ads
ads
तर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल

तर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल

►अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांचा इशारा, नवी दिल्ली, ९ डिसेंबर…

ईशा अंबानीच्या लग्नात बेवॉन्स करणार परफॉर्म

ईशा अंबानीच्या लग्नात बेवॉन्स करणार परफॉर्म

उदयपूर, ९ डिसेंबर – ईशा अंबानी आणि आनंद पिरामल…

अंतिम एनआरसीनंतर त्यांचा मताधिकार काढणार

अंतिम एनआरसीनंतर त्यांचा मताधिकार काढणार

►याच आठवड्यात संपणार आक्षेप व दाव्यांची मुदत, नवी दिल्ली,…

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय

►सीबीआय, ईडीचे पथक लंडनला रवाना, लंडन, ९ डिसेंबर –…

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

बीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » गंगेसाठी निर्मल पाऊल…

गंगेसाठी निर्मल पाऊल…

नदी तेथे गाव, असे भारतातील समीकरण आहे. पण, काळाच्या ओघात अनेक नद्या आटल्या आणि त्या आटल्याने त्यांच्या काठी वसलेल्या गावांच्या समृद्धीलाही ओहोटी लागली. असे का झाले? नद्या आटण्याची कारणे काय? त्या उथळ का झाल्या? बारमाही नद्यांमध्ये गाळ जमा होऊन त्यांची खोली कमी का झाली? त्या नद्या प्रदूषित का झाल्या?… याचा जेव्हा आढावा घेण्याची वेळ आली, त्या वेळी प्रारंभी देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून जिचे नाव समोर आले ते पवित्र गंगेचे! जी गंगा प्रातःस्मरणीय आहे, जिला वैदिक काळापासूनचा इतिहास आहे, जिचे नाव ठायीठायी वेद-पुराणात आढळते, ती पवित्र नदी गंगा सर्वाधिक प्रदूषित असल्याचा निष्कर्ष ज्या वेळी वैज्ञानिकांनी पुराव्यांसह दिला, त्या वेळी भारतीय मन सुन्न झाले नसते तरच नवल! पण, या नदीच्या शुद्धीकरणासाठी काही पावले उचलली पाहिजे, तिच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, असे आजवर कुणाला वाटले नाही. अखेर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनेच हे पुण्यकर्म हाती घेतले. गंगेच्या स्वच्छतेचे आणि शुद्धीकरणाचे काम एका मंत्र्याकडेच सोपविले गेले. उमा भारती यांच्या नेतृत्वात याबाबत अनेक आघाड्यांवर काम झाले आणि आता हे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भरभक्कम खांद्यांवर आले आहे. मुळातच नित्यनूतन करण्याची आवड जोपासलेल्या नितीन गडकरींनी या कामाला अजून नवनवे आयाम दिले. गंगा शुद्धीकरण तर व्हायलाच हवे, पण त्यासोबतच तिच्या पाण्यावर नवनवे प्रयोगही साकारले गेले पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला. रस्तेबांधणीतून त्यांनी शहरे-गावांना आणि गावं-खेड्यांना जोडण्याचा प्रयोग साकारलाच होता. त्याच अनुभवातून त्यांनी गंगेमध्ये जहाज चालवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे निश्‍चित केले. यातून पैसे आणि वेळेची बचत तर त्यांनी साधलीच, शिवाय नव्या रोजगाराच्या संधीदेखील निर्माण केल्या. अविरल, निर्मल गंगेच्या प्रवाहासाठी जारी झालेली अधिसूचना ही नव्या आयामांना गती देणारी ठरणार आहे. ही अधिसूचना जारी झाल्यानंतर, मार्च २०१९ पर्यंत गंगा ७० ते ८० टक्के आणि मार्च २०२० पर्यंत शुद्धीकरणाचे काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेले असेल, असा गडकरींनी व्यक्त केलेला विश्‍वास देशवासीयांना चिंतामुक्त करणारा आहे. गडकरींची अशी ख्याती आहे की, जे काम ते हाती घेतात, ते पूर्णत्वास नेतानच. विरोधकांच्या मनातही याबाबत शंका नाही. शेवटी हा हिंदू धर्माशी अनंत काळापासून जोडला गेलेला विषय आहे. गडकरी आधी एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करतात आणि नंतर त्याला मूर्त रूप देतात. विदेश दौर्‍यांमध्ये ते सतत त्या देशांत फिरत असतात आणि तेथील नवनवीन योजनांचा अभ्यास करीत असतात. त्याचा आपल्या देशाला काय लाभ होऊ शकतो, हा एकच ध्यास त्यांना नेहमी सतावत असतो. याकामी आता अनेक संस्था, संघटनांनी आणि साधू-संतांनी अविरल, निर्मल गंगेच्या प्रवाहासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या कार्यात पुढाकार घेतला. सह-सरकार्यवाह कृष्णगोपाल यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत गंगेला निर्मळ करण्याबाबतच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला