ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » गांधी सांगा कुणाचे?

गांधी सांगा कुणाचे?

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. केवळ भारतालाच नव्हे, तर जगाला विवेकशील क्रांतीचा, अश्रूंच्या बळाचा अन् अहिंसेच्या शौर्याचा मार्ग दाखविणार्‍या या महात्म्याची सार्धशती आजपासून सुरू होते आहे. जागतिक महासत्ता होण्याचे भाकीत करण्यात आलेला बापूंचा हा देश आज एका वळणावर आहे. राजकीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा चेहरा नेमका कुठला, यासाठी वाटा चाचपडतो आहे. या देशाला जेव्हा जेव्हा प्रश्‍न पडले आहेत ते, राष्ट्र म्हणून असो की व्यक्ती म्हणून असो, त्या त्या वेळी हा महापुरुष वाट दाखवायला समोर उभा असतो. हा देश खर्‍या अर्थाने त्यांना कळला होता. त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व आले तेव्हा ते या चळवळीत तसे तरुण होते. चळवळ हा शब्द मुद्दामच वापरतो आहोत. कारण त्या वेळी काँग्रेस ही काही राजकीय पार्टी नव्हती. सत्तेच्या राजकारणासाठी त्यांच्या काही नीती नव्हत्या. साधारण १९३० च्या काळात प्रांतिक सरकारात स्वदेशी लोकप्रतिनिधी असले पाहिजेत म्हणून निवडणुकांना सामोरे जाणे सुरू झाले, तेव्हाही चळवळ हे स्वरूप काही बदलले नव्हते. कारण निवडणुकांच्या प्रक्रियेत उतरण्यामागचा उद्देशदेखील काही सत्ताप्राप्ती हा नव्हता. स्वराज्याकडे जाण्याचे विविध मार्ग होते, त्यातला तोही एक मार्ग होता. आपण विश्‍वस्त म्हणून अधिकारात असताना वावरले पाहिजे, असे बापू म्हणायचे… तर बापूजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्याआधी सारा देश पालथा घातलेला हा एकमेव माणूस होता! हा देश चाळीस हजार खेड्यांत वास करतो, हे त्यांना कळले होते आणि म्हणून मग त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला ग्रामस्वराज्याचे अधिष्ठान दिले. त्यांच्या एका हाकेवर सारा देश रस्त्यावर उतरत होता, छातीवर गोळ्या झेलायलाही तयार होता, हा चमत्कार केवळ त्यांचे विचार खेड्यापर्यंत पोहोचलेले होते म्हणूनच घडायचा. काँग्रेसने मात्र स्वातंत्र्य आणि स्वतंत्र देशाची सत्ता हाती आल्यावर त्यांचा हात आणि साथ सोडला. आता त्यांच्या सार्धशतीच्या निमित्ताने अन् समोर देशाच्या सार्वत्रिक निवडणुका दिसत असल्याने काँग्रेसला पुन्हा बापूजींचे महत्त्व जाणवू लागले आहे. या महात्म्याच्या वापराचा पेटंट आपल्याकडे असल्यागत काँग्रेस हा राजकीय पक्ष वावरत आला आहे. त्यांच्या विचारांवर चालण्याचे कर्तव्य मात्र नेहरूंच्या काळातच बाजूला टाकण्यात आले. ज्यांचे कपडेही परीटघडीचे करण्यासाठी पॅरिसला जायचे, असे अत्यंत कौतुकाने सांगितले जाते ते बापूजींच्या मार्गावर कसे चालणार? पंडित नेहरूंनी भांडवलशाही समाजवाद नावाची विचित्र अशी व्यवस्था स्वीकारली. कुठल्याही देशासाठी अर्थविचार महत्त्वाचा असतो. तो पायाभूत विचारच चुकीच्या मूल्यांवर आधारलेला होता, हे आता दिसते आहे. त्याचे परिणामही आज देश भोगतो आहे. नेहरूंच्या त्या धोरणामुळे देशात क्रोनी कॅपिटॅलिस्ट तयार झाले. श्रीमंत आणि गरीब हे दोन वर्ग तयार झाले. त्यांच्यातली दरी वाढत गेली. मध्यमवर्ग तयार झाला आणि भावनेच्या, जातीच्या, धर्माच्या आधारावरचे राजकारण सुरू झाले. कारण एकदा तुम्ही उतरणीच्या वाटेला लागलात, की तुम्हाला तुमची गती रोखता येत नाही. तोल सावरता येत नाही अन् मग पडलात तरी उडी मारली, असा आव आणावा लागतो. