ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » गणपती : एक उत्सव!

गणपती : एक उत्सव!

काय म्हणता? तुमच्या घरी गणेशाची स्थापना होते का? घरी गणपती बसत नाही, असे घर फार कमी प्रमाणात असते. आमचा बंड्या नेहमीच म्हणतो, ‘‘नाटक पाहिलं नाही अन् गणपती बसविला नाही, असं घर महाराष्ट्रात सापडणं कठीण आहे…’’ म्हणजे अगदीच निरक्षर, आर्थिक दुर्बळ असेल, दुर्गम भागात राहणारे अन् तुमच्या कथित संस्कृतीशी जोडलेले नसतील, तरीही त्यांनी नाटक कुठल्या ना कुठल्या प्रकारांत पाहिले असते. डंडार, गंगासागर, खेळे… अशा लोककलांच्या माध्यमातून नाटक पाहिले जाते अन् त्याच्या सुरुवातीला नांदी असते. अगदी ठाण्याचे जवाहर-मोखाडा असो, की मग मेळघाटातले कोरकू असो, त्यांचा देव वेगळा असला, तरीही त्यात गणपती असतोच. घराण्यात गणपती नाही, असे होत नाही. आता वडिलांच्या, आजोबांच्या काळात चार-सहा सण वर्षाचे असतील, तर त्यातले नंतर भाऊ वाटून घेतात. बहुतांश घरी हे असेच असते. मोठ्याच्या वाट्याला काही सण येतातच किंवा मग सारेच सण मोठ्याच्या वाट्याला येतात अन् बाकी भाऊ त्याच्याकडे सणाला जातात. त्याचा खर्चही करतात. त्या निमित्ताने भावकी जुळून राहते. सण असतातच मातीशी जोडले जाण्यासाठी. म्हणून म्हटलं की, तुमच्या घरी गणपती बसविता का? अन् बसवीत असलात तर तयारी सुरू झाली का? बंड्याच्या घरी आता गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. त्या निमित्ताने तो आठवणीत रमला आहे. नेमक्या गणपतीच्या काळातच महालक्ष्मीचा सण येतो. त्यासाठी गावी जावेच लागते. आता इकडे गणपतीबाप्पाला असाच ठेवून गावी कसे जायचे? आता गणपती तर घरी बसविलाच पाहिजे. तसा तो गावी त्याच्या घरी बसतोच. तरीही मग इकडे शहरात त्याच्या घरी तर गणपती बसवावाच लागतो ना. गणपती ही अशी लागट गोष्ट आहे. शेजारी तो बसवीत असतील तर लेकरं म्हणतात, ‘‘बाबा आपल्या घरी गणपती का बरं नाही?’’ आता त्याला काय सांगणार? शेजारी असतो, वेटाळात सार्वजनिक बसतो अन् तरीही आम्हाला आमच्या घरी आमचा बाप्पा हवाच असतो… बरं, गणपती आपला साधा देव आहे. त्याचं असं काही कडक व्रत नसतं. म्हणून बंड्याने गावी महालक्ष्मीला जाण्याची सोय म्हणून दीड दिवसांचा गणपती सुरू केला घरी. गणेशाचे पूजाविधीही अशीकाही कर्मकांडवाली नसते. मूर्ती आणायची अन् मग तिची पूजा करायची. प्रतिष्ठापनेसाठी पुरोहित बोलवायचा. नाहीच जमले त्याचे तर मग आजकाल सीडी मिळते, ऑनलाईनदेखील पूजा असते. मागच्या वर्षी बंड्याच्या मुलाने ऑनलाईन सर्च मारला अन् युट्यूबवर गणेशाच्या स्थापनेची पूजा सुरू झाली. आजकाल सगळेच कसे रेडिमेड झाले आहे. आता यावर ‘‘एकदम असं काय रेडिमेड झालं आहे?’’ असं विचारलं तर थेट उत्तर आहे, ‘‘सगळंच!’’ आधीच्या काळी गणपती बसवायचा तर मखरापासून सारेच कसे घरी तयार करावे लागायचे… आता ‘आधीचा काळ’ या गोष्टीचा आंतरराष्ट्रीय पेटंट आमच्या अण्णांकडे आहे. ‘‘…तर! अरे, आम्ही आमच्या लहानपणी गणपतीच्या महिनाभर आधीपासून तयारीला लागायचो. कागदाची फुलं करायची, भुशाची हिरवळ करायची…’’ असे म्हणत अण्णा आता सुटले होते. आता सणवार म्हटलं की फार ताण येत नाही. तरीही गावखेड्यात महालक्ष्मीचा सण जरा जोरात असतो. कारण त्याचे नियम असतात. परंपरा असतात. त्यानुसारच ते करावे लागते. गणपतीत सजावट वगैरे करायची तर दिवाळीच्या दिव्यांच्या माळा असतातच, त्या लावायच्या. आधीच्या काळी घरच्या साड्या… घरच्या म्हणण्यापेक्षा घरचीच्या साड्या सजावटीसाठी वापरल्या जायच्या. अगदी गल्लीत बसणार्‍या मंडळातही घरोघरी काकूलोकांना त्यांच्या साड्या सजावटीसाठी मागितल्या जायच्या. त्यांची महिरप केली जायची. आता