गेला. यावेळी टिहरी धरणामुळे गंगेच्या झालेल्या नुकसानीवर चर्चा केली गेली आणि रोषही व्यक्त केला गेला. गडकरींनी आधी सांडपाणी व कारखान्यांमधील प्रदूषित रासायनिक पाणी गंगेत जाण्यापासून रोखण्याचे उपाय केले. त्याचप्रमाणे गंगेच्या किनार्‍यावर अंत्यसंस्कार होऊ नयेत, यासाठी त्यांनी जनजागृती केली व त्याला जनतेनेही प्रतिसाद दिला. आता तेथे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे कारखाने उभे झाले आहेत. भारतातील सर्वाधिक लांबीची ही नदी आक्रंदत असताना, जगातील इतर मोठ्या आणि रुंद नद्या अविरल, निर्मल वाहात होत्या. त्या नद्यांवर पर्यटनादी उपक्रम बहरले होते. त्या नद्यांच्या पाण्यातून जलवाहतुकीचे मार्ग खुले झाले होते आणि त्यातील गोडे मासे जगभर निर्यात होते होते. गंगा मात्र हिरमुसली होती. गंगा ही उत्तर भारतातीलच नव्हे, तर सार्‍या भारतीयांच्या नित्य संस्कृती आणि सभ्यतेचे अविभाज्य अंग आहे, ही बाब भारतीयांना ठाऊक होती. त्यामुळे आज ना उद्या ती स्वच्छ होणार, याबाबत समाजमन आश्‍वस्त होते आणि तो दिवस उजाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून, ‘नमामि गंगा’ या प्रकल्पांतर्गत गंगा शुद्धीकरणासाठी एका योजनेचा शुभारंभ केला. या योजनेंतर्गत प्रारंभीच गंगेच्या किनार्‍यांवरील तब्बल ५० कारखाने बंद करण्याचे आदेश दिले गेले. यानिमित्ताने गंगा प्रदूषित का होत गेली? याची कारणेही जाणून घेतली गेली पाहिजे. हिमालयापासून कोलकात्यापर्यंत गंगेच्या किनार्‍यावर कितीतरी कारखाने उभे झाले आहेत. या औद्योगिक प्रकल्पातील रायायनिक पाणी आणि घनकचरा थेट गंगेच्या प्रवाहात सोडला जात आहे. कुठे ऊर्जा प्रकल्प आहेत, तर कुठे चामड्याच्या निर्मितीचे प्रकल्प. कुठे वीज निर्माण केली जात आहे, तर कुठे कागद निर्मितीचा प्रकल्प उभारला गेला आहे. खाद्यनिर्मिती, प्लॅस्टिकनिर्मिती आणि साखरेचे कारखानेही ही नदी प्रदूषित करण्यात सिंहाचा वाटा उचलत आहेत. अणुऊर्जा निर्मितीचे प्रकल्पही गंगेच्या किनारी उभे झाले आहेत. कानपूरचा जाजमऊ भाग चामड्याच्या उद्योगासाठी देशभरात ओळखला जातो. समुद्राला मिळेपर्यंत या नदीत इतकी घाण होऊन जाते की, या पवित्र नदीत डुबकी मारण्याचे तर सोडा, तिच्या किनार्‍यावर उभे राहून स्वच्छ हवा घेण्यासही त्रास होत होता. १९८५ मध्ये सुप्रसिद्ध वकील आणि मॅगसेसे पुरस्कारने सन्मानित एम. सी. मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन गंगेच्या किनार्‍यावर उभ्या झालेल्या कारखान्यांची घाण नदीत जाण्यापासून रोखली जावी, अशी मागणी केली. यानंतर सरकारला गंगा शुद्धीकरणाचा विडा उचलण्याची सुबुद्धी आली. १९८५ ते २००४ या २० वर्षांत गंगेच्या शुद्धीकरणावर १२०० कोटींचा खर्च झालेला आहे. या अंतर्गत गंगेच्या किनार्‍यावर वसलेल्या कारखान्यांचे विषारी पाणी नदीत जाऊ नये म्हणून पाणी साफ करणारे प्लांट लावले गेले. यातून बरीच सुधारणा झाली. पण, हे प्रकल्प पैशांअभावी बंद पडले आणि मग गंगा शुद्धीकरण अभियान फसल्याची आवई उठविली गेली. गंगा स्वच्छ अभियानाचे संचालक वीरभद्र मिश्र सांगतात, भारतातील तब्बल ४० कोटी लोक गंगेवर निर्भर आहेत. गंगेला वाचवायचे असेल, तर हिमालयातील ग्लेशियर्स वाचविले जायला हवेत, असाही एक मतप्रवाह आहे. गंगेचे शुद्धीकरण आणि स्वच्छतेसाठी खाजगी संस्था आणि स्वयंसेवी संघटनाही पुढे आल्या. जी. डी. अग्रवाल यांनी तर उपोषणच छेडले आहे. त्यांनी केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. यातील ७० ते ८० टक्के मागण्या केंद्राने मान्य केल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. या सार्‍या प्रयत्नातून गंगा लवकरात लवकर शुद्ध, निर्मळ व्हावी, एवढीच छोटीशी अपेक्षा! अधिसूचनेच्या निमित्ताने या दिशेने आणखी एका टाकलेल्या निर्मल पावलाची दखल जनताजनार्दनाने घ्यावी, ही नम्र विनंती!

https://tarunbharat.org/?p=65556
Posted by : | on : 12 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (112 of 767 articles)


वैद्य | १९९४ साली सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील विविध सत्र न्यायालयात तसेच दंडाधिकारी न्यायालयात रामजन्मभूमीबद्दलची दाखल सर्व प्रकरणे एकत्र केलीत आणि ...

×