ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक » केरळच्या दुःखावर संघाचा मलम!

केरळच्या दुःखावर संघाचा मलम!

चारुदत्त कहू |

केरळमध्ये नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. शेजारच्या कर्नाटकालाही पुराने कवेत घेतले. भारतात आणि जगातही अशा नैसर्गिक आपत्ती कोसळतात त्या वेळी त्या त्या देशांमधील राष्ट्रभक्त नागरिक आणि स्वयंसेवी संघटना अभावग्रस्तांच्या मदतीला धावून जात मानवतेचा परिचय देतात. भारतातही केरळमधील पूरपरिस्थितीमुळे रस्त्यावर आलेल्या लक्षावधी लोकांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणा धावली आणि स्वयंसेवी संस्थांनीही त्यांची जबाबदारी पार पाडत सेवाभावाचा परिचय दिला. सेवाभावात आघाडीवर असलेल्या संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कुणी प्रसिद्धी करा अथवा टाळा, स्वयंसेवक त्यांना नेमून दिलेली कामे दिलेल्या वेळेत करून जगाला मानवतेचा परिचय देत आहेत. देशावरील संकटकाळात संघ काय करू शकतो, याचा परिचयही याप्रसंगी दिला जात आहे. गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती केरळवर कोसळली आहे. विलक्षण गंभीर नैर्ऋत्य मान्सूनमुळे २०१८ ची पूरपरिस्थिती ओढवली आहे. पहिल्याच दिवशी पावसाने एका दिवसात १०० बळी घेतले! ही परिस्थिती उद्भवण्यास कारणेही तशीच आहेत. राज्यातील २७ धरणांचे दरवाजे आणि इडुकी धरणाचे पाच दरवाजेदेखील एकाच वेळी उघडण्यात आल्याने पूरपरिस्थितीचे गांभीर्य वाढले. मुसळधार पावसाने वायनाडमध्ये प्रचंड प्राणहानी झाली आणि रस्तेही होत्याचे नव्हते झाले. राज्यातील मृतांचा आकडा चारशेवर आणि विस्थापित झालेल्यांची संख्या तीन लाखांच्या आसपास आहे. १४ जिल्ह्यांमध्ये या काळात अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला होता. सरकारने सुमारे ४५० ठिकाणी सहाय्यता केंद्रे सुरू केली आहेत. राज्यभरात सेवाभारतीचे असंख्य कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. सेवाभारतीच्या ३५० शाखांचे तब्बल पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्त जिल्ह्यांमधील मदत केंद्रांमध्ये जिवाचे रान करीत आहेत. गरजू पूरपीडितांना तीन लक्ष ५० हजार अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आली असून, १० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले गेले. अलापुझा जिल्ह्यातील कुट्टालनाडू येथे २० वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले गेले. येणार्‍या काही दिवसांत आणखी रक्तदान शिबिरे आणि वैद्यकीय सेवा केंद्रे सुरू करण्याची सेवाभारतीची योजना आहे. निरनिराळ्या ठिकाणी सेवा भारतीच्या ४० अ‍ॅम्ब्युलन्स दिवस-रात्र सेवा देत आहेत. सेवाभारतीने आयोजित केलेली ही शिबिरे स्वतंत्रपणे अथवा हितचिंतकांच्या सहकार्याने आयोजित केलेली आहेत. या शिबिरातील स्वयंसेवी कार्यकर्ते अन्नाची पाकिटे, निवासाची सोय आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेत आहेत. शेकडो नागरिक- ज्यांचा सेवाभारतीशी काही संबंध नाही- असेही लोक या संस्थेच्या सेवाभावीकार्यात जुळत आहेत. पूरग्रस्तांसाठी कपडे, अन्न, धान्य, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात संकलन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी ही मदत पोहोचविण्यासाठी वाहनेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सेवाभारतीचे पदाधिकारी या सार्‍या मदतवाटपावर जातीने लक्ष ठेवून आहेत.
संघाचे स्वयंसेवक आपत्ती निवारणकार्यात कशा प्रकारे काम करायचे याबाबत प्रशिक्षित नसतीलही, पण परिस्थिती उद्भवल्यास कसे वागायचे, कोणती कामे करायची, मदत कशी करायची, याचे मार्गदर्शन त्यांना निश्‍चितच तज्ज्ञ अधिकार्‍यांकडून मिळत आहे. सेवाभारतीच्याच पुढाकारातून मत्स्य प्रवर्तका संघमच्या कार्यकर्त्यांनी एर्नाकुलम् आणि अलपुझा परिसरात पुरात अडकलेल्या अनेक केरळी नागरिकांना वाचवले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे महत्कार्य केले. या मानवतावादी कार्यकर्त्यांनी अलुवा, कुंडागलूर, पांडनाद, वनमनी, बुधानूर, कुमारकम आदी भागांमध्येही त्यांच्या कार्यकुशलतेची चमक दाखविली. त्यांच्याजवळ केवळ २० लहान बोटी, दोन मोठ्या बोटी आणि एक स्पीड बोट आहे. पण, त्यांच्या साह्याने कार्यकत्यार्र्ंनी पुरातवाहून जाणार्‍या आणि पाण्यात अडकून पडलेल्या शेकडो लोकांना सुखरूप सुरक्षित स्थळी आणून पोहोचविले. या संघटनेचे अराटुपुझा येथील ६० कार्यकर्ते या मदतकार्यात आपले कौशल्य पणाला लावत आहेत. यामाहा इंजीन लावलेल्या २० बोटींमधून कार्यकर्त्यांनी परामपुझा आणि कुट्टानाड येथे तब्बल ६०० जणांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. मबवाट्टुपुढा आणि कोथामनागलम येथे मुन्नाबम आणि वाडानपल्ली येथील कार्यकर्त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी १० बोटी तैनात केलेल्या होत्या. मुझीक्काल आणि कुरीमाशेरी येथेही सेवाभारतीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दृष्टिपथात पडते. पायोली, कोयिलांडी, वेल्लाईल आणि माराड येथील मत्स्य प्रवर्तका संघाच्या कार्यकर्त्यांनीदेखील सेवाभारतीच्या पुढाकारातून मदतकार्यात झोकून दिलेले आहे. कोट्टायम जिल्ह्यात अजूनही सेवाभारतीची २७ मदतशिबिरे सुरू असून, हजारो अन्नपाकिटे आणि जीवनोपयोगी वस्तूंच्या पाकिटांचे वितरण येथून केले जात आहे. ५२ वाहनांद्वारे सात लाख ५० हजार अ़न्नपाकिटांचे आजवर वितरण झालेले आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात १८, तर इडुक्की येथे ११ मदतशिबिरे सुरू करण्यात आली आहेत. जी झाडे कधीही उन्मळून पडण्याची शक्यता आहे, त्यांपैकी अनेक झाडे बुंध्यापासून तोडून टाकण्याचे काम सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. पावसाचा वेग कमी झाल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. या काळात रस्त्यांवरील माती दूर करणे, घरांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करणे, घरांमध्ये शिरलेला गाळ साफ करणे, मेलेल्या जनावरांवर अंत्यसंस्कार करणे, साचलेल्या पाण्यात कीटकनाशकांची फवारणी करणे, आजारी रुग्णांना औषधे पुरवणे, जखमी लोकांना आरोग्य शिबिरांपर्यंत पोहोचविणे, घाबरलेल्यांना मानसिक धक्क्यातून सावरणे, अशी कितीतरी कामे स्वयंसेवकांच्या सहकार्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेली आहेत. या मदतकार्यासाठी राज्याच्या विभिन्न भागातील शेकडो नागरिकांनी पूरग्रस्त भागात धाव घेतली आहे. कोलानकोट येथे सेवाभारतीची ४८ मदतशिबिरे सुरू करण्यात आली आहेत. या शिबिरांध्ये ७६७ कुटुंबांतील ३१३३ लोकांना आश्रय देण्यात आला आहे. या ठिकाणी ५८० स्वयंसेवक सेवा देण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. वायनाड जिल्ह्यात १२८ मदतकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सेवाभारतीच्या या शिबिरात २३ टन तांदूळ, ४६०० क्विंटल भाजीपाला पोहोचवण्यात आला आहे. निरनिराळ्या प्रकारचे चार लक्ष ५० हजार कपडे शिबिरात आश्रय घेतलेल्यांना वितरित करण्यात आले आहेत. कन्नूर आणि तालसेरी येथे कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी दोन मोठी गोडाऊन्स सुरू करण्यात आली आहेत. येथूनच वायनाड येथे १० टन तांदूळ पाठवण्यात आला आहे.
पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागात पाण्याची पातळी कमी झालेली आहे, तर कुठे पाणी वाहून गेल्याने फक्त चिखल उरला आहे. पण, संघस्वयंसेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात कुठेही खंड पडू दिलेला नाही. केवळ सोशल मीडियावर केरळची वाताहत बघणे, त्यबद्दल चिंता व्यक्त करणे, असे न करता स्वयंसेवक कुणाच्याही आमंत्रणाची वाट न बघता, स्वतःची सुखदुःखं बाजूला ठेवून केरळवासीयांच्या मदतीसाठी धावून गेल्याचे संघाचे अधिकारी सांगतात. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेले विदेशातील आणि भारतातील एकूण ३२ स्वयंसेवक एकत्र आले असून, त्यांनी केरळ आणि कोडागू (कर्नाटकातील पूरग्रस्त जिल्हा) पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी एका वॉर रूमची स्थापना केली आहे. सोशल मीडियावरील संदेशांची छाटणी करून, मदतीसाठी वाट पाहणार्‍यांच्या ठिकाणांचे गूगल मॅपिंग करून हे संदेश त्यांनी मदतीसाठी सज्ज असलेल्या स्वयंसेवकांच्या पथकांकडे वळते केले. या कामात एकूण १२०० तासांचे मनुष्यबळ कामी आले. त्यांनी १०५० फोन कॉल्स करून लोकांना केरळच्या पूरग्रस्त भागात संघाच्या पुढाकारने सुरू असलेल्या मदतकामाची माहिती दिली. पूरपरिस्थितीबाबत जनजागरण करण्यासाठी त्यांनी तब्बल ३२०० पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या. ऑनलाईन मदतीची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. लष्करी तुकड्यांशी संपर्क साधणे, बोटींची सुविधा उपलब्ध करून देणे, शासकीय सोयी-सुवधांची माहिती देणे, या कामातही या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. पूरग्रस्तांसाठी संघाने विविध शहरांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निधिसंकलनाला प्रारंभ केला आहे. केरळच्या पूरग्रस्त भागातील संघस्वयंसेवकांच्या कामाची अजूनही भली मोठी जंत्री देता येऊ शकते. टीकाकारांनी केवळ या सत्कार्याला विरोध न करता आपणही त्या दृष्टीने काही करू शकतो का, याचा धांडोळा घेण्याची गरज आहे…

https://tarunbharat.org/?p=60694
Posted by : | on : 28 Aug 2018
Filed under : उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक (657 of 1507 articles)


पूरप्रलयातील जनतेला मदत व बचावकार्यासाठी केंद्र सरकारने तातडीने तिन्ही दलांना पाठविले. ६०० कोटींची मदत दिली. नैसर्गिक आपत्ती घोषित करून आणखी ...

×