ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » चोरीने होत आहे रे…

चोरीने होत आहे रे…

कधी कधी आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन… असेच काहीसे होते. घरी मासळी आणावी अन् सागुती करण्यासाठी चिरताना तिच्या पोटातून हिरा निघावा, रस्त्यात पडलेला कागद उचलावा अन् ती लाखाची लॉटरी निघावी, भर दुपारी तगमग होत असताना खिशाचा अंदाज घेत आपण टॅक्सी करावी अन् अचानक आपल्या बाजूला ऐश्‍वर्या राय असावी, असाच काहीसा अनुभव हैदराबादच्या निजामाच्या शाही भोजनकक्षात कधीकाळी वापरलेला सोन्याचा डबा अचानक आणि सहज चोरता आल्यावर त्या दोन चोरट्यांना आला. हे चोर काही प्रोफेनल चोर नव्हते. ड्रायव्हर आला नाही म्हणून गाडी चालवली तसे त्यांचे झाले. त्यांनी ही चोरी सहज केली. गरज म्हणून केली. अर्थात ही गरज नेमकी काय हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. आपली इतक्याचीच गरज आहे म्हणून मग तितकेच चोर, असे काही चोर करत नाही. एकदा घरात शिरले की मग हाताला लागेल तसे ते चोरतात; पण त्या आधी त्यांना यजमानांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज आला असतो. व्यवसायिक चोर त्यांच्या सावजाची रेकी वैगरे करतात, असे म्हणतात. तर हे चोर निजामाच्या शाही राजवाड्यात खिडकीच्या तावदानातून शिरले म्हणतात. म्हणजे पोलिसांच्या तपासात ते दिसले. त्यानंतर त्यांनी हिरेजडित कप आणि तो सोन्याचा डबा ठेवलेल्या आलमारीच्या बिजागर्‍या काढल्या आणि तो डबा, कप बाहेर काढला. त्यात ते जेवले. अगदी ऑन दी स्पॉट की काय म्हणतात तसे जेवले. त्यासाठी त्यांनी आधी तयारी करून ठेवली होती. ते आत शिरले तेव्हा त्यांनी बाहेरून खाद्यपदार्थ सोबत नेले होते. त्या सोन्याच्या भांड्यात कधीकाळी शाही खानदानातील सदस्य जेवत असतील त्या भांड्यांत हे चोर जेवले. त्यानंतर सुवर्णजडित कप, आणखी काही सोन्याचे कप आणि हा जेवणाचा डबा घेऊन ते चोर फरार झाले. आता चाळीस किलो सोन्याचे दागिने गणपतीच्या अंगावर मंडळवाले घालतात अन् पहारा मात्र पोलिसांना द्यावा लागतो. इथे मात्र सोन्याचा खजिनाच असूनही तिथे पोलिसांना पहारा का नव्हता, असा प्रश्‍न कुणी या केसमध्ये विचारला नाही अन् पहारा असूनही चोरांनी चोरी कशी केली, असेही कुणाच्या मनात आले नाही. इतक्या सहजपणे आपल्याला ही चोरी करता येईल, असे त्या चोरांना वाटले नसावे. गल्ली क्रिकेट खेळणार्‍या पोरांसमोर अचानक सचिन तेंडुलकरच आल्यावर त्यांना कसे वाटले असेल तसेच या चोरांना निजामाच्या म्युझियम मध्ये अगदी सहजच आत शिरता आल्यावर झाले असावे. त्यातही ही सारी सामग्री पळवून नेल्यावर त्याच्या बातम्या झाल्या. आपण एकदम ब्रेकिंग न्यूजची कामगिरी केली आहे आणि सोशल मिडियापे अपून छा गयेले है बॉस, याचा साक्षात्कार त्यांना नंतरच्या दोन दिवसात झाला. त्यांची ही साधी चोरी अचानक धूम, धूम वन, टू सारख्या इंग्रजी थरार पटांची चोरी असलेल्या चित्रटांतील साहसी चोर्‍यांसारखी ग्रेट चोरीच नाही तर तो दरोडा ठरला आहे, हे त्या चोरांना बातम्यांमधून कळले. म्हणजे रात्रीच्या अंधारात पाऊस पडत असताना वळचणीला उभ्या असलेल्या वासराला खुंट्याला बांधावे अन् सकाळी वाघ निघावा, असेच त्या चोरांचे झाले. आपली चोरी दरोडा आहे अन् आपण चोरलेल्या मालाची किंमत पन्नास कोटी रुपये आहे, हे त्यांना कळले असेल तेव्हा नेमके त्यांना काय वाटले असेल, हे विचारायला तरी त्या चोरांची भेट घ्यायलाच हवी. आता मग ती भांडी नेमकी कुठे ठेवावी अन् कुठे नाही, असे त्यांना झाले. त्यांना हेही कळले की ते सामान्य चोर नाहीत अन् अत्यंत शातीर चोर आहेत, त्यांचा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध आहे, त्यांनी टाकलेला