मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर » काश्मिरी मुलांसाठी…

काश्मिरी मुलांसाठी…

सुनील कुहीकर |

सुमारे पंधरा वर्षांपूर्वीचा तो प्रसंग असेल. नुकताच अभियंता झालेल्या एका उमद्या तरुणाचा पुण्यातल्या एका कार्यक्रमात सत्कार झाला होता. त्या वेळी काश्मिरात लष्करप्रमुख म्हणून कार्यरत असलेले पाटणकर त्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित होते. काश्मिरातली तेव्हाची परिस्थिती लक्षात घेता, अशा तरुणांनी तिकडे येऊन सेवा दिली पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केलं होतं. खरं तर सत्कार काही या एकट्या अभियंत्याचा नव्हता अन् भाषण ऐकणाराही काही तो एकटाच नव्हता. पण, भाषणाचा मथितार्थ मनावर घेऊन तिथनं बाहेर पडलेला मात्र तो एकटाच असावा बहुधा. कारण तिथनं बाहेर पडतानाच त्यानं मनाशी पक्की गाठ बांधली होती- अस्वस्थ काश्मिरात जाण्याची… तिथं काम करण्याची… घरी विचारलं. साहजिकच परवानगी नाकारली गेली. तर, गोव्यात जातो म्हणून सांगून काश्मिरात पोहोचला तो. ज्यांचं भाषण एकून तिथपर्यंत पोहोचला त्या पाटणकरांची भेट घेतली. तुमच्या म्हणण्यावरून मी इथं आलोय् हे सांगितलं, तर त्यांचाही विश्‍वासच बसेना. काहीशा तांत्रिक अडचणींमुळे, नंतर यायला सांगून त्यांनी या तरुणाला परत जायला सांगितले. तो पुण्यात परतलाही. पण, तसे माघारी येणे पाऽऽर जिव्हारी लागले होते. काही दिवसातच तो पुन्हा काश्मिरात पोहोचला. पहिल्या वेळी निदान तिथं जाऊन कुणालातरी भेटायचं होतं. त्यांच्या मदतीनं, सल्ल्यानं काम करायचं मनात होतं. या वेळी तर कुणाचाच आधार नव्हता. वाटेतल्या गावागावांतून भटकंती सुरू झाली. नजरेस पडेल त्याच्याशी बोलायचं. त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा. एखादा शाळकरी पोरगा दिसला की, चेहर्‍यावरची कळी नकळत खुलायची. त्याच्याशी गप्पा मारण्यात वेळ निघून जायचा. नंतरच्या काळात तर हाच दिनक्रम होऊन बसला. त्यांच्या आवडीच्या विषयांवर विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याचा. यातूनच अलफयाजमधली बंद पडलेली एक शाळा सुरू झाली आणि सारंग गोसावी या तरुणाच्या पुढाकारातून ‘असीम’चा पायाही रोवला गेला…
कारण कधी बुरहान वानीच्या मृत्यूचे असते, तर कधी कुठल्याशा गोष्टीवरून उद्भवलेल्या परिस्थितीचे. जराशी हूल पुरेशी असते. हाताला काम नसलेली तरुणाई रस्त्यावर उतरते. कधी खरा तर कधी तद्दन खोटा असा संताप व्यक्त करते. पुष्कळदा असे वागले की, समजावण्यासाठी पुढे येणारे अधिकारी हातात पैसे ठेवतात. अनेकदा तर त्या पैशासाठीच ही पोरं रस्त्यावर उरतलेली असतात. या घटनाक्रमात कधी दोन महिन्यांसाठी तर कधी चार महिन्यांसाठी शाळा, शिक्षण वार्‍यावर सुटल्याची बाब नवलाईची राहिलेली नाही इथे. वानी प्रकरणात तर काश्मिरातल्या १९ शाळा जाळल्या गेल्यात. कित्येक गावांत गेले चार महिने पोरं शाळेकडे फिरकलीही नाहीत. या मुलांना परीक्षा देता यावी म्हणून त्यांच्यासाठी केंद्रांची उभारणी करण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी नुकतीच राज्यकर्त्यांकडे केली आहे. आणि हो! एक आणखी प्रयोग होतोय्. उद्भवलेल्या या परिस्थितीत इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे नेऊन शिकवण्याचा. दरवर्षी निदान पन्नास विद्यार्थी काश्मीर, जम्मू, लेहमधून पुण्यात आणले जातात. इथल्या ज्ञानप्रबोधिनी, मिलेनियम अशा शाळेत इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. त्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जातात.
