ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » खरा अडथळा…

खरा अडथळा…

मशीद इस्लामचा अभिन्न भाग आहे का, या प्रश्‍नावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, हिंदू व मुस्लिमांना दिलासा देणारा असला, तरी सेक्युलर विचारवंत, इतिहासकार व मीडिया यांची घोर निराशा करणारा ठरला आहे. रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणाशी कुठलाही निकाल आला, तरी त्याचा राजकीय लाभ फक्त भाजपालाच मिळेल, या भीतीने ही सुनावणी कशी लांबेल, याचे डावपेच सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून कपिल सिब्बल वगैरेंनी सर्वोच्च न्यायालयाला, रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी आगामी लोकसभा निवडणुकीनंतर सुरू करण्यात यावी, अशी दमदाटी करून बघितली. न्यायालयाने ते मानले नाही म्हणून सरन्यायाधीशांवर महाभियोग आणण्याचा असफल प्रयत्न झाला. चार न्यायाधीशांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण, यश काही मिळाले नाही. अशा स्थितीत, गुरुवारचा निर्णय या मंडळींना निराशेच्या गर्तेत टाकणारा होता, यात नवल ते काय! अयोध्येतील रामजन्मभूमी कुणाच्या मालकीची आहे, थोडा इतिहास बघू या. १९९४ सालचे हे प्रकरण आहे. राज्य सरकारने धार्मिक स्थळे अधिगृहीत केल्याप्रकरणी इस्माईल फारूकी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि प्रतिपादन केले की, मशीद हा इस्लामचा भाग असल्यामुळे, मशिदींना राज्याने ताब्यात घेण्यामुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावनांचा अनादर होतो. तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाने फारूकी यांचे प्रतिपादन फेटाळले आणि मशीद ही इस्लामचा अभिन्न भाग नाही, असा निकाल दिला. आता या निकालाचा रामजन्मभूमी खटल्याशी तसा काहीही संबंध नव्हता. परंतु, खटला अधिकाधिक वेळ लांबला पाहिजे, या हेतूने या निर्णयावर पुनर्विचार व्हावा म्हणून एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करून ती रामजन्मभूमी खटल्याला जोडण्यात आली. आस्थेचा प्रश्‍न असल्याने या प्रकरणी घटनात्मक न्यायासन स्थापन करून त्याकडे हे प्रकरण वर्ग करावे, अशी विनंती करण्यात आली. हे प्रकरण घटनात्मक न्यायासनाकडे वर्ग झाले असते, तर रामजन्मभूमी खटल्याला अनायास विलंब झाला असता आणि या सेक्युलर मंडळींना तेच हवे होते. परंतु, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हे प्रकरण स्वत:च्या तीन सदस्यीय न्यायासनाकडे घेतले आणि गुरुवारी त्याचा निकालही लावून टाकला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण व न्या. अब्दुल नाझीर यांच्या न्यायासनाने २ विरुद्ध १ असा हा निकाल दिला. न्या. नाझीर उर्वरित दोघांच्या मताचे नव्हते. त्यांची इच्छा हे प्रकरण घटनात्मक न्यायासनाकडे वर्ग करण्याची होती. कारण, २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने रामजन्मभूमी-बाबरी खटल्याचा जो निकाल दिला, त्यासाठी या इस्माईल फारूकी प्रकरणाचा आधार घेतला होता. निर्णयात तीन पक्षांमध्ये जमीन वाटण्यात आली. दोन भाग हिंदूंना तर एक भाग मुसलमानांना दिला होता. त्यामुळे या लोकांना अशी भीती होती की, सर्वोच्च न्यायालयदेखील इस्माईल फारूखी खटल्यातील निर्णयाचा आधार घेऊ शकते. तसे होऊ नये यासाठी ही सर्व उठकपटक होती. तिकडे, रामजन्मभूमी-बाबरी खटला लवकरात लवकर निकाली निघावा, अशी दोन्ही पक्षकारांची इच्छा आहे. जो निर्णय यायचा तो त्वरित येऊ दे, अशी पक्षकारांची मागणी असताना, आपल्या देशातील काही उपटसुंभ मात्र नको तिथे, कारण नसताना आपले नाक खुपसत असतात. पण, आता गुरुवारच्या निर्णयाने तोही अडथळा दूर झालेला आहे. आता २९ ऑक्टोबरपासून रामजन्मभूमी खटल्याची दररोज सुनावणी होईल, असे