ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » चंद्राबाबूंची अगतिकता व लाथाळ्या!

चंद्राबाबूंची अगतिकता व लाथाळ्या!

तेलुगू देसम्चे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी, काँग्रेस पक्षाशी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांनी ही घोषणा केली. काँग्रेसच्या दृष्टीने ही एक दिलासादायक घटना असली, तरी काँग्रेसशी हातमिळवणी आम्हाला अपरिहार्य होती, असे जे उद्गार चंद्राबाबू यांनी काढले आहेत, त्यातून अनेक अर्थ ध्वनित होतात. म्हणजे काँग्रेसशी जो घरोबा केला तो सुखासुखी केलेला नाही. अपरिहार्यता असल्यामुळे केला, असे त्यांना सुचवायचे आहे. युती करताना प्रारंभीच जर मनात अशी भावना असेल तर या युतीचे भविष्य काय असणार, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याच्या जिद्दीने पछाडलेल्या काँग्रेसच्या कल्पनेतील महागठबंधनातून एकेक पक्ष बाहेर पडत असताना, तसेच त्यांचा मैत्रीचा हात इतर पक्ष झिडकारत असताना, त्यांना एक सोबती मिळत आहे, ही काँग्रेसच्या दृष्टीने चांगली बाब आहे. परंतु, अशी कुठली अपरिहार्यता चंद्राबाबूंना होती, याचाही विचार केला पाहिजे. २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू भाजपासोबत होते. मग या चार वर्षांत असे काय घडले की, त्यांना भाजपा नकोशी वाटू लागली? यासाठी थोडे मागे जावे लागेल. आंध्रप्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगणा व आंध्रप्रदेश असे दोन राज्य निर्माण झाल्यावर, तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाने अन्य पक्षांना राज्यात काही जागाच ठेवली नाही. तिकडे आंध्रप्रदेशात चंद्राबाबूंचा तेलुगू देसम् पक्ष मजबूत होता आणि त्यामुळेच त्यांना या नव्या राज्याची सत्ता मिळाली. परंतु, आंध्रप्रदेशात आणखी एक पक्ष जनतेच्या मनात घर करून होता व तो म्हणजे जगनमोहन रेड्डी यांचा वायआरएस काँग्रेस पक्ष. आज हा पक्ष विरोधी बाकांवर असला, तरी गेल्या चार वर्षांत जगनमोहन रेड्डी यांनी संपूर्ण आंध्रप्रदेश अक्षरश: पिंजून काढला आहे. जगनमोहन यांचे वडील राजशेखर रेड्डी यांनी चंद्राबाबू यांची मजबूत वाटणारी अनेक वर्षांची राजसत्ता उलथवून स्वत: मुख्यमंत्री बनले होते. राजशेखर रेड्डी हे लोकप्रिय होते. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा जगनमोहन यांना होत आहे. जगनमोहन यांच्या लोकप्रियतेने चंद्राबाबू धास्तावले. पुढील निवडणुकीत आपले काही खरे नाही, याची त्यांना जाणीव झाली आणि म्हणून लोकांची सहानुभूती आपल्याकडे वळावी यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे, आंध्रप्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली. विशेष दर्जा मिळाल्यास अनेक लाभ असतात. मुख्य म्हणजे केंद्र सरकारच्या लोककल्याणाच्या ज्या योजना असतात, त्यात राज्याच्या हिश्श्यात सूट मिळते, तसेच केंद्राकडून अधिक निधी आवंटित होत असतो. परंतु, मोदी यांच्या केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, आता यापुढे कुठल्याही राज्याला विशेष दर्जा न देण्याची शिफारस स्वीकारली होती. त्यामुळे चंद्राबाबूंची ही मागणी मान्य होणे शक्य नव्हते. तिकडे जगनमोहन रेड्डी यांनी मात्र विशेष दर्जाची मागणी लावून धरत, जनतेला आपल्या बाजूने वळविले आणि चंद्राबाबूंना कोंडीत धरले. ही कोंडी फोडण्यासाठी चंद्राबाबूंनी, विशेष दर्जाची मागणी मान्य न झाल्यास रालोआमधून बाहेर पडण्याची धमकी दिली. मोदी त्याला बधले नाहीत. शेवटी तेलुगू देसम् पार्टीने केंद्र सरकारवर अविश्‍वासाचा ठराव आणला व तो फेटाळला गेला. अशा रीतीने चंद्राबाबूंनी रालोआत परतीचे