाबदार आहे, हे मुस्लिमांच्याही आता लक्षात आले आहे आणि त्यामुळेच ते काँग्रेसेतर भाजपाविरोधी पक्षांकडे वळले आहेत, हेही काँग्रेस लक्षात घ्यायला तयार नाही. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी बहुुसंख्य हिंदू समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा मोठा फटकाही काँग्रेसला बसला आहे. भाजपाने हिंदुहिताचा मुद्दा हाताळला, तर लागलीच भाजपाला सांप्रदायिक ठरवायचे आणि मुस्लिमांच्या मनात भाजपाची प्रतिमा व्हिलनसारखी निर्माण करायची, असला उद्योग केल्यानेच काँग्रेसने मार खाल्ला आहे, याचाही विसर काँग्रेसने पडू देऊ नये. राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना घराणेशाही तर सगळीकडेच असल्याचे सांगत काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन केले होते. पण, आज देशातील जी चार सर्वोच्च पदं आहेत, त्यांपैकी एकाही पदावर घराणेशाहीतून आलेली व्यक्ती आरूढ झालेली नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. राष्ट्रपतिपदी आरूढ झालेले रामनाथ कोविंद यांना कुठलाही राजकीय वारसा नाही. पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कधीच राजकारणात नव्हती. उपराष्ट्रपती झालेले एम. व्यंकय्या नायडू यांनाही राजकीय वारसा नाही. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन या तर अतिशय सामान्य मराठी कुटुंबातून आल्या आहेत. त्यांच्या घरातीलही कुणी कधी राजकारणात नव्हते. हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते, हे राहुल गांधी यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांनी घराणेशाहीचे समर्थन न करता, झालेली चूक मान्य करत पुढची वाटचाल केली, तरच ते राजकारणात यशस्वी होतील.

https://tarunbharat.org/?p=64949
Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (211 of 735 articles)


जहागीरदार | छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक यावेळी तिरंगी होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपा, काँग्रेस आणि अजित जोगी यांची जनता काँग्रेस व ...

×