ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » चैन पडेना आम्हाला…

चैन पडेना आम्हाला…

दहा दिवसांत बघता बघता गणपती आले अन् गेलेही. त्यांना निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या, असे आवतन त्यांना आपण देऊनही टाकले आहे. ‘चैन पडेना आम्हाला’ असेही आपण त्याला म्हणजे बाप्पाला सांगत असतो. नंतर मात्र नवरात्र येते. दिवाळी येते अन् चैन पडेना म्हणणारे चैन करत असतात. बाप्पाचा उत्सव गेला असला, सरला असला तरीही उत्साह मात्र संपलेला नसतो. तो कधी संपतही नाही. तसा बाप्पाचाही ‘सीझन-टू’ येतोच. म्हणजे या दहा दिवसांत गणपतीची प्रतिष्ठापना करता आली नाही, सोप्या भाषेत या दिवसांत गणपती मांडता आला नाही तर लोक अखरपक्या गणपती मांडतात. आता पितृपक्ष पंधरवडा सुरू होईल. आता पितृपक्ष हा कुठला राजकीय पक्ष नाही. हेही खरेच की लोक आपल्या पक्षाला आपल्या बापाचा पक्ष समजतात. तशीच वागणूक ठेवतात. म्हणून मग ते नेहमीच पितृपक्ष घेतात. म्हणजे आपल्या बापाची बाजू घेतात अन् बाप राजकारणांत प्रतिष्ठापित झाला की तो मग आपल्या पक्षाला पोराचा पक्ष करून टाकत असतो. म्हणजे बाप विसर्जित होण्याची वेळ आली की त्या आधीच तो आपल्या मुलाला आपल्या मतदारसंघात आमदार-खासदार करत असतो. दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले असतील तर त्यांना पंचायत समितीपासून विधानसभेपर्यंत अ‍ॅडजेस्ट करत असतो. त्यामुळे राजकारणात पितृपंधरवडा सतत सुरू असतोच… तर आता पितृपक्षांत गणपती मांडण्याची पद्धत आहे. त्याला अखरपक्या असे म्हणतात. विदर्भात ‘हाडपक्या’ असेही बोलभाषेत म्हणतात. त्यानंतर दुर्गादेवी येते. ते झाले की कोजागिरीच्या नवरात्रांत सरस्वतीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मीची स्थापना नाही; पण घरी मूर्ती आणून तिची पूजा करण्याची पद्धत आहेच. गणपती विसर्जित केला जातो; दुर्गाही विसर्जित केली जाते, सरस्वतीचेही विसर्जन होते. मात्र लक्ष्मीचे विसर्जन होत नाही. ती मग भादव्यात येणारी महालक्ष्मी असो की दिवाळीला पूजन केली जाणारी लक्ष्मी असो. तिचे विसर्जन केले जात नाही. त्या मूर्ती किंवा त्याचे सामान नीट सांभाळून ठेवून दिले जाते. लक्ष्मी नाराज होऊ नये यासाठी खास काळजी आपण घेतच असतो. ती मग गृहलक्ष्मी का असेना…. म्हणून लक्ष्मीचे विसर्जन करत नाही. उलट तिचा पाय मुडपून ती घराबाहेर पडू नये, याची काळजी घेतो. म्हणून बुद्धीची देवता असलेल्या गणपतीचे विसर्जन करतो. पुढच्या वर्षी या, असे म्हणतो. बुद्धीची गरज अशी कधीकधीच पडत असते. पैशांची गरज रोजच असते. पैसा असला की बुद्धी खरेदीही करता येत असते… तर माणूस बुद्धी अन् बद्धिदाता यांना विसर्जित करतो. आक्रमकता, कर्मशूरता, कर्म यांनाही विसर्जित करतो, म्हणूनच पराक्रम गाजवायला निघालेल्या दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन करत असतो. विद्येची देवता, कलांची जननी, विवेक बुद्धीची दात्री असलेल्या माता सरस्वतीची स्थापना करतो अन् मग तिचेही विसर्जन करतो. मात्र, लक्ष्मीची नाही करत. तिचे विसर्जन झाले की आपल्याला आपणच डुबलो, असे वाटते. त्यावरूनच हा वाक्प्रयोग आला असेल. कुणाचे पैसे हातचे गेले किंवा आर्थिक नुकसान झाले तर ‘बुडालो यार आरपार’ असे म्हणतात लोक. किंवा कुणाला फटका बसला आर्थिक तर लोकही अत्यंत कनवाळूपणे, ‘‘अरेरे! बिचार्‍याने मोठ्या आशेने दुकान टाकले अन् बुडाला बेटा त्यात…’’ असे म्हणतो. माणसं धंद्यात बुडतात, नोकरीत बुडतात, व्यवसायात बुडतात म्हणजे काय? तर त्यांच्या हातची लक्ष्मी जात असते. त्यांच्याकडे पैसा राहत नाही. म्हणून त्यांना बुडणे म्हणतात. याचा अर्थ माणसे लक्ष्मी गेली की विसर्जित होतात अन् जेव्हा