आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

नवी दिल्ली, १९ जानेवारी – गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन…

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

►ए. राजा यांच्या पुस्तकातील आरोप, नवी दिल्ली, १९ जानेवारी…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

नवी दिल्ली, १९ जानेवारी – सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्यांचे…

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

दिल्ली, १९ जानेवारी – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील…

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

न्यू यॉर्क, १९ जानेवारी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

►पारा उणे ६७ अंश सेल्सियसपर्यंत, मॉस्को, १८ जानेवारी –…

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

•► ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे वणीत थाटात उद्घाटन,…

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

ग्रामीण प्रतिनिधी, पंढरपूर, १८ जानेवारी – समाजाच्या परिवर्तनासाठी सर्वांचा…

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

►राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, १७ जानेवारी – राज्यातील अनाथ…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय » चिनी मालावरील बहिष्काराचा पोटशूळ!

चिनी मालावरील बहिष्काराचा पोटशूळ!

चौफेर : सुनील कुहीकर

येत्या दिवाळीत, बाजारात उपलब्ध होणार्‍या चिनी वस्तू नाकारत, आपल्या देशातल्या लोकांनी तयार केलेला माल विकत घ्या, एवढे नुसते आवाहनच केले, तर पाऽऽर हादरायची वेळ आलीय् त्यांच्यावर. सीमेपलीकडे कमी अन् अलीकडच्यांनाच पोटशूळ उठलाय् त्यामुळे. असं कुठे शक्य आहे का? चीनला विरोध करणं इतकं सोपं आहे का? दिवाळीत चार फटाके, एखादी दिव्यांची माळ विकत घेतली नाही तर काय आंतरराष्ट्रीय स्तरावर पाडाव करणार आहोत का आम्ही चीनचा…? सारी जमातच कथित हुऽऽशार लोकांची. त्यामुळे प्रश्‍नांची बांडगुळंही त्यांच्याच झोळीत. जगाच्या सीमा पार करून श्रद्धास्थानं विराजमान झालीत त्यांची. त्यामुळे भारतासारख्या देशात कुणी देशभक्तीची भाषा बोलू लागलं, इतर कुठल्याही देशाला धडा शिकवण्याची भावना व्यक्त झाली की, त्याची खिल्ली उडविण्याचा विडा उचलून बसलेले लोक शिवीगाळ करायला पटापट उड्या टाकतात मैदानात. दहशतवादी मसूद अजहर प्रकरण असो, की मग ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकिस्तानच्या पारड्यात आपले मत टाकण्याच्या भूमिकेमुळे भारतात व्यक्त होऊ लागलेल्या चीनविरोधातील संतप्त भावना, हे पडसाद आहेत. नंतरच्या काळात बोलली जाऊ लागलेली चिनी वस्तूंवरील बहिष्काराची भाषाही त्याचाच परिपाक आहे.
‘‘हो! मला घ्यायचाय् एक कॉम्प्युटर. पूर्ण भारतीय बनावटीचा. सीपीयूपासून तर जीपीयूपर्यंत सारे भारतीय बनावटीचे हवे? सांगा कुठे मिळेल असा कॉम्प्युटर?’’
