ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » केरळसाठी प्रार्थना करा…

केरळसाठी प्रार्थना करा…

निसर्गसौंदर्यासाठी ख्यातीप्राप्त केरळात गेले काही दिवस पावसाने जो धुमाकूळ घातलाय्, त्यात त्या प्रांताची झालेली वाताहत दुर्दैवी आहे. पण, समोर उभ्या ठाकलेल्या संकटाला सामोरे जात, निकरानं त्याचा सामना करत, पुन्हा नव्या उमेदीनं उठून उभं राहण्याची जिद्द भारतीय समाजाला कायम एक प्रकारची ताकद देत राहिली आहे. नव्हे, तीच या समाजाची खरी ओळख आहे. शेजारचे राज्य असो की, मग सीमेपलीकडचा एखादा देश, तो संकटात सापडलाय् म्हटल्यावर जातिपातीपासून तर विचार-पक्षापर्यंतच्या सार्‍याच भिंती आपसूक तुटून पडतात आणि सारेच एकमेकांच्या मदतीला सज्ज होतात. काश्मीरपासून तर केरळपर्यंतची उदाहरणे त्याचीच साक्ष ठरली आहेत. एरवी लोक ज्यांच्याी नावाने बोटे मोडतात ते संघाचे स्वयंसेवक नेहमीप्रमाणे याही वेळी, कालपर्यंतचा लोकांनी केलेला दुस्वास विसरून मदतकार्यार्थ मैदानात उतरले आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्व प्रकारच्या मदतीचा ओघ एव्हाना केरळच्या दिशेने प्रवाहित झाला आहे. पैशापासून तर कपड्यांपर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून तर वैद्यकीय सुविधांपर्यंतच्या बाबींचा त्यात समावेश आहे. निसर्गाच्या कोपापुढे कुणीच तग धरू शकत नाही, हे खरेच. मुळात, त्याच्यापुढे सारेच शून्य आहेत, हेही तितकेच सत्य आहे. पण, त्यानंतरच्या प्रवासात मात्र सर्वांनीच एकमेकांच्या साथीला उभे राहण्याची गरज असते. कालपर्यंतचा राग-लोभ, मतेमतांतरे, जाती-धर्म, भाषा-प्रांताच्या, अगदी राजकारणाच्याही भिंती नकळत कोसळतात अन् सारा देश एकसंध असल्याची साक्ष नव्याने पटते. काश्मिरातील अधिकांश जनता कायम दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ उभी राहात आली असल्याचा अनुभव सार्‍या देशाने घेतलेला. पण, पुराच्या संकटात हा सारा प्रदेश अस्तित्वहीन होऊ पाहतोय् म्हटल्यावर इथून तिथवर सार्‍यांचीच घालमेल झाली. ‘आपला’ काश्मीर पुराच्या संकटाशी झुंजतोय् हे बघून सारेच कासावीस झाले. केंद्र सरकारसह संपूर्ण देश त्यांच्या दु:खात सहभागी झाला. तेव्हा कुणलाही, ना ते मुस्लिम असल्याची बाब ध्यानात ठेवण्याची गरज भासली, ना कालपर्यंतचे त्यांचे आक्षेपार्ह वागणे त्यांच्यासाठीच्या मदतकार्यात आडवे आले. किल्लारी, भूजमधला भूकंप असो, की मग काश्मीर-चेन्नईतला पूर… भारतीय समूह याच प्रगल्भतेनं वागत आलाय् आजवर. आता केरळातही प्रत्यय येतोय् तो त्याच समंजस वर्तणुकीचा. एरवी ख्रिश्‍चन मिशनरींनी घेरलेला, कम्युनिस्टांचा प्रभाव असलेला हा प्रदेश. इतरांचे विचारही अमान्य असलेला डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी असलेला सारा परिसर. आपल्याला न पटणार्‍या विचारांची गळचेपी करण्याची, विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कित्येक कार्यकर्त्यांचे गळे निर्दयीपणे चिरून टाकण्याची टोकाची भूमिका घेत वावरलेले लोक आज जेव्हा पुराच्या संकटाने बेघर झाले, तेव्हा कालचा त्यांचा तोरा विसरून आज त्यांच्या मदतीला धावून जाणार्‍या कुण्याही स्वयंसेवकाच्या मनात कसलेही किल्मिष नसणे, यातच सारे आले. दैवी फेरा फार निराळा असतो. तो कुणालाच चुकत नाही. तो कुणाला कोेणते दिवस दाखवेल, याचा अंदाज बांधणे कठीण. आपल्यापैकी कुणालाच त्याची झळ बसू नये असे कितीही वाटत असले, तरी प्रत्येकालाच कधी ना कधी त्या दुष्टचक्रातून जावे लागते. फक्त, अशा वेळी वेळ-काळाचे भान जपत, माणुसकी गाठीशी ठेवून वागण्याची तर्‍हा अनुसरता आली की, क्षणभराच्या त्या भीषण संकटावरही मग लीलया