त्यांच्याकडे लक्ष्मी असते तेव्हा ते बुद्धी, कर्म, विवेक यांचे विसर्जन करीत असतात. जगातल्या सार्‍या गोष्टी विकत घेता येतात, असे माणसांना वाटते. असे वाटणारा जो कुणी असतो त्यालाच माणूस म्हणतात. त्या अर्थाने आपण सारीच ‘माणसे’ आहोत! आता लक्ष्मीचे हे महत्त्व म्हणा किंवा स्तोम म्हणा, आपण मांडले आहे असे अजिबात नाही. तिचा महिमा अपरंपार आहेच. नाहीतर आता बिग बॉस सीझन टू मध्ये भजन सम्राटाने नसतेच चाळे केले नसते. आता त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र त्यांनी भजने म्हटलीत तशाच गज़लही म्हटल्या. त्या काळांत गज़ल म्हणणारे खूप होते. भजनाची परंपरा मंदिरात, घरीही अजूनही सुरूच आहे. पण, ती श्रद्धाभावाने. पण, काही लोकांनी भजनाचेही अलीकडे मार्केटिंंग करून टाकले आहे. मार्केटला आवाज पुरविणारे आधी कमी होते. त्यामुळे त्या काळांत त्यांनी भजनाची दुकानदारी सांभाळली. दुकानदारीच ती. बारशाचे सामान विकण्याचे दुकान असो किंवा मयताचे सामान विकण्याचे… धंदा हा धंदा असतो. तसेच त्यांचेही भजन म्हणोत की गज़ल… प्रत्येक साँग (यानेकी गाणे) हे त्यांच्यासाठी आयटेम असतेच आणि त्यांनी पैशांसाठीच हे साँग… सॉरी सोंग घेतलेले असते. गज़ल मध्ये त्यांचे भजन जमले नाही, सिनेमात त्यांना गाणी मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांनी भजनांत भजन जमविले. आता माणसाला एकदा असे भजन जमविण्याची सवय लागली की माणूस जमेल तिथे अन् जमेल तसे भजन जमवित असतो. त्याला तीच सवय लागते. मग ज्याची कारकीर्दच भजन गाण्यात गेली त्याने असे भजन जमविले तर त्यात बिघडले कुठे? आमचा बंड्या सांगत असतो त्यामुळे मला विदर्भाच्या भाषेची बरीच जाण आली आहे. त्याच्या बोलण्यात मला कळले आहे की, ‘भजन जमविणे’ हा तिकडचा वाक्प्रचार आहे. म्हणजे कुणी आपला मतलब साधून घेतला किंवा अनेकांना हवी असलेली गोष्ट ज्याने अडचणीतही साध्य करून घेतली, चलाखीने आपला मतलब साध्य करून घेतला त्याला लोक ‘हं, मस्त भजन जमविलं ना तू’ असं म्हणतात. पंगतीतही यजमान पाव्हण्याला विचारतो वर्‍हाडांत, ‘‘ज्यमलं ना भजन?’’, तसं या भजन गायकाने आपले भजन जमवून घेतले आहे. त्यामुळे आता त्याला बिग बॉसच्या घरांत एन्ट्री मिळाली आहे. नुसतीच नाही तर सर्वाधिक मानधही मिळाले आहे. आता लोक त्यावरून त्याला नावेबोटे ठेवत आहेत. मात्र, आता त्याने बिग बॉसमध्ये जाऊ नये तर काय? आजकाल लोक भजनही ऐकत नाहीत अन् गज़लही. आजकाल लोक काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे चांगलं काही म्हणणारे, सांगणारेही आता बोलत नाहीत. कुणीच कुणाचंही काहीही ऐकून घेत नसल्याने आता लोक केवळ ‘तू बघितलंस माझ्याकडं अन् मला आमदार झाल्यावानी वाटतं’, अशीच गाणी ऐकतात. पोपट उडाला भुरर्र्र्रऽऽ या पलिकडे आमची कल्पनाशक्तीच जात नाही… आता अशा माहोलमध्ये भजन गायकाचे दिवस बसणे साहजिकच आहे. त्याने भजने कुणासाठी म्हणावीत? लोक भजन ऐकत नाहीत. सकाळी म्हणावी भूपाळी, दुपारी म्हणावी गजल, संध्याकाळी म्हणावे स्तोत्र पण, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र… सारेच कसे दुपारच्या जेवणाची (पुढच्या तीन पिढ्यांच्या) सोय लावण्यात मग्न आहेत. त्यांना भजन ऐकण्याचा भाव नाही अन् गज़ल ऐकण्याची भावना नाही. त्यामुळे गज़ल अन् भजनवाले गायक बसले आहेत. अशावेळी त्यांनी काय करावं? बरं भजन गाताना भाव मात्र भक्तीचा असला पाहिजे.

https://tarunbharat.org/?p=62544
Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (341 of 845 articles)


तोरसेकर | तमाम पुरोगामी म्हणवून घेणारे लोक आपल्यासाठी परिवर्तनवादी, अशी बिरुदावली लावत असतात. परिवर्तन म्हणजे तरी काय असते? तर जी ...

×