स्वदेशी आंदोलनाची भाषा कुणी बोलू लागला की, असले प्रश्‍न विचारणारे शेकडो लोक इथे गर्दीतून डोके वर काढतात. हात उंच करून सवाल करतात. त्यांचा प्रश्‍न चुकीचा नसला, तरी नेमका मुहूर्त साधून असले प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांना मुळात त्या आंदोलनामागील भूमिका आणि भावनाच समजलेली नसते. या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात लोकमान्य टिळकांपासून तर महात्मा गांधींपर्यंत सर्वांनीच विदेशी कपड्यांची होळी करण्याचे आंदोलन उभारले. त्या आंदोलनाने काही इंग्लंडमधले कपड्यांचे कारखाने बंद पडले नाहीत. तशी कुणाची मनीषाही नव्हती. त्यांचे कपडे नाकारून स्वत: तयार केलेल्या खादीचे जाडेभरडे कपडे घालण्याचा आनंद लुटणार्‍यांच्या मनातील देशभक्तीची भावना काही इतकीही तकलादू नव्हती. असे करून जो संदेश त्यावेळच्या आंदोलनकर्त्यांनी इंग्रजी शासनाला दिला, त्या तर्‍हेला तोड कुठाय्?  संगणकच कशाला, इतरही अनेक गोष्टी आज चीनकडून घेतो आम्ही. पण, चीन आम्हाला देतो ते ‘प्रॉडक्ट’ असते, ‘टेक्नॉलॉजी’ नाही. तंत्रज्ञान तो देश आम्हाला देणारही नाही. कारण त्याला प्रॉडक्ट विकण्यात स्वारस्य आहे. इतक्या वर्षांत संगणकाचे सुटे भाग तयार करण्याचे तंत्रज्ञान आम्ही स्वत: विकसित करू शकलो नाही किंवा दुसर्‍या कुठल्या देशाकडून ते घेण्याची गरजही आम्हाला वाटली नाही, हा आमच्या देशातल्या कालपर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीच्या अभावाचा दोष आहे. आता आमचा देश ‘मेक इन इंडिया’ची भाषा बोलू लागला, तर चिनी मंडळी त्याची खिल्ली उडवताहेत. उडवणारच! ती घोषणा कशी फसवी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न ते करताहेत. करणारच! कारण त्यांनी, त्यांचे तंत्रज्ञान वापरून, त्यांच्या माणसांच्या मदतीने, त्यांच्या देशात तयार केलेली उत्पादने, मोजल्या गेलेल्या पैशाच्या मोबदल्यात आम्हाला देण्याची सध्याची रीत ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेत बाद ठरणार आहे. इथून पुढे त्यांना त्यांचा कारखाना भारतात उभारावा लागेल. त्यांचे तंत्रज्ञान घेऊन इथे यावे लागेल. त्या प्रक्रियेत सहभागी होणारी माणसं आमची असतील… मग का नाही खिल्ली उडवणार चीन आमच्या कल्पनेची?
हे खरं आहे की, भारतीय समाजजीवनात लागणार्‍या कित्येक गोष्टींसाठी आज आम्ही चीनवर अवलंबून आहोत. एका आकडेवारीनुसार, एकूण ६०० प्रकारच्या वस्तू जगभरातल्या सुमारे १४० देशांकडून भारत आयात करतो. आयात होणार्‍या एकूण वस्तूंपैकी तब्बल सोळा टक्के वस्तूंचा पुरवठादार एकटा चीन आहे. विविध वस्तूंची आयात करण्यासाठी अमेरिका, युनायटेड अरब अमिरात आणि सौदी अरेबियाला दिल्या जाणार्‍या एकूण रकमेएवढा पैसा भारत दरवर्षी एकट्या चीनला देतो. चीनकडून आयात होणार्‍या वस्तूंचे प्रमाण सतत वाढते आहे. याच्या नेमकी उलट परिस्थिती भारताद्वारे चीनला निर्यात होणार्‍या वस्तूंबाबतची आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण थेट अर्ध्यावर आले आहे. आम्हाला लागणार्‍या टेलिकॉम, संगणक, विद्युत उपकरणं, इलेक्ट्रॅनिक साहित्याची गरज ओळखून त्या देशाने त्या वस्तूंची निर्मिती योजनापूर्वक आरंभली. या वस्तूंचा एक पुरवठादार म्हणून त्यांनी भारतीय बाजारपेठेत स्वत:ची गरज निर्माण करून ठेवली आहे आज. या उलट भारतातून ज्या वस्तू चीनला निर्यात होतात, त्या उद्या आम्ही नाही पाठवल्या, तरी त्यांचे फारसे काही बिघडणार नाही, इतक्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणार्‍या त्या गोष्टी आहेत. तंत्रज्ञानाचे महत्त्व ज्यांना कळले ते पुढे गेले. सूर्याची पूजा, उपासना करणारा देश आमचा. पण, सौरऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित करण्याची आणि सार्‍या जगाला ते विकण्याची कल्पना आमच्या मनाला फारशी शिवत नाही, हे वास्तवही ध्यानात ठेवले पाहिजे ना आम्ही!
