ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » गरज नव्या क्रांतीची…

गरज नव्या क्रांतीची…

दुसर्‍या महायुद्धात मदत स्वीकारूनही भारताच्या स्वातंत्र्याबाबत उदासीन धोरण स्वीकारून बसलेल्या इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी जाहीर केलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात ज्या दिवशी झाली, तोच आजचा दिवस. ९ ऑगस्ट १९४२ च्या त्या आंदोलनाची कहाणी ऐकली की, आजही अंगावर शहारे येतात. स्वातंत्र्याच्या इराद्याने निर्मित चैतन्याने जागृत झालेल्या तमाम भारतीयांनी इरेला पेटून केलेली गर्दी, अख्खे ब्रिटिश सरकार हादरावे अशी ती सिंहगर्जना, इंग्रजांनी भारत सोडून निघून जावे म्हणून देण्यात आलेला तो इशारा, स्वातंत्र्याची पहाट आता फार दूर नसल्याचा मनामनांत जागलेला दुर्दम्य विश्‍वास, त्या बळावर रस्त्यावर उतरलेली तरुणाई… सारंच अद्भुत होतं. स्वातंत्र्याचे ईप्सित गाठण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून रान पेटवायला सिद्ध झालेली तरुणाई अन् त्यांच्या पाठीशी तेवढ्याच ठामपणे उभी राहिलेली ज्येष्ठ मंडळी. नोकर्‍यांसाठी शिकणं नाही, की शिक्षण संपल्यावर नोकरीचा पाठलाग नाही. कौटुंबिक हिताची बंदिस्त चौकट नाही, की त्या चौकटीत बंदिस्त झालेली माणसं नाहीत. काहीही, कसेही करून इंग्रजांना इथून हाकलून लावायचे. बस्स! एकच ध्येय. एकच निर्धार. आज ७६ वर्षे झालीत त्या आंदोलनाला. पण, अजूनही त्याचे परिणाम मनाचा थरकाप उडविणारे होते, हे लक्षात घेतले की त्या आंदोलनाची खोली, त्याची ताकद, गांभीर्य, त्यातील लोकसहभाग, ध्येयवेडे आंदोलक… याचेही महत्त्व आपसूकच अधोरेखित होऊन जाते. ‘चले जाव’ आंदोलनाची घोषणा झाल्यानंतरही प्रत्यक्षात इंग्रज सरकार बरखास्त व्हायला नंतरची पाच वर्षे जावी लागलीत; पण म्हणून आंदोलनाची तीव्रता संपली नाही, की लोकांची गर्दी ओसरली नाही. ना, आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांवरच्या विश्‍वासावर कधी प्रश्‍नचिन्ह उभे झाले ना, लोकांच्या मनात रुजलेल्या इंग्रजांविरुद्धच्या रोषाला कुठे उणेपण आले. बहुधा म्हणूनच त्याचे फलितही त्याच तोडीचे, त्याच उंचीचे राहिले. इंग्रजांनी लाठ्या-काठ्या चालवल्या म्हणून कुणी पळ काढला नाही अन् त्यांनी फासावर लटकावले म्हणून भगतसिंग, राजगुरू, आझादांची संख्या घटली नाही… सात दशकांनंतर आजच्या पार्श्‍वभूमीवर तपासून पाहता येईल त्या आंदोलनाची खोली? पुन्हा एकदा आजमावून पाहता येईल आम्हालाच आमची ताकद? पुन्हा एकदा उभे करता येईल लोकहिताच्या कुठल्याशा मुद्यावरचे असे क्रांतिकारी आंदोलन? नोकर्‍यांच्या मागे न धावता समाज-देशासाठी म्हणून समर्पित झालेली सळसळत्या रक्ताची ध्येयवेडी तरुणाई पुन्हा एकदा बघता येईल भारतीय समूहाला? लोकांनी प्रचंड श्रद्धेने विश्‍वास ठेवावा असे नेते अन् नेत्याच्या एका शब्दाखातर घराबाहेर पडणारी जनता… हे चित्र बघण्याचे भाग्य लाभेल पुन्हा भारतीय जनतेला कधी? तेव्हा क्रांती स्वातंत्र्यासाठी झाली होती. पण, क्रांतीची गरज तर आजही संपलेली नाही. यशाच्या नावाखाली पैसा अन् स्वार्थाच्या मागे बेधुंद पळत सुटलेल्या तरुणाईला ताळ्यावर आणण्यासाठी, लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी, अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी, जाती-धर्माच्या परिघात अडकलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी, इतरांच्या विचारस्वातंत्र्याचे भान हरपलेल्यांना जागेवर आणण्यासाठी, वंचितांचे शोषण करत नावारूपाला आलेल्या श्रीमंतीला जमिनीवर आणण्यासाठी, असल्या शोषणातून बड्या झालेल्या अन् कुणाच्या तरी खांद्यावर पाय रोवून उभे झालेल्या अधिकारवाणीचा माज उतरवण्यासाठी… लोकांना