मार्ग बंद केले. दुसरा मुद्दा म्हणजे तेलुगू देसम् पक्षाची स्थापनाच मुळी काँग्रेसविरोधावर झाली होती. स्थापनेपासूनच या पक्षाने सतत काँग्रेसचाच विरोध केला आहे. भाजपाशी युती नसताना हा पक्ष तिसर्‍या आघाडीत सहभागी होता, पण कधीही काँग्रेससोबत नव्हता. त्यामुळे आता या पक्षाचे कार्यकर्ते, मतदार व नेते काँग्रेस पक्षाशी कसे जुळवून घेतात, हे बघायचे. म्हणून, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी काँग्रेसकडे जावे लागणे, ही अगतिकता चंद्राबाबू यांच्या वक्तव्यातून बाहेर पडली. अगतिकतेने निर्माण झालेली मैत्री किती लाभदायक ठरते, हे आता निवडणुकीनंतरच उघड होईल. एकेकाळी बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या आंध्रप्रदेशात आज काँग्रेसची स्थिती जवळपास शून्य आहे. अशात तेलुगू देसम् पक्षाशी युती होण्याचा आनंद मात्र काँग्रेस पक्षाला अधिक काळ उपभोगता येणार नाही असे दिसते. कारण, मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षात उठलेले वादळ. पंधरा वर्षांपासून मध्यप्रदेशात भाजपाची सत्ता आहे. यावेळी कुठल्याही परिस्थितीत हे राज्य भाजपाकडून हिसकायचे, या जिद्दीने काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. त्यासाठी त्याने मोर्चेबांधणीही केली. परंतु, या मोर्चेबांधणीला तडे पडण्यास सुरवात झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसकडे तीन दिग्गज नेते आहेत- कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह. या तिघांमधील संघर्ष जाहीर आहे. राहुल गांधींनी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची धुरा कमलनाथ व शिंदे यांच्याकडे दिली आणि दिग्विजय सिंह यांना बाजूला सारले. पंधरा वर्षांपूर्वी दिग्विजय सिंहच मुख्यमंत्री होते. त्यांची जनमानसात प्रतिमा चांगली नसली, तरी त्यांचा एक फार मोठा समर्थक गट काँग्रेस पक्षात आहे. तिकीटवाटपात आपल्या समर्थकांना निवडून वगळण्यात येत असल्याचे लक्षात येताच, दिग्विजय सिंह संतापले. त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. अशातच राहुल गांधी मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर आले असताना, तिकीटवाटपाचा मुद्दा त्यांच्या उपस्थितीत निघाला. तेव्हा शिंदे आणि दिग्विजय सिंह यांचे चांगलेच कडाक्याचे भांडण झाले म्हणतात आणि त्यामुळे वैतागून राहुल गांधी बैठकीतून निघून गेल्याचे वृत्त आहे. भाजपासारख्या संघटनाधारित पक्षाला पराभूत करण्यासाठी पक्ष किती मजबूत व एकरस असायला हवा, याची जाण काँग्रेसला आहे की नाही माहीत नाही. परंतु, सध्याचे चित्र तरी फारसे आशादायक दिसत नाही. शिंदे आणि कमलनाथ यांच्यातही समन्वय नाही. ते परस्परांचे पक्षांतर्गत विरोधक आहेत. निवडणुकीत आतापर्यंत अजेय ठरलेल्या कमलनाथ यांना काँग्रेसने जवळजवळ वाळीतच टाकले होते. आता त्यांची आठवण झाली आहे. ही बाब शिंदे व कमलनाथ दोघेही जाणून आहेत. हायकमांडने या दोघांमध्ये तह घडवून आणला असला, तरी त्यांचे मनोमिलन झाले की नाही, याची शंकाच आहे. हायकमांड आता दिग्विजय सिंह यांची कशी समजूत घालते ते बघायचे. परंतु, कार्यकर्ते व मतदार यांना मात्र जो संदेश जायचा तो गेलाच. एकूणच काय, मध्यप्रदेशात भाजपाला पराभूत करण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या मार्गात अडथळे निर्माण व्हायला सुरवात झाली आहे…

https://tarunbharat.org/?p=66968
Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (145 of 724 articles)


कुहीकर | लडखडाई बुढियाको उठाने बाजार मे कोई ना झुका; गोरीका झुमका क्या गिरा पुरा बाजार घुटनोंपे आ गया...! हीच ...

×