हा दरोडा वेल प्लॅन्ड आणि सोची समझी अ‍ॅक्ट थी, हेही त्यांना टीव्हीच्या बातम्यांतून कळले. पोलिस आपल्याला पकडण्यासाठी काय काय करताहेत, कुठल्या दर्जाच्या अधिकार्‍याला आपल्याला पकडण्याचे खास मिशन देण्यात आले आहे अन् त्या आला (हा शब्द हिंदी बातम्यांत वापरला जातो.) अधिकार्‍याने आतावर कुठल्या कुठल्या खतरनाक कारवायांना ‘अंजाम’ दिला आहे, असा त्याचा संपूर्ण बायोडेटा त्या चोरट्यांना टीव्हीच्या बातम्यांवरून मिळाला. त्यावरून एकजण दुसर्‍याला म्हणालाही की, बघ टीव्हीवर मालिका न बघता बातम्या बघण्याचे कसे फायदे असतात… त्यांना पकडण्यासाठी पोलिस काय करत आहेत याची क्षणाक्षणाची माहिती मिळत होती. त्यांच्या या कथित दरोड्यावर कुठलासा मोठा दिग्दर्शक निर्माता चित्रपटही तयार करणार असल्याचेही त्या चोरट्यांना टीव्ही आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांतून कळले. आपली ‘मोडस ऑपरेंडी’ काय आहे, या बाबत जगभरात उत्सुकता आहे आणि जगातल्या महान दरोड्यांपैकी आपला एक दरोडा आहे… एकूणच दरोड्यांच्या इतिहासांत सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, हा दरोडा आपल्या हातून झाला आहे, हे सारेच एकून ते चोरटे अचंबित झाले. एखादा टुकार सिनेमा सुपर ड्युपर हीट झाल्यावर त्या थर्डग्रेड निर्मात्याला जसे वाटावे तसेच या चोरट्यांचे झाले. आता या सुवर्णाच्या भांड्यांचे काय करावे, असा प्रश्‍न त्या चोरट्यांना पडला असेल का? एक मात्र नक्की. निजामाच्या त्या सोन्याच्या डब्यात त्या चोरट्यांनी यथेच्छ जेवणे करून घेतलीत. त्या कपात चहा पिऊन घेतला. त्या सोन्याच्या डब्यांतही पदार्थांची चव काही बदलत नाही. बेचव असलेले पदार्थ चवदार होतात, असेही काहीच होत नाही, हाही साक्षात्कार त्या चोरट्यांना झाला असेल. घरच्या जर्मनच्या थाळीत बायको किंवा आईने वाढलेली लसणाच्या तडक्याची साधी दालफ्राय आपल्या चिकनपेक्षाही चवदार वाटत होती, याचे भान येऊन थाळी कशाची आहे, त्याला हिरे जडवलेले आहेत का, याचा काहीच संबंध नाही. सडकून भूक लागायला हवी आणि त्यासाठी भरपूर श्रम करायला हवेत. तर भूक लागते अन् मग पानांत समोर जे जे पडेल ते रुचकरच लागते. सपाटून श्रम केले की सपाटून भूक लागते अन् त्यानंतर जी झोप लागते तीही सपाटूनच असते. कसलीच भीती नसते. आता सोन्याच्या भांड्यांत जेवण झाल्यावर त्या चोरट्यांना झोपच येत नसावी. एकतर इतके पन्नास कोटींचे सोने आपल्या घरात आहे म्हणून त्यांना बाहेर पडता येत नव्हते. पोलिसांपेक्षा आंतरराष्ट्रीय टोळ्याच आपल्यापर्यंत जलद पोहोचतील, याचीही त्यांना सार्थ भीती होती. त्यामुळे दिवसभर टीव्हीसमोर बातम्या ऐकत बसून राहा, त्यामुळे परिश्रमच नाही अन् त्यावर ही चिंता… त्या दोन्ही चोरांना आठच दिवसांत त्या सोन्याचा कंटाळा आला. निजाम बेटा कसा शांततेने अन् सुखाने जगू शकला असेल, असाही विचार नक्कीच त्या चोरांच्या मनात येऊन गेला. त्यांची श्रीमंती भरजरी असेल; पण आपल्या गरिबीइतकी सुदृढ अन् तालेवार नक्कीच नसेल, असेही त्या चोरांना वाटले असावे. म्हणून मग त्यांनी वैतागून आपण पकडले जाऊ अशी स्थिती निर्माण केली असावी. नाहीतर आपल्या कुठल्याही पोलिसांना इतक्या लवकर अशा दरोड्याचा छडा लागणेच शक्य नाही. एक मात्र नक्की की त्यांच्या या दरोड्यामुळे समाजवाद साधला गेला. सामान्य माणसांनाही निजामाच्या सोन्याच्या भांड्यात जेवण घेता आले!

https://tarunbharat.org/?p=62002
Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (242 of 733 articles)


तोरसेकर | वाहिन्या असोत किंवा वर्तमानपत्र असो, त्यात बातम्या कमीअधिक प्रमाणात सारख्याच असतात. पण, आपापल्या अजेंडानुसार काही बातम्या ठळक केल्या ...

×