शिक्षणाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी, गरीब-श्रीमंतांमधली वाढती दरी मिटवण्यासाठी, खेडी आणि शहरांमधले ‘अंतर’ कमी करण्यासाठी, शेतकरी-कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, दहशतवाद्यांविरुद्धचे लोकयुद्ध आरंभण्यासाठी, देशाच्या सीमेवरील अराजक संपविण्यासाठी, कुणाच्या तरी नादी लागून आपल्याच सरकारविरुद्ध पेटून उठलेल्या नक्षलवाद्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी, निदान नवी पिढी तरी वेल्थ, वाईन, वुमन या त्रिसूत्रात स्वत:च्या यशाचे मोजमाप करणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी, लोक देश लुटून विदेशात पळून जाणार नाहीत यासाठी, आपलेच लोक आपल्याच देशाची जाहीर रीत्या निंदा-नालस्ती करणार नाहीत यासाठी… क्रांतीची गरज तर आजही आहे. पण, क्रांतीची तर्‍हा काळानुरूप बदलली पाहिजे. तेव्हा सरकार परकीयांचे होते म्हणून आम्ही, त्यांनी लादलेल्या गोष्टी झिडकारत गेलो. त्यांनी कर लादला, आम्ही नाकारला. त्यांनी आंदोलनं चिरडून टाकण्याची षडयंत्रे रचली, आम्ही नव्याने पेटून उठलो. त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, आम्ही नव्या उमेदीने उठून उभे राहिलो. ते वाजवी होते. आवश्यकही होते. भगतसिंगांची क्रांती, गांधींची अहिंसा, सावरकरांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान, आंबेडकरांची समाजसुधारणेची प्राथमिकता… सारंच त्या त्या ठिकाणी योग्य होतं. एकटे भगतसिंग फासावर गेल्याने देश स्वतंत्र झाला नाही, हे जरी खरं असलं, तरी हे स्वातंत्र्य ‘विना खड्ग विना ढाल’ मिळाल्याचा दावाही साफ खोटा आहे. खरे एवढेच आहे की, लाभलेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीच्या नवक्रांतीची गरज आज सात दशकांनंतर नव्याने अधोरेखित होते आहे. कारण, आम्ही भारतीय लोक स्वातंत्र्याचे संदर्भच हरवून बसलो आहोत. पाश्‍चिमात्य देशांतला झगमगाट आम्हाला आमच्याही नकळत खुणावत राहतो. तिथली भौतिक प्रगती, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी म्हणून सरसावलेल्या उन्मादाचे भारी आकर्षण वाटू लागलेय् भारतीय तरुणांना. आपली संस्कृती, आपला देश, आपला समाज, इथली परंपरा, इतिहास थिटा वाटू लागणे अन् स्वत:च्या देशाचे कथित उणेपण बाहेरच्या जगापुढे ओरडून सांगण्यात वाटू लागलेले मोठेपण अस्वीकारार्ह ठरावे असेच. या प्रवृत्तीविरुद्ध उभे ठाकण्यासाठीही क्रांतीची गरज आहे. क्रांती रक्तरंजितच असली पाहिजे असे कुठे आहे? ती सकारात्मक बदलाची नांदी ठरावी, बस्स! अशा कित्येक बदलांची आज या देशाला गरज आहे. एका क्रांतीची सुरुवात १९४२ साली झाली होती. एका नवक्रांतीची सुरुवात आज करू या! हा समाज बदलण्यासाठी. देश बलशाली करण्यासाठी. भारतभूला पुन्हा एकदा परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी. पाचवीला पूजलेल्या समस्यांचा बाऊ तर सारेच करतात. पण, तसे न करता, आपण आपल्या बलस्थानांचा अभिमान बाळगण्याचा संकल्प करू या! तेव्हा फक्त इंग्रज हद्दपार केले गेले. आता भ्रष्टाचारापासून तर जातिव्यवस्थेपर्यंत आणि राजकीय नौटंकीबाजांपासून तर दहशतवाद्यांपर्यंत सर्वांनाच हद्दपार करण्याची वेळ आली आहे. सार्‍या नकारात्मक बाबी सीमापार करण्याचा विडा उचलू या. विचार आणि वर्तनाने एक निरोगी, सुदृढ समाजाच्या निर्मितीचा निर्धार करू या. चला, नवक्रांतीचा झेंडा उभारू या…

https://tarunbharat.org/?p=59420
Posted by : | on : 9 Aug 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (370 of 787 articles)


जहागीरदार | तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष मुत्तुवेल करुणानिधी यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बुधवारी श्रद्धांजली वाहिली आणि करुणानिधी यांच्या ...

×