मात करता येते. केरळमध्ये उभ्या ठाकलेल्या पुराच्या संकटानंतर जे जे म्हणून घडते आहे, मदतीचा हात पुढे करण्यासाठी ज्या पद्धतीने सरकारी, गैरसरकारी, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संस्था आणि माणसं सरसावली आहेत, ते बघितल्यावर हे वचन पूर्णत: सत्य असल्याची खात्री पटते. अशा प्रसंगी सरकारने मदत करण्यात नवल नाही. कदाचित कर्तव्याच्या मापदंडात त्याचे मोजमाप होईल. पण, सरकारशी काडीचा संबंध नसलेली सर्वसामान्य माणसं जेव्हा सारे भेदाभेद बाजूला ठेवून दोन पावलं पुढे टाकतात तेव्हा त्यांची ती कृती दखलपात्र ठरते. खुद्द मंत्री चिखल तुडवून लोकांना मदतीचा हात देत असल्याचे दृश्य असो, की मग दूरवरून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या घरातील लोकांनी, डोळ्यांतील आसवांची टिपुसं बेमालूमपणे लपवत, दोन घास खाऊन घ्या म्हणून आग्रह धरणे… सारेच आगळेवेगळे, अद्भुत आहे. परिस्थिती बघून ही राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली. त्यानुसार आता सरकारी पातळीवरूनही मदतीचा प्रवाह केरळच्या दिशेने मार्गस्थ होईल. पण, त्याहीपेक्षा मुंबईच्या डॉक्टर्सपासून तर शेजारच्या कर्नाटकातील महिलांपर्यंत सर्वांनीच ही आपबिती समजून आपल्या बांधवांच्या हाकेला ओ देण्याची स्वीकारलेली भूमिका अधिक महत्त्वाची, समंजस आणि गरजेची आहे. केरळातील पूरस्थिती गंभीर आहे. राज्यातील क्षतिग्रस्त भागातील व्यवस्थांची पुनर्बांधणी करावी लागणार आहे येत्या काळात. पुराचे संकट तर चार-दोन दिवसात ओसरेल, पण त्यानंतर सगळ्यांचाच कस लागणार आहे. हीच प्रगल्भता, याच समंजसपणाची नंतरही गरज भासणार आहे. आजतरी मुख्यमंत्र्यांपासून तर प्रशासकीय यंत्रणेतील अधिकार्‍यांपर्यंत सर्व जण आपापली पदं, मानापमान विसरून लोकांपर्यंत पोहोचताहेत. पूरप्रभावितांना धीर देताहेत. अशा प्रसंगी ज्या खंबीर, धीरगंभीर भूमिकेची अपेक्षा असते, नेमकी तीच भूमिका मुख्यमंत्री विजयन् यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार घेत असताना दिसते आहे, तर केंद्र सरकारनेही या घटनेप्रकरणी मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडण्याकरिता पुढाकार घेतलेला दिसतो आहे. पैशापासून तर आज ज्याची त्या प्रदेशात नितांत आवश्यकता आहे अशा पिण्याच्या पाण्यापर्यंतची व्यवस्था उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील शासनाने घेतलेला पुढाकार नोंद घेण्याजोगा ठरला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील इतर राज्यांनीही अशा प्रसंगात अपेक्षित असलेल्या वर्तणुकीचे दर्शन घडविले आहे. एकूण, कुटुंबातील एखाद्या सदस्यावर वाईट प्रसंग गुदरला असेल, तर त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठीची अहमहमिका, तो समजूतदारपणा परिवारातील इतर सदस्यांनी दाखवल्याचे उदाहरण आज देशभरातील विविध व्यक्ती, संस्था आणि दस्तुरखुद्द सरकारच्या वर्तणुकीतून सिद्ध होते आहे. अगदी परवा युएई, कतार, मालदीवसारख्या देशांनी देऊ केलेली मदत साभार नाकारण्याचे सामर्थ्य भारताला जगाला दाखवता आले ते यामुळेच. अशा एकीचा अनुभव येण्यासाठी दर वेळी संकटांचीच मालिका उभी राहणे आवश्यक आहे का, हा प्रश्‍न मात्र अस्वस्थ करणारा आहे… अर्थात, आजतरी वेळ केरळसाठी प्रार्थना करण्याची आहे…
हवाए अगर मौसम का रुख बदल सकती हैं
तो दुआएंभी मुसीबत के पल बदल सकती है.

http://tarunbharat.org/?p=60344
Posted by : | on : Aug 23 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (53 of 855 articles)


श्यामकांत जहागीरदार | १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ...

×