सारंग गोसावी. पुण्यातला इंजिनीअर. लेफ्टनन जनरल पाटणकरांच्या त्या भाषणानं कासावीस झालेला. प्रभावित होऊन लागलीच काश्मिरात पोहोचलेला. समाजासाठीच्या समर्पणाच्या भावनेने झपाटलेला. त्याच धडपडीतून त्यानं सुरू केलेल्या एका प्रयोगाला एव्हाना दीड दशक पूर्ण झालं आहे. सुरुवातीला तो एकटाच जायचा काश्मिरात. मग सोबतीला काही लोकांना नेणं सुरू झालं. त्यांना काश्मिरातील धगधगत्या वास्तवासोबतच तिथल्या गरजा, तिथल्या लोकांची मानसिकता या विषयीची जाणीव करून देण्याचा उद्देश होता. सारीच नाही, तरी त्यातली बरीच मंडळी हळूहळू या कामाशी जोडली जाऊ लागली. गुजरातपासून तर दिल्लीपर्यंत अन् डोंबीवलीपासून तर सांगली-सातार्‍यापर्यंतची तरुणाई या कामासाठी एकत्र येऊ लागली. बघता बघता आज ८८ जणांचा एक छान ग्रुप जमला आहे. पस्तिशीतला सारंग हा त्यातला वयाने सर्वात मोठा सदस्य. इतर सारे त्याहून कमी वयाचे. सर्व जण आपापल्या ठिकाणी नोकरी करणारे आणि तरीही वेळात वेळ काढून काश्मीर आणि पूर्वांचलात काम करणारे. अर्थात आता तिकडे काश्मिरातही शंभरेक स्थानिक कार्यकर्त्यांची टीम तयार झाली आहे. पूर्वांचलात सहकार्यासाठी पुढे आलेल्या तरुणांची संख्याही एव्हाना पाव शतकाच्या समोर सरकलेली.
तसं तर काम प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात चाललेले. पण, म्हणून इतर कामं करायचीच नाहीत, असा काही कुणाचा हेका नाही. दर वेळी छोट्या छोट्या गोष्टींवरून रस्त्यावर उतरणार्‍या, दगडफेक करणार्‍या तरुणांशी प्रेमाने, आस्थेने बोलून, मनाच्या तारा जोडण्याचा प्रयत्न केल्याचा परिणाम हा झाला की, अक्रोड आणि सफरचंदाच्या बिस्किटांचे तीन छोटे उद्योग मोहनपुरा, बांदीपूर आणि सोपोरमध्ये उभे राहिले आहेत. यातील एक उद्योग तर खुद्द लष्कराच्या आग्रहावरून सुरू झाला. काम नसलेल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या उद्योग उभारणीपासून तर ऑनलाईन करीअर गायडन्सचे वेगवेगळे प्रयोग ‘असीम फाऊंडेशन’च्या माध्यमातून चालले आहेत. तिकडच्या एखाद्या विद्यार्थ्याला भविष्यात डॉक्टर व्हायचं असेल, तर इकडच्या एखाद्या वैद्यकीय विद्यार्थ्याशी त्याला जोडून दिले जाते. त्याला हवी ती माहिती, हवे ते गायडन्स देण्याचे काम हा नवा मित्र करतो. आजघडीला निदान शंभर विद्यार्थी ई-फ्रेण्ड म्हणून एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. येत्या काळात हा आकडा हजाराच्या घरात जावा, असा प्रयत्न असीम फाऊंडेशनच्या ‘अभिलाषा’ नामक प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. शिक्षणात व्यत्यय आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना पुण्यात आणून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून देण्याचा प्रयत्नही त्याच भावनेतून साकारलेला. जवळपास आठ वर्षे झालीत. दरवर्षी सुमारे पन्नास विद्यार्थ्यांचा एक गट पुण्यात येतो. किंबहुना आणला जातो. आवश्यक तेवढे दिवस ते विद्यार्थी इथे राहतात. इतर मुलांच्या बरोबरीने अभ्यास करतात. पुन्हा काश्मिरात परत जातात. अलीकडेच पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठीही एका होस्टेलची व्यवस्था पुण्यात उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढीव संख्येच्या हिशेबाने लवकरच या व्यवस्थेचा व्याप विस्तारण्याचा मानस व्यक्त होतोय्.
सारंगच्या शब्दोत सांगायचं झालं, तर काश्मिरातील परिस्थिती अगदीच काही वाईट नाही. प्रश्‍नांची संख्या आणि त्याचा परीघ वाढविण्यापेक्षा लोकांशी बोलून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, तर खालच्या पातळीवरच ते सुटतात. त्यामुळे समस्यांच्या गांभीर्याच्या कक्षा विस्तारण्यापेक्षा ती सोडविण्याच्या दृष्टीने ही टीम काम करतेय्.
कधीतरी काश्मिरातले काम बघून नागालॅण्डमध्ये काम करण्याचे निमंत्रण मिळाले होते. आता थेट अफगाणिस्तानवरून बोलावणे आले आहे. तिथल्या काही मुलींना माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले ज्ञान ऑनलाईन देण्याचा प्रयोग सुरू आहे. भविष्यात तिथल्या काही विद्यार्थिनी भारतात येतील, त्या वेळी स्थानिक संस्थांच्या मदतीने त्यांच्या प्रशिक्षणाचा संकल्प पूर्ण होईल आणि त्याच क्षणी पाया रचला जाईल अफगाणिस्तानातील एका उद्योग उभारणीचा याच मुलींच्या सहभागातून! त्यांच्याही पाठीशी उभी असेल भारतीय तरुणांची असीम फाऊंडेशन. असीम. सर्वच प्रकारच्या सीमांची बंधने झुगारून समाजकार्यासाठी सरसावलेली तरुणांची एक टीम…

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर (613 of 654 articles)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अचानक पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला. या ...