सरन्यायाधीशांनी जाहीर केले आहे. पण, खरेच तसे होईल का? याबाबत लोकांना शंका आहे. कारण, विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा २ ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी न्या. रंजन गोगोई येत आहेत. म्हणजे हा खटला आता न्या. गोगोई यांच्यासमक्ष चालेल. हे तेच गोगोई आहेत, ज्यांनी दीपक मिश्रा यांच्याविरुद्ध बंडखोरी केली होती. का केली होती, याची कारणे उघड गुपित आहेत. त्यामुळे लोकांना जी शंका आहे, ती अगदीच अनाठायी आहे, असे म्हणता येणार नाही. कसेही करून रामजन्मभूमीचा खटला लोकसभा निवडणुका होईपर्यंत लांबवायचा, असा जो कट शिजला होता, तो पूर्णपणे निरस्त झाला आहे, असे आजतरी म्हणता येणार नाही. धोका आहेच. या सर्व गोंधळातून देशातील हिंदू मतदार आपले मत कसे वापरतो, हे येणारा काळच सांगू शकेल. हे सर्व झाले खटल्यांविषयी. लोकांनी याचिका दाखल केल्या आणि न्यायालयाने निर्णय दिला. परंतु, आमचा मुद्दा वेगळाच आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे जन्मस्थान भारतात विवादात सापडावे आणि त्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात झगडत बसावे लागणे, हे या देशाचे दुर्दैव आहे. राष्ट्रीय अस्मितेची जी काही प्रतीके आहेत, तिच्या पुनर्स्थापनेसाठी इतका खडतर संघर्ष आणि तोही स्वतंत्र भारतात करावा लागणे, ही बाब समस्त भारतीयांना अत्यंत शरमेची आहे. मुसलमानांना धर्माच्या आधारावर भारताचा फार मोठा भूभाग दिल्यावर आतातरी उर्वरित भारतात हिंदूंना स्वाभिमानाने जगता येईल, ही जी आशा होती, ती स्वतंत्र भारतातल्या आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांनी धुळीस मिळविली आहे. सारे जग आपल्या या ‘शेखचिल्ली’ मानसिकतेवर आणि कृतीवर हसत असते. पराजयाचे, अपमानाचे लहानसेदेखील प्रतीक शिल्लक राहू नये, याची काटेकोर काळजी प्रत्येक देश घेत असतो. पण, आम्ही मात्र आमच्या बुद्धीला लकवा मारल्यासारखे वागत आहोत. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ज्या क्षणी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी आटोकाट विरोध केला, खरेतर त्या क्षणीच जनतेने नेहरू आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला कचर्‍याच्या पेटीत भिरकावून द्यायला हवे होते. तसे झाले असते तर त्यानंतरच्या राज्यकर्त्यांची अक्कल ठिकाणावर राहिली असती. निरपराध कारसेवकांवर गोळीबार करून त्यांचे जीव घेण्याची हिंमत मुलायमसिंहांना झाली नसती. पण, आम्ही तसे केले नाही. त्याचीच ही फळे आम्ही भोगत आहोत. सोव्हिएट रशियाचे पतन झाल्यावर लोकांनी लेनिनग्राड येथील लेनिनचा भव्य पुतळा जमीनदोस्त केला. लेनिनग्राड नाव बदलून जुने सेंट पीटर्सबर्ग नाव ठेवले. अशा अनेक घटना जगाच्या इतिहासात दाखवून देता येतील. ‘‘राजे! आज तुम्ही हवे होतात!’’ म्हणून ओरडणार्‍या या भगव्यांना, प्रतागडावर मोठ्या दिमाखात उभी असलेली, शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी आलेल्या अफजल खानाची मजार दिसत नाही. याला काय म्हणावे? भौतिक सुखदायी जीवनाच्या पुढे ज्यांना राष्ट्र, अस्मिता वगैरे भावनांची किंमत नसते, ज्या देशातील बहुसंख्य सुशिक्षित समाज प्रचंड दांभिक असतो, त्यांच्या नशिबी न्यायालयात वर्षोनुवर्षे खेटे मारणे येणार नाही तर आणखी काय होणार? जे न्यायालय ७० वर्षांपूर्वी स्थापन झाले ते आता, पुरातन श्रद्धेबाबत, विश्‍वासाबाबत निकाल देणार आहे. गंमतच आहे सगळी!

https://tarunbharat.org/?p=64548
Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (146 of 777 articles)


कुहीकर | वैयक्तिक जीवनातील विवाहबाह्य संबंधांचा मुद्दा थेट न्यायालयाच्या दालनात मांडला गेला. नैतिकदृष्ट्या गैर ठरवत, फौजदारी कारवाईसाठी मात्र तो अपात्र ...

×