कमी दर, मोठ्या प्रमाणातील सहज उपलब्धता अशा अनेक कारणांमुळे चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणातील मागणी भारतात आहे. कमी दरात चैनीच्या वस्तू उपलब्ध होत असल्याने त्याला मागणीही भरपूर आहे. कमी दरातील उत्तमोत्तम वस्तू विकत घेण्याच्या ग्राहकांच्या हक्कांबाबत बोलणारे लोकही कमी नाहीत इथे. स्वदेशीची, त्यातही चीनच्या विरोधातली भाषा बोलणार्‍यांच्या विरोधात कंबर कसून उभे राहण्याच्या नादात आता चिनी वस्तू विकणार्‍यांचे कसे होईल, या चिंतेचा भावनिक व्यापार मांडला जाऊ लागला आहे काही लोकांकडून. इथे मुळातच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की चिनी मालावरील बहिष्काराची भाषा बोलणार्‍यांना या वस्तुस्थितीचा अंदाज नाही, असे थोडीच आहे? संपूर्ण विश्‍वाच्या कल्याणाची कामना करणार्‍या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे लोक जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रसंगी एखाद्या देशाविरुद्ध एवढी कठोर भूमिका मांडतात, तेव्हा त्यामागील भावनेची अन् संतापाची तीव्रताही लक्षात घेतली पाहिजे सर्वांनी. ज्याविरुद्ध लढता लढता आम्हाला नाकीनऊ येताहेत, त्या दहशतवादाची पाठराखण पाकिस्तान करतो आणि शेजारचा चीन आमच्या नाकावर टिच्चून पाकिस्तानच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो? कशासाठी? तर पाकिस्तानातील एका विमानतळाचा वापर करायला त्या देशाकडून परवानगी मिळणार असल्याने आणि तिथून जवळ असलेल्या समुद्रीकिनार्‍यावरून तेलाचा व्यापार करणे सोयीचे होणार असते म्हणून? या प्रकरणात साधा निषेधही नोंदवायचा नाही भारताने? भारताची भूमिका काय फक्त बाजारपेठेपुरतीच मर्यादित राहणार आहे का जागतिक पातळीवर? एक देश म्हणून, एक समाज म्हणून कधीच अभिव्यक्त होणार नाही आम्ही? ज्याची उत्पादने प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या देशात विकली जातात, त्या देशाने उद्या कठोर पावलं उचलली, तर काय परिस्थिती निर्माण होईल, याची कल्पना तरी येऊ द्या त्यांना. हादरू द्या त्यांनाही जरासे. इथे तर आम्हीच कांगावा करत सुटलोय्.
आणि इथून पुढे स्वबळाची, स्वदेशीची भाषा बोलायला हवी ना सर्वांनी. हे खरंच की, तंत्रज्ञानाबाबतची परिस्थिती काही एका रात्रीतून बदलणार नाही. त्याबाबत निदान पुढची काही वर्षे आम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहावे लागेल. मान्य. पण, इथे तर दूधही चीनमधून येते! दुधापासून तयार होणारे पदार्थही येतात तिकडून. त्याचे काय करायचे? त्याचेही समर्थनच होणार असेल, तर मग आमच्या लायकीवर इतर कुणी कशाला प्रश्‍नचिन्ह उभे करायला हवे?

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under उपलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उपलेख, संपादकीय (888 of 891 articles)


‘टग्या’ हा शब्द त्यांच्यासाठी आम्ही योजलेला नाही. तो त्यांनीच स्वतःसाठी निवडलेला आहे! साधारणतः जगरहाटीची, सभ्यतेची, संयमाची कुठलीच मर्यादा न पाळता ...