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर सहा दशकांच्या सत्तेत हेच केले. महात्मा गांधी म्हणायचे की, एक गाव हेच एक राष्ट्र असते. त्यांना कुठल्याही शक्तीचे, अधिकाराचे, ऊर्जेचे केंद्रीकरण अपेक्षित नव्हते. लोकशाही देशात सर्वसत्ताधीश असे कुणीच नसते/नसावे, यासाठी एक ग्राम म्हणजे स्वतंत्र देशच आहे, अशी व्यवस्था निर्माण केली जावी, यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. पंडित नेहरूंनी त्याला तिलांजली दिली. महात्मा गांधींचा विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिकता यांना विरोध नव्हता. तो तसा असल्याची प्रतिमाही काँग्रेसनेच नेहरूंची वाट योग्य असल्याचा पुरावा म्हणून उभी केली. मात्र, त्यांना या देशातली जनशक्ती, मनुष्यबळ कर्मयोगी असावे यासाठी, गीतेतला कर्मयोग या देशाच्या नागरिकांच्या प्राणाचा एक भाग असावा, असे वाटत होते आणि काँग्रेसने नेहमीच मतांच्या अनुनयी राजकारणासाठी गीतेला एका धर्माचा ग्रंथ म्हणून केवळ संभावना नाही तर अवहेलना आणि हेटाळणी केली. बापूजींचा मोठ्या यंत्रांना विरोध होता, कारण त्यातून माणसांची यंत्रशरणता त्यांच्या तेव्हाच लक्षात आली होती. त्यातून माणसांची कर्मश्रद्धा कमी होईल, ते आळशी बनतील आणि मग त्यांचा मेंदूही काम करेनासा होईल, असे बापूजींचे मत होते. यंत्र, मोठी धरणे यामुळे ऊर्जेचे, जीवनस्रोतांचे केंद्रीकरण होते, असे त्यांचे मत होते. खेडी स्वावलंबी असली पाहिजेत, आत्मनिर्भर असली पाहिजेत यासाठी खेड्याच्या गरजांचे नियोजन त्याच पातळीवर व्हायला हवे. त्या गावाला किती अन्न लागते, किती पाण्याची गरज आहे, विजेची किती गरज आहे, हे ओळखून त्या गावाने ती त्यांना उपलब्ध संसाधनातून निर्माण करावी. त्याचा वापर करावा अन् उरलेले देशाला द्यावे, असे ग्रामविकासाचे सूत्र त्यांनी मांडले होते. आरोग्य, शिक्षण हे विषय देशाचे असू शकतात, मात्र, त्यातही स्थानिकांच्या गरजांचा विचार करूनच त्याची नीती ठरविली जावी, तशी व्यवस्था निर्माण केली जावी, असे त्यांना वाटत होते. ‘‘दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार!’’ हा नारा आता दिला गेला, मात्र त्यामागची प्रेरणा महात्मा गांधीच आहेत. दीनदयालजी उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद आणि गांधीजींचे ग्रामोदयाचे विचार यांच्यात विलक्षण साम्य आहे. काँग्रसेने मात्र महात्माजींचा वापर केवळ नोट आणि व्होट यावरच आणि यासाठीच केला. मधल्या काळात बापूजींचे इलेक्टोरियल मेरिट कमी झाले असे वाटल्यावर, त्यांचा नामोल्लेख करण्यासही काँग्रेसचे नेते विसरले होते. काँग्रेसचे ‘गांधी’ वेगळे झाले. आता विरोधात बसण्याची वेळ आली आणि दूरवर सत्ता पुन्हा प्राप्त करता येईल याची शक्यताही दिसत नाही, म्हणून व्याकुळ काँग्रेसने आता बापूजींच्या सार्धशतीच्या निमित्ताने पुन्हा बापूमाळ हाती घेण्याचा आटापिटा सुरू केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी महात्मा गांधींना आपले मानले? असे राहुल गांधी विचारत आहेत. त्यांना संघही कळला नाही अन् महात्मा गांधीही! वर्ध्याच्या मुक्कामात संघाचे शिबिर अन् त्यातही शिस्त पाहून, कुठलेही बळ नसताना हे सारे संघटन इतके शिस्तबद्ध कसे चालविता, हे समजून घ्यायला महात्माजींना संघाच्या शिबिरात जायला परकेपणा वाटला नव्हता. आता मात्र काँग्रेससाठी सेवाग्रामचा आश्रमच परका झालेला आहे. बापूजी आमचे आहेत, हे ओरडून सांगण्याची वेळ या पक्षावर यावी, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कुठले? त्यांचे स्वदेशीचे व्रत चालविणार्‍या रा. स्व. संघाला मात्र ही मंडळी सवाल करतात. वनवासी कल्याण आश्रम आणि इतर चळवळींच्या माध्यमातून गिरिकंदरात असणार्‍या गावखेड्यांपर्यंत, वंचितांपर्यंत; ते मतदार नाही, माणसे आहेत, या भावाने पोहोचणारा संघ गांधींजींना अपेक्षित असलेलेच कार्य करीत आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन केले पाहिजे, असे म्हणणारे गांधी केवळ काँग्रेसचे कसे असतील?

http://tarunbharat.org/?p=64813
Posted by : | on : 2 Oct 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (32 of 669 articles)


जोशी | जैवइंधनाच्या वापरातून प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या विमानोड्डाणासाठी अलीकडेच जेट्रोफापासून तयार केलेल्या इंधनाचा वापर करण्यात आला. आपल्या देशात अशा ...

×