बायकांना त्यांच्या साड्या घरच्या सजावटीलाही पुरवाव्या लागायच्या अन् मंडळाच्याही. त्यातही मंडळाचे सन्मानीय पदाधिकारी जे असायचे, म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष… त्यांच्या घरून हे सजावटीचे सामान हमखास आणावेच लागायचे. साधारण संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या दिवसांत कुठल्या काकूंकडे कुठली साडी आहे अन् सजावटीसाठी कशी कामी येईल गणपतीच्या, हे हेरून ठेवले जायचे. आता मात्र असं काही होत नाही. सगळं रेडिमेड असतं. आता बाजारात गेलं की, गणपतीच्या मूर्तीसोबतच सजावटीचं समानही मिळत असते. म्हणजे गणपतीची बैठक, त्याला चार कोपर्‍यांत लावलेले दिवे, मागे महिरप थर्मोकोलची. अगदी गणपतीसमोर ठेवायची फळं, कणिस, सागाचा मोहोर, निलगिरीची पानं अन् आघाडा, केना, दूर्वा हे सारंच कसं तयार असतं. सोबत सुपार्‍या, हळकुंड, कापूर, गुलाल, बुक्का, हळद-कुंकू यांचं वेगळं पॅकेज असतं. आणखी प्रसादाचंही. म्हणजे खोबर्‍याचा कीस, बारीक केलेली साखर, त्यात बेदाणे घालून हवे असतील तर ते वेगळे… समोर दिवा लावायला वाती, त्यात तेल घालण्याचे भांडे… बर्‍याचदा तर १० दिवस वात जळत राहील अशीच वात अन् त्यात घातलेलं तेलदेखील रेडिमेड मिळतं. रोजच्या पूजेची सीडी किंवा आता तर पूजेचे अ‍ॅपही आले आहे. मोबाईलवर ते लावून द्यायचे. म्हणजे पूजा सुरू… तुमचे जसे इस्टिमेट असेल तसे हे सारेच सामान मिळते. बरं, हे सामान मागच्या वर्षी घेतलं असेल सजावटीचं, तर त्याची काळजीही ज्याच्याकडून घेतली असेल तोच घेतो. म्हणजे ते नोंद ठेवतात. आता अनेकांना ज्याच्याकडून त्यांनी मागच्या वर्षी गणपतीची मूर्ती घेतली होती त्याचा यंदा फोन आला असेल, ‘‘सर, आपण आमच्याकडून गणेशाची मूर्ती नेली होती. आता आमचे दुकान सुरू झाले आहे. आताच येऊन मूर्ती बुक करा…’’ आता सगळ्याच बाबतीत इतका प्रोफेशनॅलिझम् आला आहे. एकाला त्या दुकानदाराने फोन केल्यावर त्याला जरा गौरव वाटला. एकतर त्याने वर्षभर आपला नंबर सांभाळून ठेवला अन् पाचशे रुपयांचीच मूर्ती घेतली असूनही आपल्याला पुन्हा फोन केला… त्याने घरी जाऊन बायकोला सांगितले. ती म्हणाली, ‘‘या वर्षी आपल्याला मूर्ती घेण्याची गरज नाही. एकतर ती महाग असते अन् यंदा आपली मूर्ती आपणच घडविणार आहोत…’’ आपणच म्हणजे? मोठाच प्रश्‍न पडला. आपला गणपती आपणच कसा तयार करणार? ऑनलाईन गणपती बुकिंग ऐकले होते. तसे अ‍ॅपही आता सुरू झाल्याचे त्याने पाहिले होते. आता मात्र हे नवेच होते. बायको म्हणाली, ‘‘अहो, मी गेल्या पंधरवड्यात क्लास लावला आहे. त्यात गणपतीची मूर्ती कशी घडवायची ते शिकविले. पंधराशे रुपये घेतले त्यांनी. त्यात साहित्य त्यांचे. मी छानपैकी मूर्ती तयार केली आहे. स्वस्तातही पडली मूर्ती… पुन्हा एक गुणही शिकले मी…’’ त्या गृहस्थाला आठवले की, मागच्या वर्षी आपण पाचशे रुपयांचीच मूर्ती आणली होती. त्यावर बायको म्हणाली, ‘‘अरे, तुम्ही फारर्र्च नकारात्मक विचार करता. यंदा पंधराशे गेले, त्यात मूर्ती झाली. पण, पुढची अनेक वर्षे मीच मूर्ती करणार त्याचे काही पैसे थोडीच लागणार!’’ अर्थात, त्याच्या बायकोने शिबिरात जी मूर्ती घडविली होती त्यापेक्षा मूर्तिकाराने जी मूर्ती बिघडविली असेल ती चांगली होती…! त्याने ठरविले की, मूर्तीच्या समोर पाटी लावायची- ‘ही गणेशाची मूर्ती आहे…!’

https://tarunbharat.org/?p=61506
Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (370 of 847 articles)


तोरसेकर | गेल्या रविवारी द सन्डे गार्डियनमध्ये एक बातमी वाचायला मिळाली. दोन महिन्यात तीनचार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत ...

×